भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार माहिती

Dances of different states in india marathi – विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला असला तरीदेखील पूर्वीपासूनच नृत्यकलेकडे कायमच मनोरंजना व्यतिरिक्त व्यावसायिक दृष्टीने पाहिले जाते. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असून या क्षेत्रात अनेकांनी आपापल्या परीने योगदान दिलेले आहे.

भारतातील राज्यात लोकनृत्याचे विविध प्रकार प्रसिद्ध आहेत. साधारण भारतात 200 पेक्षा अधिक लोकनृत्ये प्रचलित असून 10 शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत.

या लेखातून आपण भारतातील राज्य आणि त्या राज्यातील नृत्य प्रकार (Dances of different states in india marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार माहिती (Dances of different states in india marathi)

Dances of different states in india marathi

भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेचा समावेश होतो. भारतील विविध ठिकाणची संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले.

मुळात नृत्य ही ललित कला म्हणून ओळखली जाते. नृत्य ही 64 कलांपैकी एक कला आहे. यामुळे या कलेच्या माध्यमातून आपले नाव व पैसा मिळवण्यासाठी नृत्य क्षेत्राचा इतिहास व आवड असणे गरजेचे असते.

भारतात 200 पेक्षा अधिक लोकनृत्ये आणि दहा शास्त्रीय नृत्यशैली प्रचलित आहेत. यामधील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती म्हणून ओळखल्या जातात. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार माहिती मराठी (List of Indian folk dances in marathi)

राज्यनृत्यप्रकार
अरुणाचल प्रदेशबार्दो छम
आंध्र प्रदेशकुचिपुडी, कोल्लतम
आसामबिहु नृत्य, जुमर नाच
उत्तर प्रदेशकथक, चरकुला
उत्तराखंडगढवाली
उत्तरांचलपांडव नृत्य
ओरिसाओडिसी नृत्य, छऊ नृत्य
कर्नाटकयक्षगान, हत्तारी
केरळकथकली
गुजरातगरबा, दांडिया रास
गोवामंडो
छत्तीसगढपंथी
जम्मू आणि काश्मीररौफ
झारखंडकर्मा, छाऊ
मणिपूरमणिपुरी नृत्य
मध्य प्रदेशकर्मा, चरकुला
महाराष्ट्रलावणी
मिझोरमखान्तुम
मेघालयलाहो
तामिळनाडूभरतनाट्यम
पंजाबभांगडा, गिद्धाह(गिद्दा)
बिहारछऊ नृत्य
राजस्थानघुमर नृत्य

1. बार्डो छम हे भारतातील अरुणाचल प्रदेशातील हिमालयीन बौद्ध जमातींचे पारंपारिक लोकनृत्य आहे. वाईटावर चांगल्याच्या विजय होतो, अशा कथांवर आधारित हे नृत्य केले जाते.

2. कुचिपुडी ही आंध्र प्रदेशातील नृत्यशैली आहे. या नृत्य शैलीचा विकास कृष्णदेव आर्य यांच्या काळात इ.स. 1510 ते 1530 या काळात झाला. या नृत्य शैलीला अट्ट भागवतम असेही म्हंटले जाते.

3. कोल्लतम हे भारताच्या दक्षिणेकडील सर्वात लोकप्रिय नृत्य आहे. हे एक तालबद्ध हालचाली, गाणी आणि संगीत यांचे संयोजन असणारे नृत्य आहे. हे नृत्य साधारणपणे ग्रामीण भागातील सणांमध्ये साजरे केले जाते.

4. बिहु नृत्य हे भारतातील आसाम राज्यातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. या नृत्यातून आसामी संस्कृतीचे दर्शन घडते. बोहाग बिहू हा सण आसामचा राष्ट्रीय सण आहे, या सणाला आसामी लोक नवीन वर्ष साजरे करतात. या सणाच्या नावावरून या नृत्य शैलीचे नाव पडले.

5. झुमर, झूमर, घुंबर अश्या विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या नृत्यशैली आसाम आणि पंजाब राज्यात पाहायला मिळते. झूमर म्हणजे डोलत आहे. झुमर हे आनंदाचे नृत्य असून हे सहसा लग्न समारंभात केले जाते.

6. कथक किंवा कथ्थक ही भारतील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे.

7. चरकुला हे उत्तर प्रदेशातील ब्रज भागात केले जाणारे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. होळीनंतर तिसर्‍या दिवशी राधाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी बुरखा घातलेल्या स्त्रिया त्यांच्या डोक्यावर मोठ्या बहुस्तरीय वर्तुळाकार लाकडी पिरॅमिडचा समतोल राखत हे नृत्य करतात.

8. गढवाली हे उत्तराखंडमधील एक पारंपारिक लोकनृत्य असून तलवार पद्धतीने लग्नाच्या मिरवणुकीसोबत आणि विविध शुभ प्रसंगी केले जाते.

9. महाभारतातील कथांचे गायन, नृत्य आणि पठणाला पांडव लिला म्हणतात. अनेक गढवाली लोक स्वतःला पांडवांचे वंशज म्हणून मानतात.

10. ओडिसी नृत्य ही ओडिशा राज्यातील एक शास्त्रीय नृत्यशैली आहे. मंदिरशिल्पांच्या मुद्रा हे ओडिसी नृत्याचा विशेष होय. भरतनाट्यम् आणि कथक या नृत्यप्रकारांचे मिश्रण या शैलीत दिसून येते.

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार माहिती (folk dances of india state wise marathi)

11. छऊ नृत्य हे ओडिशा आणि झारखंड राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याची सुरुवात झाली. छाऊ म्हणजे मुखवटा, मुखवटा घालून हे नृत्य केले जाते.

12. यक्षगान हा कर्नाटकातील लोकनृत्याचा कलाप्रकार आहे. कर्नाटकाच्या सांप्रदायिक कलाप्रकारांमध्ये हा कला प्रकार सादर केला जातो. सुरुवातीला मराठी नाट्यसंगीतावर यक्षगानाचा काही प्रमाणात प्रभाव होता.

13. कथकली ही केरळ राज्यातील नृत्य कलेची प्रसिद्ध शैली आहे. कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कलीचा अर्थ आहे खेळ.

14. अभिनय, नृत्य आणि नाट्य अशा तीन कलांच्या समन्वयातून हा कलाप्रकार सादर केला जातो. साधारणपणे रामायण, महाभारत आणि विविध पुराणातील कथा नृत्याच्या माध्यमातून सादर करताना हे नृत्य करतात.

15. गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक प्रसिद्ध नृत्याचा प्रकार आहे. गुजरात राज्यात नवरात्रीला विशेषतः गरबा आणि दांडिया खेळला जातो. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी रास दांडिया आणि गरबा नृत्य करण्याची परंपरा आहे.

16. मंडो हे गोवा राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे. पंथी हे छत्तीसगड राज्यात सादर करण्यात येणारे प्रसिद्ध लोकनृत्य आहे.

17. जम्मू काश्मीरमध्ये रौफ हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. झारखंड राज्यात कर्मा आणि छाऊ हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे.

18. मणिपुरी ही मणिपूर राज्यातील प्रसिद्ध नृत्यशैली आहे. कृष्णभक्ती हा या नृत्यप्रकाराचा मुख्य गाभा आहे. याचा उगम पूजाविधी या स्वरूपात झाला. मणिपुरमध्ये वैष्णव पंथाच्या प्रसार करताना हे नृत्य केले जाते.

19. मध्यप्रदेश राज्यात कर्मा आणि चरकुला हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. कर्मा लोकनृत्य भाग्य देवतेच्या पूजेदरम्यान केले जाते. या देवतेला लोक नशिबाची देवता चांगल्या आणि वाईट भाग्याचे कारण मानतात.

20. लावणी हा महाराष्ट्रातील नृत्याचा कलाप्रकार आहे. लवण म्हणजे सुंदर, लवण या शब्दापासून लावणी शब्द तयार झाला आहे. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम लावणीमधून पाहायला मिळतो.

21. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंगात दिसते. नृत्यप्रधान लावणी, अदाकारीप्रधान लावणी आणि गानप्रधान लावणी (बैठकीची लावणी) असे लावणीचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

भारतातील प्रसिद्ध नृत्य प्रकार माहिती (folk dance of india with states marathi)

22. खान्तुम हा नृत्य प्रकार मिझोरम राज्यात पाहायला मिळतो. मेघालय राज्यात लाहो हा नृत्य प्रकार खूप प्रसिद्ध आहे.

23. भरतनाट्यम् हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. भाव, राग आणि ताल ही भरतनाट्यमची तीन मुख्य अंग असतात. या नृत्यास दासीअट्ट्म व सदिर (Sadir) या नावानेही ओळखले जाते.

24. भरतनाट्यम्ए ही एकल नृत्यशैली असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. यामध्ये मृदंगम, तालम, वीणा, बासरी आणि घटम इत्यादी वाद्य वापरली जातात.

25. पंजाबची शान म्हणून भांगडा नृत्य ओळखले जाते. बैसाखी सण करताना तसेच विवाहप्रसंगी किंवा इतर आनंदप्रसंगी हे नृत्य मोठ्या जोशात केले जाते. मुळात भांगडा हा अत्यंत जोशपूर्ण असा नृत्यप्रकार आहे.

26. पंजाब राज्यात भांगडा आणि गिद्धाह (गिद्दा) ही दोन नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहेत. बल्ले-बल्ले, हडीप्पा अशा आरोळ्या मारत केला जाणारा नृत्यप्रकार सर्व भारतात लोकप्रिय आहे.

27. गंभीरा, छऊ नृत्य आणि घुमर नृत्य पश्चिम बंगाल, बिहार आणि राजस्थान राज्यात खूप प्रसिद्ध आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार माहिती (Dances of different states in india marathi) जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ?

कथक नृत्य प्रकार केरळ राज्याचा आहे. याला कथकली देखील म्हणतात.

भारतात शास्त्रीय नृत्य प्रकार किती व कोणते आहेत ?

भारतात मुख्य चार शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे.
1. कथक
2. मणिपुरी
3. भरतनाट्यम्
4. कथकली
तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्य प्रकारच्या भगिनी शैली आहेत.

महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहे ?

महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकनृत्य लावणी हे आहे. लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम म्हणून ओळखले जाते.

भारतीय नृत्य भाषेचे खास वैशिष्ट्य कोणते आहे ?

भारतीय नृत्य भाषेचे खास वैशिष्ट्य म्हणजे भावना आणि अभिनय शब्दातून दाखविण्यासाठी हात किंवा नृत्यमुद्रांचा वापर केला जातो. तसेच काव्य, अभिनय, गायन, वादन, चित्र, शिल्प अशा विविध कलांचा संगम म्हणजे भारतीय नृत्यकलेत पहायला मिळतो.

विष्णूच्या मोहिनी रुपावर आधारित कोणते नृत्य आहे ?

विष्णूच्या मोहिनी रुपावर आधारित मोहिनी अट्टम हे नृत्य आहे.

पुढील वाचन :

  1. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची माहिती मराठी
  2. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी नाटक माहिती
  3. महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा माहिती मराठी
  4. मराठीतील कवी आणि साहित्यिक
  5. कलामहर्षी बाबूराव पेंटर मराठी माहिती

Leave a Comment