christmas eve information in marathi – नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतीपासून सुरू होणाऱ्या वर्षाला निरोप द्यायला ख्रिसमसचा सण येतो.
वर्षांची सांगता विशेष म्हणजे ख्रिश्चन लोक ह्याचं सणाने करतात. तसे बघायला गेले तर मकर संक्रांत मग महाशिवरात्री मग होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, गणपती उत्सव, नवरात्र – दसरा, दिवाळी आणि मग ख्रिसमस नाताळ!
वर्षाचा अखेरचा सण म्हणून आपण ख्रिसमस कडे पाहतो. पण पाश्चात्य देशांकडे हा सण कसा साजरा केला जातो ? ख्रिसमस पूर्वसंध्या म्हणजे काय ?
इतर अनेक गोष्टींची माहिती आपण जाणून घेण्यास उत्सुक असतो. या लेखात आपण ख्रिसमस पूर्वसंध्या माहिती मराठी (christmas eve information in marathi) जाणून घेणार आहोत.
ख्रिसमस पूर्वसंध्या माहिती मराठी (christmas eve information in marathi)

तर मित्रांनो, ख्रिसमस पूर्वसंध्या म्हणजे ख्रिसमसच्या अगोदरच्या दिवसाची संध्याकाळ वा रात्र!
ख्रिसमसचा दिवस हा येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जातो. ख्रिश्चन लोकांमध्ये ह्या दिवसाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. पाश्चात्य देशांमध्ये आणि संपूर्ण विश्वात ख्रिसमस साजरा केला जातो.
हा सण साजरी करण्याच्या जगभर विविध पद्धती दिसून येतात. पण बरेच जण, ख्रिसमस ट्री झाडाची सजावट करतात, त्यावर प्रकाशमयची माळ असते.
स्वतःला व इतरांना वैविध्यपूर्ण भेटवस्तू देऊन हा सण साजरा केला जातो. काही जण Christmas eve ला तर काही जण christmas day च्या दिवशी एकमेकांना गिफ्ट्स देतात.
भारतात तसेच परदेशात देखील विशेष खाद्यपदार्थांची मेजवानी असते. वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या ह्या सणात, येणाऱ्या वर्षात सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा सर्व जण ठेवतात.
विविध कुटुंबात हा सण विशेष परंपरागत गोष्टींनी साजरी होतो. पाश्चात्य देशांत तेथील संस्कृती प्रमाणे Christmas eve आणि 25 डिसेंबर या दिवशी चर्च मध्ये जातात.
लहान मुलांचा असा समज असतो की, Christmas eve म्हणजे तिचं वेळ जेव्हा सांता क्लॉज मुलांना विविध गिफ्ट्स देऊन जातो.
त्याने विशेष असे लाल कलरच्या वेलवेल्टने विणेलेले वस्त्र परिधान केलेले असेल आणि त्याच्या डोक्यावर टोपी देखील असेल!
विशेष वाहनाने तो आपल्या घराच्या छतावर उतरून ख्रिसमस स्पेशल गिफ्ट्स देऊन जाईल.
ख्रिसमस पूर्वसंध्या ही मुख्यत्वेकरून 24 डिसेंबर म्हणजेच नाताळच्या अगोदर असते.
13 व्या शतकात सर्वप्रथम ह्या संज्ञेचा इंग्रजी भाषेमध्ये उपयोग केल्याचं दिसून येते.
Eve म्हणजे विशेषतः तो दिवस किंवा रात्र जी सुट्टीच्या असलेल्या दिवसाच्या आधी येते.
अनेक ठिकाणी, अनेक देशांमध्ये निराळ्या पध्द्तीने पण त्याचं उत्साहात हा सण साजरा केला जातो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
christmas eve meaning in marathi
ख्रिसमस संध्याकाळ
ख्रिसमस ची पूर्वसंध्येला केव्हा साजरी करतात ?
24 डिसेंबरला ख्रिसमसची पूर्वसंध्येला साजरी करतात.
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ख्रिसमस पूर्वसंध्या माहिती मराठी (christmas eve information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
हे देखील वाचा