डिमॅट अकाउंट माहिती मराठी (Demat account information in marathi)

By | November 11, 2022

Demat account information in marathi – डिमॅट अकाउंट म्हणजे डिमटेरियलायझेशन, यामधे गुंतवणूकदाराने खरेदी केलेले समभागाचे डिजिटल प्रमाणपत्राच्या स्वरूपात रूपांतरित करून जमा करणे होय. भारतात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने 1996 साली डीमॅट खात्याची ओळख करून दिली. तेव्हापासून पूर्वीसारखे शेअर्सचे भौतिक प्रमाणपत्र सांभाळण्याची जबाबदारी बंद झाली.

सुरुवातीला कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करताना प्रत्यक्ष देवाणघेवाण होत होती. यामध्ये लांबलचक कागदपत्रे सादर करण्यात बराच वेळ जायचा. यानंतर 1996 या वर्षी शेअर्सचे डिमटेरियलायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

यानुसार शेअर खरेदी केलेली भौतिक प्रमाणपत्रे समतुल्य क्रमांक आणि मूल्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सिक्युरिटीजमध्ये रूपांतरित करुन गुंतवणूकदाराच्या डीमॅट खात्यात जमा करतात.

या लेखात आपण डिमॅट अकाउंट माहिती मराठी – Demat account information in marathi याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच डिमॅट अकाउंट उघडण्यापूर्वी त्याची गुंतवणूक धारकांना गरज काय आहे आणि डिमॅट खाते काम कसे करते आणि डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे याविषयीं माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाबीटीएसटी व्यापार माहिती (btst trade in marathi)

Table of Contents

डिमॅट अकाउंट माहिती मराठी – Demat account information in marathi

Demat account information in marathi
नाव डिमॅट खाते
प्रकारशेअर बाजारातील सुविधा
सुरुवात1996
कार्यगुंतवणूकदाराने खरेदी केलेले शेअर्स डिजिटल प्रमाणपत्राच्या सहाय्याने सुरक्षित जमा करणे.
नियंत्रणसेबी (सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया)
Demat account information in marathi

Demat account meaning in marathi – डिमॅट अकाउंट म्हणजे डिमटेरियलायझेशन, यामधे गुंतवणूकदाराने खरेदी केलेले समभागाचे डिजिटल प्रमाणपत्राच्या स्वरूपात रूपांतरित करून जमा करणे होय.

डिमॅट खात्याचा वापर भारतात इसवी सन 1996 पासून सुरू झाला. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस या दोन डिपॉझिटरी सहभागी म्हणून कार्य करतात.

सुरुवातीला डिमटेरियलायझेशन प्रक्रिया केली जात नव्हती त्यावेळस, भौतिक स्वरूपात शेअर्सची प्रमाणपत्र दिली जात होती. हे प्रमाणपत्र जास्त दिवस ठेवल्याने ती खराब होण्याची भीती कायम वाटत असायची. त्यासोबतच हे प्रमाण पत्र गहाळ होण्याची भीती होती. परिणामी शेअर खरेदी धारकाला जास्त जोखीम घेऊन खरेदी केलेल्या शेअर्सची प्रमाणपत्र जपून ठेवावी लागत होती. हि प्रमाणपत्र कोणी चोरी करेल, गहाळ होईल किंवा खराब होईल याची काळजी घ्यावी लागत असे.

डिमॅट खात्याच्या सोयीनंतर गुंतवणूकदारांना सहजपणे समभागांची खरेदी आणि विक्री कागदपत्रांची गरज न पडता करता येऊ लागली.

सध्या ऑनलाइन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने ट्रेडिंग करता येते. ऑनलाइन पद्धतीने केलेले ट्रेडिंग केव्हाही चांगलेच असते, कारण त्यामध्ये व्यवहार पूर्णपणे पारदर्शी असतो. याउलट ऑफलाइन पद्धतीने केलेले ट्रेडिंग वेळखाऊ आणि धोकादायक असते. अर्थात आपल्या बनावट कागदपत्र आपली फसवणूक होण्याचा धोका असतो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खाते खोलणे आवश्यक बनले आहे.

हा लेख जरूर वाचाशेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा (How to identify trend in stock market)

गुंतवणूकदाराला डिमॅट खात्याचे फायदे माहिती – demat account benefits in marathi

Demat account benefits for investors – डिपॉझिटरी सिस्टीममुळे कागदी प्रमाणपत्रांशी संबंधित धोके जसे कि, गहाळ होणे, चोरीला जाणे, फाटणे, नकली प्रमाणपत्र मिळणे कमी झाले. ह्या सिस्टीममुळे शेअर्सचे त्वरित वितरण होते आणि नोंदणीसाठी लागणारा वेळ वाचतो.

गुंतवणूकदाराशी जलद संपर्क करता येतो. स्वाक्षरी न जुळल्याने वितरणात होणारे व्यवहार होत नाहीत. शेअर विक्रीतून येणारे पैसे त्वरित खात्यात जमा होतात. शेअर हस्तांतरणावर स्टॅम्प ड्युटी आकारली जात नाही.

कंपनी आणि दलालांना डिमॅट खात्याचे फायदे माहिती – demat account benefits in marathi

demat account benefits for broker – सेटलमेंट मध्ये होणाऱ्या विलंबाचा धोका टळतो. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या व्यवहारांमुळे नफ्याचे प्रमाण वाढते. बनावट व्यवहाराचा धोका टळतो. गुंतवणूकदारांमधला विश्वास वाढतो.

demat account benefits for company – डिपॉझिटरी सिस्टीममुळे नवीन शेअर्स इश्यू करणे प्रिंटींग आणि वाटपामध्ये लागणारा खर्च कमी झाल्यामुळे कमी खर्चाचे झाले.

डिमॅट खाते कसे काम करतात – how does demat account work in marathi

शेअर जारी करणारी कंपनी, डिपॉझिटरी, मालक किंवा लाभार्थी
डिपॉझिटरी सहभागी (DP) किंवा ब्रोकरेज फर्म या घटकांनी मिळून डिमॅट खाते वापरले जाते. यातील प्रत्येक घटकाचे वेगवेगळे कार्य आहे, ते पुढीलप्रमाणे.

CDSL full form in marathi सेंट्रल डेपोसिटोरी सर्विसेस लिमिटेड
NSDL full form in marathi नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

डिपॉझिटरीज – सध्या भारतामध्ये दोन डिपॉझिटरीज आहेत. या SEBI मध्ये नोंदणीकृत केलेल्या असतात. यावर सेबीचे संपूर्ण नियंत्रण असते. पहिला सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ सिक्युरिटीज लिमिटेड (CDSL) तर दुसरा नॅशनल डिपॉझिटरी ऑफ सिक्युरिटीज लिमिटेड (NSDL) या डिपॉझिटरीज आपल्या वतीने डिमॅट खाते ठेवतात.

डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) – हा डिपॉझिटरीचा एजंट असतो. याचे मुख्य काम गुंतवणूकदाराशी संवाद साधणे होय. स्टॉक ब्रोकर्स आणि इतर वित्तीय संस्था किंवा बँका यांचा डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यात समावेश होतो.

Demat account information in marathi – स्टॉक ब्रोकर आणि डिपॉझिटरीज आपण खरेदी-विक्री केलेल्या शेअर्सची नोंद करत असते. या नोंदी स्वयंचलित पद्धतीने केले जाते. डिमॅट खात्याचा ओळख क्रमांक हा सर्वांचा वेगवेगळा असून सुरक्षित असतो. डिमॅट खाते हे बँकेप्रमाणेच असून यामध्ये जोड खाते काढता येते. डिमॅटचा अकाउंट नंबर हा 16 अंकी असून पहिले आठ अंक DP आयडी आहेत आणि शेवटचे 8 ग्राहक आयडी (गुंतवणूकदार खाते) आहेत.

डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरिअलायझेशन माहिती (difference between dematerialization and rematerialization)

dematerialization and rematerialization in marathi – डीमॅट खात्यामुळे सिक्युरिटीजचे विविध प्रकारांमध्ये रुपांतरण करून सहज रुपांतर करता येते. तुमच्या डीपी-डिपॉझिटरी पार्टिसिपंटला डिमटेरिअलायझेशनची सूचना देऊन, तुम्ही त्याला फिजिकल शेअर सर्टिफिकेट इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी औपचारिकता पूर्ण करण्यास सांगू शकता.

गुंतवणूकदार त्याच्या इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी होल्डिंग्सचे रीमटेरियलायझेशनच्या प्रक्रियेद्वारे भौतिक स्वरूपात रूपांतरित करू शकतो, ज्यामध्ये DP द्वारे RRF – Remat विनंती फॉर्म भरावा लागतो.

हा लेख जरूर वाचाशेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे (how to become successful trader in stock market)

डिमॅट खाते कसे उघडायचे (demat account opening process in marathi)

डिमॅट खाते उघडण्यासाठी (Demat account opening documents) आधारकार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असते. हे कागदपत्र घेऊन आपल्याला हव्या त्या स्टॉक ब्रोकर च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्ज करत असताना आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.

खाते उघडण्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) निवडा. डिपॉझिटरीसह लाभार्थी मालक (बीओ) खाते उघडले जाते. पत्ता, ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या प्रतींसह गुंतवणूकदाराचे सर्व तपशील देऊन खाते उघडण्याचा फॉर्म भरला जावा.

खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. पडताळणीसाठी सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात सादर करावीत. तुम्ही डीपीला भरावे लागणार्‍या शुल्काच्या तपशिलांसह नियमांची एक प्रत तुम्हाला पुरविले जाते.

गुंतवणूकदाराने प्रदान केलेल्या सर्व तपशील आणि कागदपत्रांची पुष्टी करण्यासाठी डीपीच्या प्रतिनिधीद्वारे वैयक्तिक पडताळणी केली जाईल. एकदा मंजूर झाल्यानंतर आणि कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, तुमचे डीमॅट खाते उघडले जाईल आणि चालू केले जाईल.

डिमॅट खाते बंद कसे करावे (how to close demat account in marathi)

डिमॅट खाते ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बंद करता येते. ऑफलाइन पद्धतीने बंद करण्यासाठी डिमॅट अकाउंट नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि खाते बंद करण्यासाठी लागणारा फॉर्म व्यवस्थित रित्या भरून आपल्या स्टॉक ब्रोकरकडे जमा करावा लागतो. हा फॉर्म जमा केल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये आपल्या डिमॅट अकाउंट बंद केले जाते.

ऑनलाईन पद्धत अतिशय सोपी आणि सरळ आहे, यामध्ये फक्त तुम्हाला डिमॅट खाते क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांची माहिती भरलेला ईमेल आपल्या स्टॉप ब्रोकरला पाठवावा लागतो. त्यानंतर स्टॉक ब्रोकर प्रत्युत्तर म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा डिमॅट अकाउंट बंद करायचे का विचारेल, या वेळेस तुम्ही डिमॅट अकाउंट बंद करायचे याची खात्री केल्यानंतर पुढील पंधरा दिवसात तुमच्या डिमॅट अकाउंट बंद केले जाते.

सारांश

डिमॅट अकाउंट माहिती मराठी – Demat account information in marathi याविषयी आपण माहिती जाणून घेतली. तसेच आपण डिमॅट कसे काम करते, हे खाते कसे उघडावे, खाते बंद कसे करावे याविषयी माहिती पाहिली.

डिमॅट अकाउंट माहिती मराठी – Demat account information in marathi तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

डिमॅट खात्याचा वापर भारतात केव्हापासून सुरू झाला ?

डिमॅट खात्याचा वापर भारतात इसवी सन 1996 पासून सुरू झाला.

डिमटेरियलायझेशन म्हणजे काय ?

वित्त आणि आर्थिक कायद्यामध्ये, डीमटेरिअलायझेशन म्हणजे भौतिक स्वरुपातील शेअर्सचे रूपांतर डिजिटल प्रमाणपत्रात करणे होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *