भारतातील कुटिरोद्योग माहिती मराठी

Categorized as Blog

Cottage Industry In India Mahiti – लोह आणि पोलाद, कापड, ताग, साखर, सिमेंट, कागद, पेट्रोकेमिकल, ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग आणि विमा अश्या विविध उद्योग आणि व्यवसायांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत चांगली जडणघडण होत आहे.

भारतात असणाऱ्या व्यवसायांच्या आकारानुसार त्यांचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  1. कुटिरोद्योग – या उद्योगात कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने, स्थानिक कच्च्या मालाचा तसेच ऊर्जेचा वापर न करता केवळ मानवी शक्ती वापरून उत्पादन केले जाते.
  2. लघुतम उद्योग – या उद्योगात उत्पादनासाठी ऊर्जा, यंत्र आणि कामगार वापरले जाते. तसेच यामध्ये 5 लाखांपर्यंत गुंतवणूक केलेली असते.
  3. लघु उद्योग – या उद्योगात देखील 3 कोटीपर्यंत गुंतवणूक केलेली असते. यामध्ये यंत्र आणि कामगारांच्या मदतीने उत्पादन घेतले जाते.
  4. मोठे उद्योग – वरील तिन्ही उद्योगाच्या उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या आणि जास्त गुंतवणुक असणाऱ्या व्यवसाय संस्थेला मोठा उद्योग असा म्हणतात.

या लेखातून आपण भारतात असणाऱ्या कुटिरोद्योगांची (cottage industry in india mahiti) मराठीत माहिती जाणून घेणार आहोत.

कुटिरोद्योग म्हणजे काय?

What is cottage industry marathi – उत्पादनाचे प्रमाण, कामगारांची संख्या, गुंतवलेले भांडवल, वीज आणि यंत्राचा वापर अशा विविध गोष्टींचा विचार करून व्यवसाय संस्थेचा आकार ठरविला जातो. याच गोष्टीचा अभ्यास आपण या लेखात करणार आहोत.

सुरुवातीच्या काळात वाफेच्या शक्तीचा शोध लागण्याच्या अगोदर उत्पादने अवजारे वापरून तयार केले जात असे. यासाठी माणसाची शक्ती आणि कौशल्य उपयोगात येत. यातूनच अनेक नवनवीन उद्योग विकसित झाले.

या उद्योगात तयार केलेल्या वस्तू देशात आणि परदेशात विक्री होऊ लागल्या. या प्रकारातील उत्पादन कामगारांच्या घराच्या आवारात होत असल्याने या व्यवसाय संस्थांना कुटिरोद्योग नाव देण्यात आले.

एखादा कारागीर स्वतःच्या घरात, स्वतःच्या मालकीची अवजारे वापरून कुटुंबातील किंवा वेतन देऊन पाच पेक्षा कमी व्यक्तींच्या मदतीने ज्या उद्योगात काम करतो त्या उद्योगास कुटिरोद्योग असे म्हणतात.

कुटिरोद्योग वैशिष्ट्य काय आहेत?

1. कुटिरोद्योगात ऊर्जेचा वापर केला जात नाही, हा उद्योग हाताच्या शक्तीने चालवली जाणारी अवजारे वापरून केला जातो. या उद्योगात काही वेळा जनावरांची शक्ती वापरली जाते.

2. कुटिरोद्योगात उत्पादक स्वतःच्या घरातील जागा कामासाठी वापरतो. या उद्योगात त्याला कुटुंबातील व्यक्ती मदत करतात. काही वेळा छोट्या कारखान्यात उत्पादनासाठी कामगार ठेवले जातात, पण कामगारांची संख्या कमी असते.

3. कुटिरोद्योगात कमी भांडवल लागते. साधारणपणे उत्पादक आपल्या मालकीची जागा आणि साधनाच्या मदतीने हा व्यवसाय चालवतात.

4. उत्पादनासाठी कच्चामाल जवळच उपलब्ध असतो, यावर प्रक्रिया करून वस्तू तयार केले जातात. आपल्याच गावात किंवा आजूबाजूच्या गावातील ग्राहकांसाठी हे उत्पादन केले जाते. त्यामुळे कुटिरोद्योगात मर्यादित बाजारपेठ असते.

5. पूर्वीच्या काळी वंशपरंपरेने उद्योग करण्यात यायचे. एकाच गावात लागणाऱ्या वस्तू गावातील घराघरात होत असत. उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तू उपभोग वस्तू स्वरूपाच्या असतात.

कुटिरोद्योगांचे प्रकार माहिती मराठी (Cottage Industry Types Marathi)

साधारणपणे कुटिरोद्योगांचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार व्यवसायाच्या स्वरूपावरून वर्गीकरण केले जाते. यामध्ये प्रामुख्याने शेती करणाऱ्यांचा जोडधंदा, ग्रामीण आणि नागरी भागात चालणारे व्यवसायांचा विचार केला जातो.

स्वरूप (subtypes)उदाहरण (a cottage industry produces marathi)
शेती करणाऱ्यांचा जोडधंदाहाताने सुत काढणे किंवा कापड विणणे, टोपल्या तयार करणे, धान्य दळून पीठ तयार करणे, रेशमचा धागा बनवणे.
ग्रामीण स्वरूपाचे व्यवसायमातीची भांडी बनविणे, लोखंडी व लाकडी वस्तू बनविणे, कातडी कमविणे
ग्रामीण आणि नागरी स्वरूपाचे व्यवसाय हातमागांवर कापड विणणे, गालिचे बनविणे, काचेच्या बांगड्या बनविणे, खेळणी बनविणे, कापड रंगविणे आणि छपाई काम
व्यवसायाच्या स्वरूपावरून केलेले वर्गीकरण

तर दुसरा कच्च्या मालाच्या स्वरूपावरून ठरविला जातो. यामध्ये कच्चामाल कोणत्या प्रकारचा आहे, हा विचार ठेऊन वर्गीकरण केले जाते. अशा उदाहरणांची खाली यादी दिली आहे.

  1. वेगवेगळ्या धाग्यांपासून कापड बनविण्याचा उद्योग
  2. लाकडापासून वस्तू बनविणे
  3. कातड्यापासून चांबडे तयार करणे आणि त्यापासून वस्तू बनवणे
  4. धातूच्या वस्तू बनविणे
  5. माती आणि वाळू चा वापर करून भांडी बनवणे
  6. अन्नपदार्थ तयार करणे

Related – भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती

सारांश

या लेखातून आपण भारतातील कुटिरोद्योग माहिती मराठी (cottage industry in india mahiti) जाणून घेतली. यात आपण पाहिले की, कुटिरोद्योग म्हणजे उत्पादकाने वीज आणि यंत्राच्या शक्तीशिवाय चालवलेला उद्योग होय. यात उत्पादकाचे घरचे सदस्य त्याला मदत करतात.

FAQs

कुटिरोद्योग व्याख्या मराठी

एखादा कारागीर स्वतःच्या घरात, स्वतःच्या मालकीची अवजारे वापरून कुटुंबातील किंवा वेतन देऊन पाच पेक्षा कमी व्यक्तींच्या मदतीने ज्या उद्योगात काम करतो त्या उद्योगास कुटिरोद्योग असे म्हणतात.

कुटिरोद्योग यांची यादी मराठी

कुटिरोद्योग यांची यादी खूप मोठी आहे. पण कापड विणणे, मातीच्या व धातूच्या वस्तू बनवणे आणि त्या रंगविणे, काचेच्या वस्तू व बांगड्या बनवणे, छपाई काम करणे आणि अन्नपदार्थ बनविणे हे प्रमुख उद्योग आहेत.

कुटिरोद्योग चे महत्व काय आहे?

भारतात कुटिरोद्योग महत्वाचे मानले जातात. कारण यामुळे देशातील लोकांना रोजगार मिळतो, ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधारते, स्थानिक कच्चामाल आणि कौशल्यांचा वापर होतो.
तसेच वस्तूचे उत्पादन, कच्च्या मालाची खरेदी, उत्पादन विक्री आणि वित्त पुरवठा अशा अडचणी जास्त येत नाही.