कॉपीराइट म्हणजे काय ?

Copyright information in marathi – कॉपीराईट ही एक बौद्धिक संपत्ती राखून ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला नियम किंवा कायदा म्हणता येईल. तुम्ही विचार करत असाल, जमीन जुमला, घरदार, सोने-नाणे, बँकेतील ठेव ही संपत्ती आहे. पण मग ही बौद्धिक संपत्ती म्हणजे काय ?

साहित्य, कला, शैक्षणिक आणि संगीत अश्या विविध क्षेत्रात सर्जनशीलतेचा वापर करून एक नवीन संकल्पना (शोध) निर्माण केली जाते. यालाच बौद्धिक संपत्ती असे म्हंटले जाते.

सुरवातीच्या टप्प्यात बौद्धिक संपत्तीविषयक अधिकार राखून ठेवण्यासाठी काही ठोस नियम नव्हते. इसवी सन 15व्या शतकात प्रिंटिंग प्रेस आल्यानंतर कॉपीराइटची संकल्पना उदयास आली.

झाले असे, प्रिंटिंग प्रेसमुळे काम करणे स्वस्त आणि सोयीचे झाले. सुरुवातीला कॉपीराइट कायदा नव्हता, त्यामुळे कुणीही प्रेस मशीन भाड्याने किंवा विकत घेऊन कोणताही मजकूर छापायचा.

हा मजकूर छापण्यासाठी देण्याचे अधिकार लेखकांकडे नव्हते, परिणामी लेखकांना याचा जास्त फायदा मिळत नसे. इसवी सन 17व्या शतकात कोणत्या प्रेस स्टेशनला मजकूर छापण्यासाठी द्यावा, यावर नियंत्रण म्हणून कॉपीराइटचा पहिला कायदा तयार करण्यात आला.

पुढे या कायद्यात अनेक सुधारणा घडून आल्या. यातूनच अनेक साहित्यिक, गायक आणि संगीतकार, नवीन शोध, उत्पादन याविषयी कडक कायदे तयार झाले. यानुसार जो निर्माता आहे, त्याला सर्व हक्क सुरक्षित ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाला.

कॉपीराईट म्हणजे काय (copyright information in marathi) आणि या कायद्या अंतर्गत आलेले अधिकार व इतर माहिती संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Table of Contents

कॉपीराइट म्हणजे काय माहिती मराठी (Copyright information in marathi)

Copyright information in marathi

मूळ निर्मात्याने तयार केलेली सामग्री किंवा उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी त्याला देण्यात येणारे अधिकार म्हणजेच कॉपीराइट होय.

कॉपीराइट या कायद्याची सुरुवात जरी इंग्लंडमध्ये झाली असली, तरीदेखील हा कायदा आज संपूर्ण जगाने स्वीकारला आहे. या कायद्याच्या अंतर्गत निर्मात्याला आपले स्वामित्व हक्क सुरक्षित ठेवता येते.

उदा. या ब्लॉगवर लिहिण्यात येणारे लेखांचे अधिकार पूर्णपणे लेखकाकडे आहेत. यावर देण्यात येणारी माहिती शैक्षणिक हेतूसाठी असते. जर कुणी ही माहिती कमर्शियल कारणासाठी वापरली तर, त्यावर कॉपीराइट कायद्याने बंदी घालण्याचा अधिकार लेखकाकडे राखून आहे.

वरील उदाहरणाप्रमाणे, एखादे उत्पादन (डिजिटल किंवा भौतिक), पुस्तक, गाणे, एखादी गोष्ट करण्याची विशिष्ट पद्धत (नवीन शोध व संकल्पना) अश्या सर्वच गोष्टीवर कॉपीराइट लागू होते.

आता तुमच्या लक्षात आले असेल, कॉपीराइट काय आहे. आता आपण कॉपीराइट कायदा आणि अधिकार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

कॉपीराइट कायदा माहिती मराठी (copyright act in marathi)

कॉपीराइट कायदा हा मूळ लेखकाच्या किंवा निर्मात्याच्या हक्काचे संरक्षण करणारा कायदा आहे. या कायद्यामुळे इतर कुणालाही लेखकाच्या परवानगीशिवाय त्याच्या साहित्य किंवा उत्पादनाचा वापर किंवा गैरवापर करता येत नाही.

जर एखाद्याने लेखकाला श्रेय न देता त्याचे उत्पादन वापरले, तर त्यावर दिवाणी व फौजदारी या दोन्ही कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येते.

कॉपीराइट कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रत्येक देशाने स्वतःचे कायदे आणि शिक्षा देण्याचे नियम बनविणे आहे. त्यानुसार आरोपीस योग्य ती शिक्षा मिळते.

भारतीय कॉपीराइट अधिनियम मराठी (indian copyright act marathi)

इसवी सन 1914 साली इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट कायद्याची सुरुवात झाली. इसवी सन 1957 मध्ये या कायद्याचे नाव बदलून द कॉपीराइट अ‍ॅॅक्ट ऑफ इंडिया करण्यात आले. तेव्हापासून या कायद्यात अनेक बदल करण्यात आले.

एखादी कला व साहित्य, संगीतात केलेली निर्मितीवर कॉपीराइट मिळतो. बहुतांश वेळा हा लेखी करारच पाहिजे असे बंधन नसते. एखाद्या पुस्तकावर लेखक, प्रकाशक यांचे नाव असेल तरी त्यांना हा हक्क मिळतो. मात्र छापील माध्यम नसेल त्या वेळेस त्याचा करार करून घ्यावा लागतो.

निर्माणकर्ता लेखी कराराद्वारे मोबदला घेऊन प्रती कुणाला दिल्या तरी त्याच्या निर्मितीचा मूळ हक्क लेखकाकडे कायम राहतो. पण काही कारणांनी निर्माणकर्त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असेल तर अशा प्रती प्रकाशित करण्यास आणि त्याचे वितरण करण्यास निर्माणकर्ता कायद्याने थांबवू शकतो.

मूळ कर्त्यांच्या निधनानंतर त्याचे वारसदारही हा हक्क मागू शकतात. अशा प्रकारे भारतीय कॉपीराइट अधिनियम नुसार निर्माण कर्त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा असून, या कायद्यानुसार निर्मित सामग्री इतर कुणालाही परवानगीशिवाय वापरता येणार नाही.

जर कुणी हा नियम मोडला ते त्यावर दिवाणी व फौजदारी या दोन्ही कायद्याप्रमाणे कारवाई होऊ शकते. आरोप सिद्ध झाल्यास त्याला सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास किंवा 50 हजार ते दोन लाख रुपये दंड होऊ शकतो.

भारतीय कॉपीराइट अधिनियम नुसार कोणत्याही लेखक, उत्पादने (भौतिक व डिजिटल), संगीत व गायक, विज्ञान आणि तंत्र नवीन संकल्पनेच्या हक्काचे संरक्षण करण्यात येते. अपवाद. वृत्तपत्र आणि बातम्यांवर हा नियम लागू होत नाही.

पेटंट आणि कॉपीराइट एकच आहे का (patent and copyright difference marathi)

पेटंट आणि कॉपीराइट दोन्ही बौद्धिक संपत्तीचे प्रकार असून यामध्ये बरेच साम्य आहे. तरीदेखील हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ट्रेडमार्क हा देखील बौद्धिक संपत्तीचा प्रकार आहे. पण ट्रेडमार्क एखाद्या डिझाईन्स, नाव आणि लोगोसाठी वापरला जातो.

पेटंट हे त्या-त्या देशापुरता किंवा प्रदेशापुरता मर्यादित असते. म्हणजे जर भारतात नोंदवलेलं पेटंट कोणी युरोपमध्ये वापरलं तर आपण कारवाई करू शकत नाही. कारण युरोपात भारतीय कायदे लागू होत नाहीत.

जगभरात आपले पेटंट सुरक्षित करण्यासाठी लोक वेगवेगळे पेटंट नोंदवतात. जसे, भारत, चीन, अमेरिका, युरोपिअन युनियन इत्यादी. ह्यामुळेच पेटंट ही एक अत्यंत खर्चिक बाब आहे.

संगणक सॉफ्टवेअर, साहित्य व कला, ग्राफिक डिझाईन्स, संगीत व गायन, वेबसाइट सामग्री आणि उत्पादने (भौतिक व डिजिटल) इत्यादींवर कॉपीराइट हक्क लागू होतो.

एखादी पद्धत, उपकरण , नवीन औषध किंवा त्याची नवीन रचना, संगणकाशी निगडित काही नवीन शोध, इलेक्ट्रिक सर्किट अश्या नावीन्यपूर्ण बाबींवर पेटंट घेता येतात.

कॉपीराइट कायदा 1957 नुसार हक्काची मर्यादा मूळ निर्माणकर्त्यांच्या मृत्यूनंतर 60 वर्षापर्यंत असते. तोपर्यंत होणारा आर्थिक फायदा मूळ मालकाला मिळतो. कर्त्यांच्या मृत्यूनंतर त्या बौद्धिक संपत्तीचे हक्क त्याच्या वारसदारांकडे जातात आणि 60 वर्षानंतर ती संपत्ती सगळ्यांसाठी खुली करण्यात येते.

भारतीय पेटंट 1970 कायद्यानुसार पेटंटची मर्यादा २० वर्षासाठी पेटंटच्या मालकाला बहाल केली जाते, आणि त्यानंतर ते सर्वांसाठी खुले करण्यात येते.

भारतात पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराइट नोंदणी कशी करावी (register patent, copyright & trademark in india mahiti)

भारतात पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराइट नोंदणी करण्यासाठी सरकारी कार्यालये आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपल्या पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराइटची नोंदणी करता येते.

पेटंट आणि ट्रेडमार्क मुख्य कार्यालयबौद्धिक संपदा भवन,
एस एम रोड, दोस्ती एकर्स,
अँटॉप हिल मुंबई
महाराष्ट्र 400037
कॉपीराइट मुख्य कार्यालयबौद्धिक संपदा भवन, प्लॉट नं. 32, सेक्टर 14, द्वारका,
नवी दिल्ली 110078
टेलिफोन 011-28032496

सारांश

या लेखातून आपण कॉपीराइट म्हणजे काय ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यात आपण पाहिले की, ट्रेडमार्क, पेटंट आणि कॉपीराइट याविषयी देखील माहिती अभ्यासली.

याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा. बाकी लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कॉपीराईट म्हणजे काय ?

बौद्धिक संपदेबाबत कायद्याने देण्यात आलेले आणि संरक्षित केलेले अधिकार म्हणजे कॉपीराईट होय.

पेटंट म्हणजे काय ?

एखादे विशिष्ट उपकरण, पद्धत किंवा आविष्कार केलेल्या व्यक्ती किंवा संस्थेला कायद्याने दिलेले संरक्षण होय.

ट्रेडमार्क म्हणजे काय ?

एखाद्या व्यावसायिकाने त्याच्या व्यापाराला दिलेले नाव आणि चिन्ह कायद्याने संरक्षित करणे, म्हणजे ट्रेडमार्क होय.

भारतीय कॉपीराइट अधिनियम कायदा केव्हा अस्तित्वात आला ?

भारतीय कॉपीराइट अधिनियम कायदा इसवी सन 1914 साली अस्तित्वात आला. यावेळी या कायद्याचे नाव इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट असे होते. पुढे इसवी सन 1957 मध्ये या कायद्याचे नाव बदलून द कॉपीराइट अ‍ॅक्ट करण्यात आले.

भारतात पेटंट कायदा कधी अस्तित्वात आला ?

भारतात पेटंट कायदा 1 जानेवारी 1912 रोजी अस्तित्वात आला.

भारतात ट्रेडमार्क कायदा केव्हापासून लागू झाला ?

इसवी सन 1999 पासून भारतात ट्रेडमार्क कायदा लागू झाला.

पुढील वाचन :

  1. मराठीतील कवी आणि साहित्यिक
  2. महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा माहिती
  3. वाचनाचे प्रकार किती व कोणते ?
  4. शोध शून्याचा संख्या वाचन कसे करावे ?
  5. हवामान अंदाज कसा शोधायचा ?

Leave a Comment