Dhamma Chakra PraVartan Din 2023 In Marathi – बौद्ध हा भारतातील एक प्रमुख धर्म आहे. या धर्मात दरवर्षी अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.
हा दिवस बौद्ध धर्माचा एक महत्वाचा दिवस मानला जातो कारण याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. या लेखातून आपण धम्म चक्र प्रवर्तन दिन माहिती मराठी (dhamma chakra pravartan din 2023 in marathi) याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
धम्म चक्र प्रवर्तन दिन माहिती मराठी (dhamma chakra pravartan din 2023 in marathi)

नाव | धम्म चक्र प्रवर्तन दिन |
प्रकार | बौद्ध धर्माचा सण |
केव्हा साजरा करतात ? | 14 ऑक्टोबर तसेच अशोक विजयादशमी (दसरा) |
साजरा करणारे | बौद्ध धर्मीय |
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा ओळखला जातो.
अशोक सम्राटाने मोठी धम्मक्रांती केली होती, त्यामुळे भीमराव आंबेडकरांनी अशोक विजयादशमीला धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले.
नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला, म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे देशभरातून दरवर्षी लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात येतात.
देश-विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक तसेच इतर राजकीय व्यक्ती या उत्सवात सहभागी होतात. 2 ऑक्टोबर 2006 रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सव सोहळ्याला देश-विदेशांतून 10 लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती.
इसवी सन 1957 पासून बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनी 2 दिवस आधीच दीक्षाभूमीला येतात. या ठिकाणी आलेले अनुयायी बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेट देतात.
तसेच कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिंचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय या ठिकाणी भेट देतात.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात.
Related – बौद्ध धर्माची माहिती
धम्मचक्र प्रवर्तन दिवस कसा साजरा करण्यात येतो (why dhamma chakra pravartan din is celebrated)
धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी बौद्ध अनुयायी दोन दिवस अगोदरच दीक्षा भूमीवर जमा होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवचन, बौद्ध दीक्षा देण्याचा सोहळा, धम्मपरिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सुरुवात बुद्ध वंदना करून सुरू होते. यानंतर दीक्षाभूमीतील गौतम बौद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला अनुयायी वंदन करतात.
गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या पिंपळाची एक फांदी दीक्षाभूमी येथे लावण्यात आली होती. त्याचे आता झाड झाले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी या बोधिवृक्षाला अभिवादन करतात.
दीक्षाभूमीवर जगभरातून अनुयायी येतात. येथे आल्यावर अनेकांना नवीन चेतना मिळते. त्रिशरण व पंचशील पाळण्याचे अनुयायांना प्रोत्साहन मिळते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं येणारे अनुयायी कोट्यवधी रुपयांची पुस्तके खरेदी करतात.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन (dhamma chakra pravartan din 2023 in marathi) माहिती जाणून घेतली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
धम्म चक्र प्रवर्तन दिन कधी साजरा करण्यात येतो ?
दरवर्षी 14 ऑक्टोंबर रोजी धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला ?
14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोणत्या ठिकाणी स्वीकारला ?
महाराष्ट्र राज्यातील नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.