सहकारी संस्थेचे फायदे आणि तोटे काय आहेत ?

By | April 25, 2023

Co Operative Society In Marathi – नमस्कार मित्रांनो, समाजातील सामान्य व्यक्तीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. एकल व्यापारी, भागीदारी आणि संयुक्त भांडवली प्रमंडळ या संघटना स्थापन करण्यामागे प्रमुख उद्देश नफा मिळविणे हाच असतो. हा उद्देश प्राप्त करण्यासाठी वेळप्रसंगी ग्राहकांची पिळवणूक होते.

याउलट सहकारी संस्थेचा मूळ उद्देश नफा मिळवणे नसून सभासदांचे हितरक्षण करणे हाच असतो. यामुळे सहकारी संस्था संघटन प्रकारात प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे संरक्षण केले जाते.

या लेखातून आपण सहकारी संस्थेचे फायदे आणि तोटे काय आहेत (Co Operative Society In Marathi), याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

सहकारी संस्था म्हणजे काय (Sahakari Sanstha Mhanje Kay Mahiti)

Co Operative Society In Marathi

Co Operative Society Meaning In Marathi – सहकार असा संघटनेचा प्रकार आहे, ज्यामध्ये अनेक व्यक्ती समानतेच्या तत्वावर आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी स्वयं एकत्र येऊन संस्था चालवतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, या व्यक्तींचा एकत्र येण्याचा उद्देश नफा मिळविणे नसून आर्थिक संकटावर मात करणे हाच असतो.

भारतीय सहकारी संस्था कायदा 1912 कलम 4 नुसार सहकारी तत्त्वावर सभासदांच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या संस्थेस सहकारी संस्था असे म्हणतात.

संबंधित लेखभागीदारी संस्था म्हणजे काय ?

सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत (Co Operative Society Features In Marathi)

Sahakari Sanstha Characteristics Marathi – सामाजिक हितासाठी स्वेच्छाने एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. यामध्ये सहकारी संस्थेचा सभासद होणे आणि सभासदत्व काढून घेणे हे सर्वस्वी सभासदांच्या इच्छेवर अवलंबून असते.

1. ऐच्छिक सभासदत्व – सहकारी संस्थेमध्ये ऐच्छिक सभासदत्व असल्यामुळे सहकारी चळवळीची प्रगती होण्यास मदत होते. हे सभासत्व देताना जात, पंथ, वंश, लिंग, धर्म, गरीब आणि श्रीमंत याचा विचार केला जात नाही.

2. लोकशाही पद्धतीचे व्यवस्थापन – सहकारी संस्था व्यवस्थापन लोकशाहीचे तत्त्वावर चालते. यामध्ये अनेक सभासद असतात. पण सर्वजण दैनंदिन व्यवस्थापनात लक्ष घालू शकत नाहीत म्हणून सहकारी संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन करण्यासाठी सभासद प्रतिनिधीची निवड करतात.

या प्रतिनिधीची लोकशाही पद्धतीने एक व्यक्ती एक मत या तत्त्वावर मतदान घेऊन निवड करण्यात येते. या सर्व प्रतिनिधींना मिळून संचालक मंडळ असे म्हणतात.

3. सेवा पुरवणे हाच उद्देश – एकल व्यापारी, भागीदारी आणि संयुक्त भांडवली प्रमंडळ अशा संघटनांसारखा नफा मिळविण्याचा उद्देश नसून सभासदांना सेवा पुरवणे हे सहकारी संस्थांचे मूलभूत तत्व आहे.

4. संस्थेत झालेला नफा सभासदांमध्ये वाटप केलं जातो. सभासदाने घेतलेल्या भागांच्या (शेअर्स) प्रमाणात त्याचे वाटप केले जात नाही.

5. सहकारी संस्थेचे सर्व व्यवहार रोख पद्धतीने होतात. काही ठराविक कारणास्तव उधारीवर व्यवहार करायचे असल्यास सर्व सभासदांचे विचार घेतले जातात.

6. सहकारी संस्थेला पुरविलेल्या भांडवलावर कमी दराने व्याज घेण्यात येते. या व्याजदारात सरकार वाटेल तेव्हा बदल करू शकते.

7. सहकारी संस्थांना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. सहकारी संस्थांची नोंदणी भारतीय सहकारी संस्थांच्या कायद्याखाली केली जाते.

8. सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना समान संधी असते. सहकारी संस्था समाजाच्या उन्नतीसाठी फारच उपयुक्त ठरतात.

संबंधीत लेखश्रम बद्दल माहिती व वैशिष्ट्ये

सहकारी संस्थांचे फायदे काय आहेत (Co Operative Society Advantages In Marathi)

1. सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी जात, धर्म, वंश किंवा आर्थिक परिस्थिती यापैकी कोणती बाब विचारात घेतली जात नाही. ज्याला सहकारी संस्थेचे फायदे मिळवण्याची इच्छा असते, तो व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो.

2. सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष उत्पादकाकडून मालाची खरेदी करतात. त्यामुळे त्यांना स्वस्त किमतीत माल मिळतो.

3. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाकडून केले जाते. तसेच दैनंदिन कामकाज करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पगारी नियुक्ती केली जाते. संचालक स्वतः संस्थेच्या कामात लक्ष दिले देत असल्याने व्यवस्थापनावर जास्त खर्च करावा लागत नाही.

4. इतर संघटनांप्रमाणे सहकारी संस्थेचा नफा मिळवण्याचा हेतू नसल्याने सहकारी संस्था आपल्या वस्तूंच्या किमती वाढवत नाहीत. यामुळे बाजारातील इतर संघटनांना वस्तूंच्या किमती कमी करावाच लागतात. अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे सहकारी संस्था बाजारावर नियंत्रण ठेवतात.

5. सहकारी संस्थेचा उद्देश नफा मिळवणे नसल्यामुळे सभासदांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. सहकारी संस्था सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करतात.

6. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने केले जाते. यामुळे येथे भांडवलशाही प्रवृत्तीला वाव मिळत नाही. परिणामी प्रत्येक सभासदाला आपले म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार मिळतो.

7. सहकारी संस्थेत झालेला नफा सभासदांमध्ये वाटप केला जातो. नफ्यातील काही रक्कम सभासदांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च केले जाते.

संबंधीत लेखई-कॉमर्स माहिती मराठी

सहकारी संस्थांचे तोटे काय आहेत (Problems Of Co Operative Society In Marathi)

1. साधारणपणे सहकारी संस्थेची स्थापना आर्थिक दुर्बल असलेले व्यक्तीच करतात. यामुळे अशा संस्थेच्या शेअर्सची किंमत कमी असते. यामुळे सहकारी संस्थेत मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होत नाही. परिणामी सहकारी संस्थेला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असणारे व्यवसाय करता येत नाहीत.

2. सहकारी संस्थेत खुले सभासदत्व असल्यामुळे कोणताही व्यक्ती सभासद होऊ शकतो. यामुळे सभासदारांमध्ये एकजूट राहत नाही. यातूनच मतभेदाचे वातावरण निर्माण होऊन संस्थेच्या कारभारावर विपरीत परिणाम होतो.

3. सहकारी संस्थेत मोठ्या प्रमाणावर भांडवल नसल्याने सहकारी संस्था तज्ञ व अनुभव व्यक्तींची मोठ्या पगारावर नियुक्ती करता येत नाही. परिणामी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचा कार्यक्षमता येते.

4. सहकारी संस्थेचे सभासद आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना उधारीच्या सवलतीची खरी गरज असते. पण सहकारी संस्थेच्या व्यवहार फक्त रोखीने होत असल्यामुळे सभासदांना त्याचा फायदा होत नाही.

5. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने चालते यामुळे संस्थेच्या कोणत्याच व्यवहाराची गोपनीयता राहत नाही. पण व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी गोपनीयता महत्त्वाची असते.

6. साधारणपणे सर्व मोठे सहकारी संस्था सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. प्रत्येक पक्ष आपला प्रतिनिधी या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर पाठवतो. यातूनच आपोआपच राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तीचे संबंधित सहकारी संस्थेत वर्चस्व निर्माण होते.

7. सहकारी संस्थेची नोकरवर्गाने चांगले काम करावे यासाठी कसलेही प्रोत्साहन दिले जात नाही. परिणामी संघटनेत शीतलता निर्माण होते.

8. सहकारी संस्थेच्या नेतृत्वावर त्या संस्थेचा विकास अवलंबून असतो. मात्र भारतात कुशल नेतृत्वाच्या अभावाने अनेक सहकारी संस्थांचा विकास झालेला नाही, असे दिसून येते.

संबंधीत लेखव्यापार म्हणजे काय मराठी माहिती

सारांश

मित्रांनो आशा करतो की, सहकारी संस्थेचे फायदे आणि तोटे काय आहेत (Co Operative Society In Marathi), याची सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्वाचा संघटन प्रकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *