Christmas information in marathi – ख्रिसमस नाताळ हा एक ख्रिस्ती सण आहे. संपूर्ण जगात 25 डिसेंबरला अगदी मोठ्या जल्लोषात नाताळ साजरा केला जातो. 24 डिसेंबर या दिवशी रात्री 12 वाजता प्रभु येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी 24 डिसेंबच्या रात्रीच ख्रिस्ती समुदाय नाताळ साजरा करतात.
ख्रिसमस ट्री – प्रत्येक ख्रिस्ती आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनी आपले घर सजावट करतो. या सजावटीमध्ये ख्रिसमस ट्री जरूर वापरला जातो. या वृक्षाला नाताळच्या दिवशी खूपच महत्व आहे.
आजच्या या लेखामध्ये आपण ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi जाणून घेणार आहोत.
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi

अधिकृत नाव | ख्रिसमस नाताळ |
साजरा करणारे | ख्रिस्ती समुदाय |
इतर नावे | ख्रिसमस डे बडा दिन |
दिनांक | 25 डिसेंबर |
वारंवारीता | दरवषी |
1. ख्रिस्ती धर्मातील अतीशय आनंदाचा दिवस म्हणजे नाताळ.
2. याच दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता.
3. येशू ख्रिस्त यांना परमेश्वराचा पुत्र म्हणून ओळखले जाते. जगाचा तारणहार म्हणून सुद्धा ओळखले जाते.
4. नाताळ सण येण्याअगोदर ख्रिस्ती लोक आपले घर सजवणे चालू करतात.
5. ख्रिसमस ट्री (वृक्ष) याला खूप महत्त्व आहे. याच्या समवेत सर्व सजावट केली जाते.
6. या दिवशी ख्रिश्चन समुदाय एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात.
7. अश्या प्रकारे आपल्या घराला प्रकाशमय केले जाते.
8. 24 डिसेंबरला रात्री सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो, असे मानले जाते.
9. या भेटवस्तूमध्ये आपल्याला हवे ते परमेश्वर देतो, अशी भावना आहे.
10. नाताळच्या दिवशी चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनवून वाढदिवस साजरा करण्याची तयारी करतात.
11. त्यानंतर सर्व ख्रिस्ती लोक एका ठिकाणी जमून आपल्या प्रिय प्रभु येशू ख्रिस्त यांची आराधना करतात.
12. येशू ख्रिस्त यांची आराधना करतात, गाणे गात आपल्या देवाची स्तुती करतात.
13. त्यानंतर येशू ख्रिस्ताच्या नावाने केक कापून सर्वसमवेत वाटून घेतात.
14. अश्या प्रकारे नाताळ सण अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
येशू ख्रिस्त मराठी माहिती – jesus information in marathi

नाव | येशू ख्रिस्त |
इंग्रजी नाव | Jesus Christ Jesus of Nazareth |
धर्म स्थापना प्रमुखाचे नाव | येशू ख्रिस्त |
जन्मस्थळ | बेथलेहेम ,जेरुसलेम इस्रायल देश |
आईचे नाव | मारिया |
पित्याचे नाव | जोसेफ |
कार्य | मानवजातीला पापांच्या बंधनातून मुक्त करणे |
प्रमुख सण | नाताळ (ख्रिसमस) गुड फ्रायडे |
पवित्र ग्रंथ | बायबल |
15. येशू हे नाव इम्मानुएल या नावाचे भाषांतरित नाव आहे. याचा अर्थ असा आहे, ‘आम्हाबरोबर देव.’
16. येशू ख्रिस्ताला हिब्रू भाषेत येशुआ असे म्हणतात तर ग्रीक भाषेत येसूस असे म्हणतात.
17. पवित्रशास्त्रनुसार सर्व मानवजातीला त्यांच्या पापांपासुन मुक्त करण्यासाठी, येशू ख्रिस्त याला परमेश्वराने पृथ्वीवर पाठवले.
18. त्यामुळे येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र आणि जगाचा तारणारा म्हणून ओळखले जाते.
19. येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंबर या दिवशी झाला असल्याने हा दिवस नाताळ म्हणून साजरा केला जातो.
20. ख्रिस्ती धर्मातील पवित्रा ग्रंथ बायबल आहे.
21. हा ग्रंथ दोन भागात विभागला आहे. पहिल्या भागात जुना करार आणि दुसऱ्या भागास नवीन करार असे म्हणतात.
22. जुना करार हा यहुदी लोकांचा धर्मग्रंथ आहे आणि नाव करार हा येशू ख्रिस्त यांच्या संबंधित आहे.
23. हा ग्रंथ परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे लिहलेले आहे.
24. बायबल ग्रंथ ख्रिस्ती धर्माची श्रद्धेची आणि जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे.
25. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात व्यवस्थित सांगितले आहे.
26. सर्वप्रथम प्रकाशित झालेला आणि सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे बायबल होय.
27. जगातील इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलच्या सर्वाधिक प्रती आजपर्यंत छापल्या गेल्या आहेत.
28. संपूर्ण जगात मुख्य भाषा आणि बोलीभाषा मिळून एकूण 5000 भाषा आहेत. त्यापैकी 2100 भाषांत बायबलचे संपूर्ण किवा अंशतः भाषांतर केले आहे.
29. बायबल हा ग्रंथ यहुदी आणि ख्रिस्ती लोकांसाठी महत्वपर्ण ग्रंथ मानला जातो.
30. जुन्या कराराला सुमारे तीन हजार वर्षाचा आणि नव्या कराराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे.
31. बायबल या शब्दाचा अर्थ ग्रंथसंग्रह असा होतो.
31. ता बिब्लिया (TA BIBLIA) या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह.
32. ही पुस्तके एकहाती लिहिली गेलेली नाहीत, तर ख्रिस्तपूर्व 1300 ते इसवी सन 100 या साधारण 1400 वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आहे.
33. येशू ख्रिस्ताने अनेक मृतांना जीवंत केले. अनेक रोग्यांना बरे केले. जो आंधळा आहे त्याला दृष्टी देण्याचे काम केले.
34. प्रभू येशू ख्रिस्त मानवजातीचा पापांसाठी मरण पावला आणि तिसर्या दिवशी पुन्हा जीवंत झाला आणि स्वर्गात गेला.
येशू ख्रिस्त प्रार्थना मराठी – yeshu prarthana marathi
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आमची रोजची भाकर आज आम्हास दे ; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडवली आहे जशी तू आमची ऋण आम्हास सोड ; आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस ; तर आम्हास वाईटापासून सोडीव [ कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत ; आमेन ]
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi

महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्म लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या आणि इतर गोड खाद्यपदार्थांचे एकमेकांस वाटून हा सण साजरा करतात. तर काही जण सांताक्लॉजचा वेष धारण करून लहान मुलांना भेटवस्तू देतात.
कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये येशू ख्रिस्त यांची जन्म आठवण म्हणून गायीचा गोठा तयार करण्याची एक परंपरा आहे. याचे कारण येशू च जन्म गाईच्या गोठ्यात झाला होता.
अश्या प्रकारे ख्रिस्ती लोक आणि इतर जण अगदी उत्साहाने नाताळ सण साजरा करतात. नाताळ हा सण सर्वाना एकत्र आणण्याचा सण आहे.
सांता क्लॉज इतिहास मराठी – santa claus information in marathi
सांता क्लॉजाचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. सांता क्लोज आणि नाताळ सण यांचे नाते अगदी घट्ट आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या अगोदर म्हणजे 24 डिसेंबर या दिवशी रात्री खेळणी आणि इतर भेटवस्तू वाटत असतो, असे मानले जाते.
जगभरात या सांता क्लॉज ची एक वेगळीच ओळख आहे. प्रत्येक लहान मुले हे सांता क्लॉजला पसंद करतात. युरोपात आणि भारतातही हा नाताळ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात.
साधारण महिनाभर आधीपासून नाताळ या सणाची तयारी सुरु होते.
इसवी सनाच्या चौथ्या शतकातील ग्रीक ख्रिस्ती बिशप सेंट निकोलस हे मायरा या ठिकाणी राहत होते. हे नेहमी गरिबांना भेटवस्तू वाटायचे. त्यामुळे ते ख्रिस्ती धर्मात विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी आयुष्यभर ख्रिस्ताची सेवा केली.
त्यांच्या मृत्युनंतर मध्ययुगात त्यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा नंतरच्या काळातही चालू राहिली. फरक इतकाच की संत निकोलसच्या नावाऐवजी सांता क्लॉज असे नाव पडले.
इसवी सन सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये नाताळबाबा या नावाने ही संकल्पना सुरू राहिली. त्यामुळे सांता क्लॉज ख्रिस्ती धर्मात लोकप्रिय झाला.
सांता क्लॉज वर अनेक लेखकांनी कथा रचल्या आहेत. अनेक चित्रपट आणि मालिका तयार केल्या आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सांता क्लॉज कोण आहे – Who is Santa Claus?
सांता क्लॉज एक ख्रिस्ती सेवक आहे. जो गरिबांना नेहमी भेटवस्तू वाटायचा. त्याचे मूळ नाव सेंट निकोलस असे आहे.
येशू ख्रिस्ताचा जन्म कोठे झाला ?
येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम या गावी गाईच्या गोठ्यात झाला.
हे देखील वाचा
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi जाणून घेतली.
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही नाताळ माहिती मराठी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.