दिवेआगर माहिती मराठी – diveagar information in marathi

Diveagar information in marathi – दिवेआगर हे महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. कोकणातील सर्व विष्णुमंदिरांमध्ये सर्वांत उंच आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ति एकच दगडात कोरलेली आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दशावतार कोरले आहेत. हा एक प्रकारचा खजिनाच आहे.

या लेखात आपण दिवेआगर माहिती मराठी – diveagar information in marathi जाणून घेणार आहोत.

दिवेआगर माहिती मराठी – diveagar information in marathi

diveagar information in marathi
diveagar information in marathi
नावदिवेआगर
ठिकाणरत्नागिरी, महाराष्ट्र राज्य
प्रसिध्दपॅरासेलिंग
बोटिंग
बनाना राईडस
घोडेस्वारी
अधिकृत भाषामराठी कोकणी
हवामान30 अंश सेल्सिअस
जवळील पर्यटन स्थळेश्रीवर्धन
हरिहरेश्वर
वेळास किनारा
भरडखोल
दिवेआगर माहिती मराठी

1. दिवेआगर हे पर्यटन स्थळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र राज्यात आहे.

2. महाराष्ट्र राज्यातील किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणुन दिवेआगर ची ख्याती आहे.

3. याच्या जवळपास हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत .

4. दिवेआगर हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक गाव आहे.

5. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

6. इथले सुवर्ण गणेश मंदिरातील गणपतीच्या सोन्याच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसापूर्वी इथली सोन्याची मूर्ती चोरीला गेली होती.

7. इथून समुद्रकिनारा साधारणपणें 4 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी माणसाची वस्ती नसल्याकारणाने इथला समुद्रकिनारा एकदम स्वच्छ आहे.

8. दिवेआगर पर्यटन स्थळ हे महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावरील एक किनारपट्टीचे ठिकाण आहे. दिवेआगरच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आहे आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे.

9. दिवेआगर अलिबाग शहराच्या दक्षिणेस 81 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपासून 182 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 163 किलोमीटर अंतरावर आहे.

10. कोकण विभागात मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कारण पावसाळयात इथले सौदर्य खुप छान असते. कोकण किनारपट्टीवर साधारणपणें 2500 मिमी ते 4500 मिमी इतका पाउस पडतो तर हवामान दमट आणि उबदार असते.

11. पावसाळ्यात येथील तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते तर उन्हाळ्यात तापमान गरम आणि दमट होते. या वेळी येथील तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

12. हिवाळ्यात येथील तापमान अनुकूल असते तर हवामान थंड आणि कोरडे असते.

दिवेआगर पाहाण्यासारखी ठिकाणे

13. दिवेआगर नारळ, सुरू (कॅसुरीना) आणि सुपारीच्या झाडांनी झाकलेल्या आणि दाट मानव वस्ती नसणाऱ्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे शांत आहेत.

14. निसर्गाच्या सानिध्यात आराम करण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी दिवेआगरला नक्की भेट द्या.

15. शनिवार आणि रविवारीची सुट्टी मजेत घालवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी नक्की येतात.

16. कारण या ठिकाणी पॅरासेलिंग, बोटिंग, बनाना राईडस, घोडेस्वारी तसेच घोडेगाडी चालवणे याचा आनंद इथे लुटता येतो.

17. दिवेआगर व्यतिरिक्त तुम्ही पुढीप्रमाणे स्थळे पाहू शकता. श्रीवर्धन – दिवेआगर पासून दक्षिणेला 23 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी सुंदर, लांब आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळतो.

18. श्रीवर्धन हे दिवेआगरशी सुंदर किनारपट्टी रस्त्याने जोडलेले आहे.

19. हरिहरेश्वर – दिवेआगर समुद्रकिनारा पासून दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावरील ठिकाण आहे. हे ठिकाण प्राचीन शिव आणि काळभैरव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

20. येथील मंदिर खडकाळ समुद्रकिनारा आणि किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील ओळखले जाते.

21. वेळास किनारा – हरिहरेश्वरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर कासव महोत्सवासाठी वेळास किनारा प्रसिद्ध आहे.

22. भरडखोल – दिवेआगरच्या दक्षिणेस 7 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण प्रसिद्ध मासेमारीचे गाव म्हणुन ओळखले जाते.

दिवेआगर कसे पोहचाल ?

23. दिवेआगर या ठिकाणी रस्त्याने तसेच रेल्वे मार्गाने जाता येते.

24. महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस मुंबई, पुणे, श्रीवर्धन आणि पनवेल येथून दिवेआगरसाठी मिळतात.

25. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई हे जवळचे विमानतळ आहे. साधारणपणे 189 किलोमीटर अंतर आहे. त्याचबरोबर 48 किलोमीटर अंतरावरील माणगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

26. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दिवेआगर पर्यटन स्थळ असल्याने येथील सी-फुड म्हणजेच मासे आणि इतर स्थानिक पदार्थ खूपच प्रसिध्द आहे. दिवेआगर हे ठिकाण उकडीचे मोदकासाठी या पदार्थासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

27. या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स याच्या सोयी सुविधा आहे.

28. हरिहरेश्वरमध्ये एमटीडीसी रिसॉर्ट देखील उपलब्ध आहे.

29. या पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी कायम सुरू असते. पण येथे पर्यटनासाठी उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च असा आहे.

30. पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंत असते तर उन्हाळा गरम आणि दमट असते.

31. हिवाळ्यात येथील तापमान इतर किनारपट्ट्यांच्या तुलनेत जास्त थंड असते.

32. समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून घ्याव्यात आणि नंतर समुद्रात उतरावे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

दिवेआगर पाहाण्यासारखी ठिकाणे कोणकोणती आहेत ?

या ठिकाणी पॅरासेलिंग, बोटिंग, बनाना राईडस, घोडेस्वारी तसेच घोडेगाडी चालवणे याचा आनंद इथे लुटता येतो.

दिवेआगर ते हरिहरेश्वर किती अंतर आहे ?

दिवेआगर पासून हरिहरेश्वर 34 किलोमीटर अंतरावर आहे.

हे देखील वाचा

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण दिवेआगर माहिती मराठी – diveagar information in marathi जाणून घेतली.

दिवेआगर माहिती मराठी – diveagar information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही दिवेआगर माहिती मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment