clouds information in marathi – हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समूह म्हणजे ढग होय. ढग हे आकाशात तरंगतात हे आपण लहानपणापासूनच पाहत आलो आहोत. ढग पाहिल्यावर आपल्याला ढग किती उंच असेल ? ढगांचा आकार केवढा असेल ? ढग किती वेगाने पुढे सरकत असेल ? असे अनेक प्रश्न निर्माण होत असतील.
या लेखातून आपण आकाशातील ढग माहिती मराठी (clouds information in marathi) जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण ढगांची निर्मिती कशी होते ? त्यांचे प्रकार आणि वैशिष्ट या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- आकाशातील ढग माहिती मराठी (clouds information in marathi)
- ढगांचे महत्व माहिती मराठी (cloud importance information in marathi)
- आकाशात ढग कसे तयार होतात (how clouds form in the sky)
- ढगांचे प्रकार माहिती मराठी (types of clouds information in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
आकाशातील ढग माहिती मराठी (clouds information in marathi)

विषय | ढग (clouds) |
प्रकार | वातावरणातील अधिक उंचीवर आढळणारा घटक |
वर्गीकरण | उंचीनुसार – 3 प्रकार आंतरराष्ट्रीय – 10 प्रकार |
ढग (clouds meaning in marathi) म्हणजे वातावरणात तयार झालेल्या असंख्य सूक्ष्म जलकणांचा अथवा हिमकणांचा तरंग होय. पाऊस पाडण्यासाठी ढगांची आवश्यकता लागते. अशा प्रकारे ढग वातावरण संतुलित राहण्यास मदत करते.
ढग हे वातावरणात अधिक उंचीवर आढळणारे सांद्रीभवनाचे रुप आहे. उंचीनुसार हवेतील बाष्प कमी होत जाते, त्यामुळे भूपृष्ठापासून कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे होतात. तर अधिक उंचीवरील आकाराने लहान असतात.
हा लेख जरूर वाचा – पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी (paryavaran in marathi)
ढगांचे महत्व माहिती मराठी (cloud importance information in marathi)
- ढग हे वातावरणातील महत्वाची भूमिका बजावतात. पाऊस येण्यासाठी ढग महत्वाचे असतात. ढगांमुळे पाऊस पडून सर्व पृथ्वीवर पाणी पोहचते.
- हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी आणि हवामानात होणाऱ्या बदलांचे भाकीत करण्यासाठी ढगांचा उपयोग होतो.
- एका ढगाचे वजन जवळजवळ पाच लाख किलो म्हणजेच एका विमानाएवढे म्हणजेच 100 हत्तींएवढे असते.
- ढग सूर्यकिरणांचे आणि त्यामुळे येणाऱ्या उष्णतेचे परावर्तन करतात. तसेच पृथ्वी जी उष्णता उत्सर्जित करते ती ढग शोषून घेतात. त्यामुळे उष्णतेचा समतोल राखण्यास मदत होते.
हा लेख जरूर वाचा – हवेतील वायू मराठी माहिती (air information in marathi)
आकाशात ढग कसे तयार होतात (how clouds form in the sky)
आपल्या सभोवती असणारी हवा अनेक कारणांमुळे आकाशाच्या दिशेने वर जाते. हवा वर गेल्यावर ही प्रसरण पावते आणि त्यामुळे आणखी हलकी होते. हवेवर असणारा दाब कमी होतो आणि ती अजूनच वर वर जाऊ लागते. हवा वर जात असताना तिचे आंतरिक प्रसरण होते आणि ती थंड होत जाते.
हवा थंड होताना तिची सापेक्ष आर्द्रता वाढते आणि विशिष्ट उंचीवर गेल्यावर ती संपृक्त बिंदू गाठते. वातावरणात अनेक अदृश्य आणि सूक्ष्म धूलिकण संचार करत असतात. हे कण आर्द्रताग्राही असतात.
हवा अजून वर जात राहिल्यास हवेचे तापमान द्रवांकाच्याही खाली जाऊन अशा सूक्ष्म कणांवर जलबाष्पाचे संद्रवण होते. त्यातून पाण्याचे थेंब तयार होतात. तयार झालेले असंख्य जलबिंदू एकत्र येऊन ढग तयार होतात.
ढगांचे प्रकार माहिती मराठी (types of clouds information in marathi)
ढगाचे साधारणपणे उंचीनुसार आणि आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार प्रकार पाडले आहेत. ढगांचे उंचीनुसार तीन प्रकार पडतात, तर आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार दहा प्रकार पडतात. याची माहिती आपण पुढे सविस्तरपणे घेऊया.
उंचीनुसार ढगांचे तीन मुख्य प्रकार माहिती मराठी (types of clouds classified by height)
1. अतिउंचीवरील ढग – या प्रकारातील ढग स्फटिकांचे बनलेले असते. या ढगांची उंची सात हजार ते चौदा हजार मीटर इतके असते. यांचे सिरस, सिरोस्ट्रेटस, सिरोक्युम्युलस अशा तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात येते.
- सिरस या प्रकारातील तंतुमय असतात.
- सिरोस्ट्रेटस या प्रकारातील ढगांवर वळ्या पडलेल्या चादरीसारखे तेजोमंडल असतात.
- सिरोक्युम्युलस या प्रकारचे ढग लहान लहान लाटांच्या समुहासारखे असतात.
2. मध्यम उंचीवरील ढग – या प्रकारातील ढगांची उंची 2000 ते 7000 मीट इतकी असते. या प्रकारातील ढगांचे अल्टोस्ट्रेटस आणि अल्टोक्युम्युलस असे दोन उपप्रकार पडतात.
- अल्टोस्ट्रेटस या प्रकारातील ढग कमी जाडीचे असतात.
- अल्टोक्युम्युलस या प्रकारातील ढगांना पांढऱ्या रंगाचे स्तर आणि करड्या रंगाची छटा असते.
3. कमी उंचीवरील ढग – या प्रकारातील ढगाची उंची दोन हजार मीटर पेक्षा कमी असते. यामध्ये प्रामुख्याने स्टॅटोक्युम्युलस, स्ट्रेटस, निम्बोस्ट्रेटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिम्बस असे पाच उपप्रकार पडतात.
- स्टॅटोक्युम्युलस या प्रकारातील ढग पांढऱ्या किंवा धुरकट रंगाचे असतात.
- स्ट्रेटस या प्रकारातील ढग राखाडी रंगाचे असतात.
- निम्बोस्ट्रेटस या प्रकारच्या ढगांना गडद राखाडी रंगाचे जाड थर असतात. या मधून रिमझिम पाऊस होतो आणि बर्फाचा वर्षा होतो.
- क्युम्युलस या प्रकारचे ढग अवाढव्य, करड्या रंगाचे आणि घुमटकार ढग असतात.
- क्युम्युलोनिम्बस या प्रकारचे ढग काळ्या रंगाचे घनदाट आणि पर्वतासारखे मोठे ढग असतात. या ढगांना वादळाच्या निर्दशक असे म्हटले जाते.
याव्यतिरिक्त क्युमुलस ढग आणि क्युमुलोनिम्बस हे ढगांचे प्रकार आहे. क्युमुलस ढग आल्हाददायक हवेचे निर्देशक म्हणून ओळखले जातात. तर क्युमुलोनिम्बस ढगांमध्ये विजांचा गडगडाट होतो. आणि गारपीट होते.
हा लेख जरूर वाचा – वायू प्रदूषण मराठी माहिती (air pollution information in marathi)
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण आकाशातील ढग माहिती मराठी (clouds information in marathi) जाणून घेतली आहे. आकाशातील ढग माहिती मराठी (clouds information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
ढग कशाचे बनलेले असतात ?
पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून ढग बनलेले असतात.
जीवावरण कशाला म्हणतात ?
पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांच्या आणि सूक्ष्मजीवांच्या ठिकाणास जीवावरण असे म्हणतात.
ढग समानार्थी शब्द मराठी
ढग समानार्थी शब्द मराठी – घन आणि आंबुद
कोणते ढग जाड थराचे असतात ?
क्युम्युलोनिम्बस ढग जाड थराचे असतात.
कोणत्या प्रकारचे ढग वादळाचे निर्देशक आहेत ?
क्युम्युलोमिम्बस प्रकारचे ढग वादळाचे निर्देशक आहेत.