दगडी कोळसा माहिती मराठी (Coal information in marathi)

By | April 12, 2023

Coal information in marathi – निसर्गात विविध प्रकारचे खनिजे आढळतात. यातील प्रत्येक खनिज वेगवेगळ्या हेतूसाठी उपयोगी पडते. कोळसा ऊर्जेचा स्रोत (energy resources) म्हणून वापरण्यात येतो. उच्च प्रतीचा ऊर्जास्रोत व बहुतांश उद्योगांमध्ये कच्चा माल या उपलब्धतेमुळे कोळशास काळे सोने (black gold) म्हणून ओळखले जाते. दगडी कोळसा उत्पादनात भारत देश जगातील स्तरावर चौथ्या क्रमांकाचा देश आहे.

कोळशाचा वापर खत आणि रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून केला जातो. तसेच रेल्वेत इंधन म्हणून कोळशाचा उपयोग केला जातो. भारत देशात 67% व्यापारी ऊर्जा दगडी कोळशापासून मिळवतात.

अशा या उपयोगी उर्जाप्रधान खनिजाची आपण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपण दगडी कोळसा माहिती मराठी (Coal information in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण कोळशाचे प्रकार आणि उपयोग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

दगडी कोळसा माहिती मराठी (Coal information in marathi)

Coal information in marathi
विषय दगडी कोळसा
प्रकारनैसर्गिक खनिज
उपयोगइंधन, खाते, ऊर्जास्रोत आणि कच्चा माल

Coal information in marathi- कोळसा हा नैसर्गिक उर्जास्त्रोत आहे. जमिनीत हजारो वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या वनस्पतीपासून कोळसा बनतो. पूर्वी या वनस्पती सूर्यप्रकाशात वाढलेल्या असतात. त्यामुळे दगडी कोळशास गाडलेला सूर्यप्रकाश म्हणून ओळखला जातो. तसेच बहुतांश उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून कोळशाचा वापर केला जातो. उच्च प्रतीचा ऊर्जास्रोत म्हणून कोळसा वापरला जातो, त्यामुळे कोळशास काळे सोने म्हणून ओळखले जाते.

जगात कोळशाचे सर्वाधिक उत्पादन चीन या देशात होते. भारताचा कोळसा उत्पादनात जागतिक स्तरावर चौथा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर चीन, नंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे देश अनुक्रमे कोळसा उत्पादन करतात. भारत देशात 67% व्यापारी ऊर्जा दगडी कोळशापासून मिळवतात.

दगडी कोळशाचा वापर खत आणि रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून केला जातो. तसेच पूर्वीपासून दगडी कोळसा रेल्वेत इंधन म्हणून वापरण्यात येतो.

हा लेख जरूर वाचालोखंडाची माहिती मराठी (iron information in marathi)

दगडी कोळशाचे प्रकार माहिती मराठी (types of coal in marathi)

dagadi kolsa prakar in marathi – दगडी कोळशाचा रंग, उपयोग आणि गुणधर्मावरून त्याचे विविध प्रकारात वर्गीकरण केले जाते.

1. पिट दगडी कोळसा – याचा समावेश दगडी कोळशात होत नाही. वनस्पतींचे कोळशात परिवर्तन होण्याचा पहिला टप्पा म्हणून याचा समावेश येथे केला आहे. पिटाचा रंग तपकिरी, काळसर तपकिरी किंवा काळा असतो.

2. लिग्नाइट किंवा तपकिरी कोळसा – या प्रकारातील कोळसा सामान्य दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट व कठीण असतो. याचा रंग तपकिरी किंवा काळा असतो. भारतात तमिळनाडू, कच्छ, राजस्थान आणि काश्मीर या ठिकाणी लिग्नाइटाचे साठे आढळतात. यापैकी सर्वांत महत्त्वाचा साठा तमिळनाडूच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील नेव्हेली या ठिकाणी आहे.

3. बिट्युमेनी कोळसा – आपण साधारणपणे ओळखत असलेला दगडी कोळसा म्हणजेच बिट्युमेनी कोळसा होय. या कोळशाचा वापर आगगाड्यांची आणि आगबोटींची एंजिने, कारखान्यातील भट्ट्या, पाणी तापविण्याचे बंब आणि घरगुती शेगड्यात इंधन म्हणून केला जातो.

4. अँथ्रॅसाइट कोळसा – या प्रकारातील कोळसा सामान्य दगडी कोळशाहून अधिक कठीण असतो. हा कोळसा लवकर जळत नाही आणि जळत असताना या कोळशातून धूर होत नाही. या कोळशात कार्बनचे 90% पेक्षा अधिक प्रमाण असते, त्यामुळे याला जाळले असता जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते.

दगडी कोळशाचे उपयोग माहिती मराठी (uses of coal in marathi)

dagadi kolasa in marathi – दगडी कोळसा प्रामुख्याने इंधन म्हणून वापरला जातो. आगगाडी, बोटी, कारखान्यातील भट्ट्या यामध्ये इंधन म्हणून दगडी कोळशाचा उपयोग केला जातो. तसेच वाफेची एंजिने चालविण्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. कोकक्षम कोळसा वापरून लोहाचे धातुक वितळवून लोह मिळविले जाते. हा कोळसा टणक, कठीण व गठळेदार असतो.

पुढील उद्योगात दगडी कोळशाचा उपयोग कच्चा माल म्हणून केला जातो.

  • रासायनिक खते
  • डांबर
  • इंधनासाठी तेल व पेट्रोल
  • रंजक
  • जंतुनाशक
  • छायाचित्रणासाठी उपयुक्त अशी विकासकारी (डेव्हलपिंगची) रसायने
  • स्फोटक पदार्थ

भारतात 67% व्यापारी ऊर्जा दगडी कोळशापासून मिळवतात. लोह आणि पोलाद, सिमेंट तयार करण्याचे कारखाने, वीट भट्टी, आगगाडी आणि विद्युत उद्योगात दगडी कोळसा वापरला जातो.

हा लेख जरूर वाचाअभ्रक खनिज माहिती मराठी (mica information in marathi)

भारतातील दगडी कोळसा माहिती मराठी (indian coal mines in marathi)

देशातील कोळशाची पहिली खाण राणीगंज (पश्चिम बंगाल) या ठिकाणी आहे. इसवी सन 1973 मध्ये देशात कोळसा खाणींचे व उद्योगाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. यानुसार कोळसा खाण राष्ट्रीयकरण कायदा 1973 अस्तित्वात आला.

तामिळनाडूतील नेवेली या ठिकाणी उच्च प्रतीचा लिग्नाइट कोळसा आढळतो. दामोदर खोरे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असून स्वयंपाकाच्या कोळशाचे ते देशातील प्रमुख केंद्र आहे.

पश्चिम बंगालमधील बरद्वान, बीरभूम व बांकुरा या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो. तर राजस्थानमधील बारमेर, बिकानेर आणि नागौर जिल्ह्यात लिग्नाइट कोळशाचे साठे आढळते. महाराष्ट्र राज्यात नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात बिट्युमेनी कोळसा आढळतो.

दगडी कोळसा उत्पादन माहिती (dagadi kolsa information in marathi)

कोळशाचे सर्वाधिक उत्पादन चीन या देशात होते. त्यानंतर अमेरिका, ऑस्टेलिया आणि त्यांनतर भारत या देशाचा क्रमांक लागतो. भारतात दगडी कोळसा छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी सापडतो. महाराष्ट्रात दगडी कोळसा (dagadi kolasa in maharashtra) वर्धा खोरे, पेंच-कन्हान क्षेत्र, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात सापडतो.

भारतातील कोळसा क्षेत्र असणारे राज्य पुढीलप्रमाणे आहेत.

1. छत्तीसगड – भारत देशातील दगडी कोळसा उत्पादन करणारे पहिल्या क्रमांकावर असणारे राज्य छत्तीसगड आहे. सरगुजा, मोहपणी, कोरबा या प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

2. झारखंड – भारत देशातील दगडी कोळसा उत्पादन करणारे दुसऱ्या क्रमांकावर असणारे राज्य झारखंड आहे. बोकोरो, गिरिधी, करणपुर, झरिया या प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

3. ओडिशा – भारत देशातील दगडी कोळसा उत्पादन करणारे तिसऱ्या क्रमांकावर असणारे राज्य ओडिशा आहे. धेंकनाल, संबळपुर, सुंदरगड, तालचेर या प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

4. मध्यप्रदेश – भारत देशातील दगडी कोळसा उत्पादन करणारे चौथ्या क्रमांकावर असणारे राज्य मध्यप्रदेश आहे. सिंगरोली, छिंदवाडा, पाथरखेडा, सोहागपूर या प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

5. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा – भारत देशातील दगडी कोळसा उत्पादन करणारे पाचव्या क्रमांकावर असणारे राज्य आंध्रप्रदेश आणि तेलंगणा आहे. पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी जिल्हे, सिंगोरानी, कोथागुंडम या प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

6. महाराष्ट्र – भारत देशातील दगडी कोळसा उत्पादन करणारे सहाव्या क्रमांकावर असणारे राज्य महाराष्ट्र आहे. वर्धा खोरे, पेंच-कन्हान क्षेत्र, नागपूर आणि चंद्रपूर या प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

7. पश्चिम बंगाल – भारत देशातील दगडी कोळसा उत्पादन करणारे सातव्या क्रमांकावर असणारे राज्य पश्चिम बंगाल आहे. राणीगंज या प्रदेशात दगडी कोळशाची खाण आहे.

भारतातील दगडी कोळसा उत्पादन साठे माहिती पुढीलप्रमाणे आहे.

राज्याचे नावउत्पादनसाठे
छत्तीसगड21.10 %16.68 %
झारखंड20.32 %28.32 %
ओडिशा19.0 %24.64 %
मध्यप्रदेश13.27 %7.77 %
आंध्रप्रदेश आणि तेलंगणा9.69 %7.07 %
महाराष्ट्र7.26 %3.71 %
पश्चिम बंगाल4.49 %10.71 %
Coal information in marathi

सारांश

या लेखातून आपण दगडी कोळसा माहिती मराठी (Coal information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. यात आपण दगडी कोळसा प्रकार, उपयोग, उत्पादन आणि साठे (dagdi kolsa mahiti in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

दगडी कोळसा माहिती (dagdi kolsa information in marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला दगडी कोळसा माहिती मराठी (Coal information in marathi) आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

दगडी कोळसा हा कोणत्या प्रकारचा खडक आहे ?

दगडी कोळसा हा कार्बनी पदार्थांचा बनलेला खडक आहे.

महाराष्ट्रात दगडी कोळसा कोठे सापडतो ?

महाराष्ट्रात दगडी कोळसा वर्धा खोरे, पेंच-कन्हान क्षेत्र, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी सापडतो.

जगात कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?

जगात कोळशाचे सर्वाधिक उत्पादन चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशात होते.

दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे ?

दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा चौथा क्रमांक आहे.

भारतातील सर्वात मोठ्या कोळसा खाणीचे झारखंड मधील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

भारतातील सर्वात मोठ्या कोळसा खाणीचे झारखंड मधील प्रसिद्ध ठिकाण बोकोरो, गिरिधी, करणपुर, झरिया हे आहेत.

भारतातील कोळसा क्षेत्र असणारे राज्य कोणती आहेत ?

भारतातील कोळसा क्षेत्र असणारे राज्य पुढीलप्रमाणे आहेत.
1. छत्तीसगड
2. झारखंड
3. ओडिशा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *