कलेक्टर म्हणजे काय ?

collector information in marathi – कलेक्टर हा इंग्रजी शब्द असून याचा अर्थ गोळा करणारा असा होतो, कलेक्टरलाच मराठीत जिल्हाधिकारी म्हणतात. हा अधिकारी जिल्हा पातळीवर प्रमुख म्हणून कामकाज सांभाळतो. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार पूर्णतः जिल्हाधिकाऱ्यावर असतो.

जिल्हाधिकारी हे राज्य प्रशासनातील गट अ मधील एक महत्त्वाचे पद असून, याची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केली जाते. या लेखातून आपण कलेक्टर माहिती मराठी (collector mahiti marathi) जाणून घेणार आहोत.

यात आपण जिल्हाधिकाऱ्यांची कामे, जबाबदाऱ्या, अधिकार व वेतन याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

Table of Contents

जिल्हाधिकारी माहिती मराठी (collector information in marathi)

collector information in marathi
नावजिल्हाधिकारी
इतर नावेकलेक्टर, जिल्हाप्रमुख
प्रकारराज्य शासनातील महत्वाचे पद
पदाची निर्मिती14 मे 1772 रोजी वॊरन हेस्टींगंज
कार्यक्षेत्रजिल्हा
शैक्षणिक पात्रताकिमान पदवीधर
निवडकेंद्रीय लोकसेवा आयोग
नेमणूकराज्यशासन
नियंत्रण विभागीय आयुक्त
राजीनामा कुणाकडे देतात ?राज्य शासन

जिल्हा व अधिकारी या दोन शब्दांपासून जिल्हाधिकारी शब्द तयार झाला आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार चालतो. या पदाचा वेगवेगळ्या कालखंडामध्ये विकास झालेला आहे.

कालखंडपदाचे नाव
मौर्य कालखंडराजुका
गुप्त कालखंडवीसयापती
मोगल कालखंडअमीर / अमल गुजर
ब्रिटिश कालखंडजिल्हाधिकारी

वॉरन हेस्टिंग्स हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल असून त्याने 14 मे 1772 रोजी जिल्ह्यातील महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्याचा प्रमुख म्हणुन जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली.

इसवी सन 1787 मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जिल्हाधिकाऱ्यास न्यायदान व दंडाधिकाराची जबाबदारी सोपवली.

सुरवातीस कलेक्टर होण्यासाठी Indian Civil Services परीक्षा उत्तीर्ण देणे बंधनकारक होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ICS सेवेचे रूपांतर IAS सेवेमध्ये करण्यात आले.

कलेक्टर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते (ias exam information in marathi)

कलेक्टर होण्यासाठी यूपीएससी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा देण्यासाठी अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापिठातून किमान पदवीधर असावा लागतो. तो भारतीय नागरिक असावा लागतो.

वय21 ते 32 वर्ष (आरक्षण सोडून)
शिक्षणमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
नागरिकत्वभारतीय
परीक्षा स्वरूपपूर्व परीक्षा
मुख्य परीक्षा
मुलाखत

कलेक्टरला पगार कितीअसतो (ias officer salary in marathi)

कलेक्टरला उत्तम पगाराचे पॅकेज आणि विविध सुविधा मिळतात. सातव्या वेतन आयोगानुसार कलेक्टरला 56,100 रुपये पगार आहे. त्यासोबतच इतर भत्तेही दिले जातात. यामुळे एका जिल्हाधिकाऱ्याचा एकूण पगार दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त असतो.

पगाराव्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यास राहण्यासाठी घर, स्वयंपाकी आणि मदतीसाठी इतर कर्मचारी, वाहन व वाहनचालक अशा सुविधा मिळतात.

जिल्हाधिकारी यांचे कार्य कोणते असतात (collector work in marathi)

 • जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्य करणे.
 • रोजगार हमी योजनेचा जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणे.
 • जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका पार पाडणे.
 • जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून भूमिका पार पाडणे.
 • जिल्हा नियोजन मंडळाचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करणे.
 • जिल्ह्यातील विभागीय परिवहन मंडळ व रस्ते बांधणे समितीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करणे.
 • विविध विकास व कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी पार पाडणे.
 • जिल्हाधिकारी या नात्याने संचारबंदी लागू करणे.
 • जिल्हयाच्या महसूल विभागाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणे.
 • जिल्ह्याचा खजिना व स्टॅंप यावर नियंत्रण ठेवणे.
 • जमिनीचा शेतसारा आकारून वसूल करणे.
 • जिल्हयात येणाऱ्या विविध आपत्तीपासून नागरिकांचे संरक्षण करणे.
 • जिल्ह्यातील विविध प्रमाणपत्र्यांचे वितरण करणे.
 • केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
 • सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीच्या निवारण करणे.
 • जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी यांच्या नेमणुका, रजा व बदल्या करणे.
 • जिल्हा स्तरावरील वर्ग 3 व 4 च्या अधिकाऱ्यांची भरती करणे.
 • दुष्काळप्रसंगी शेसार माफ करणे.
 • जिल्हा स्तरावरील तुरुंगाची तपासणी करणे व कैद्यांची मुदत पूर्व सुटका करणे.
 • जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
 • जिल्ह्याचे वार्षिक अंदाजपत्रक मांडणे.

कलेक्टरचे अधिकार माहिती मराठी (collector rights in marathi)

जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख म्हणुन जिल्ह्याचा कारभार चालवतो. जिल्ह्याचा कारभार पाहत असताना कलेक्टरला विविध अधिकार दिलेले असतात. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्याकडे असतो.

भूमि-अभिलेख, खनिज उत्खनन, आपत्ती व्यवस्थापन, रोजगार, आरोग्य, कर आकारणी अश्या विविध खात्यातील महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे असतो.

खासदार व आमदार यांच्या निधीचे व्यवस्थापन कलेक्टर करतो. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहण्याचा कलेक्टरला अधिकार असतो.

सारांश

या लेखातून आपण कलेक्टर विषयी माहिती (collector information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

जिल्हाधिकारी म्हणजे काय ?

जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा प्रमुख अधिकारी ज्याची निवड संघ लोकसेवा आयोगाकडून होऊन नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते. हे भारतातील गट अ मधील महत्वाचे पद आहे.

जिल्हाधिकारी यांची निवड कोणत्या परीक्षेद्वारे होते ?

जिल्हाधिकारी यांची निवड युपीएससी परीक्षेद्वारे होते. ही परीक्षा तीन टप्यात होते.
1. पूर्व परीक्षा
2. मुख्य परीक्षा
3. मुलाखत

Leave a Comment