दिवाळी पूजेचा मुहूर्त, लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ माहिती (Diwali puja shubh muhurat 2022 marathi)

By | April 12, 2023

Diwali puja shubh muhurat 2022 marathi – दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण असा दिव्यांचा सण आहे. हा सण हिंदू, जैन आणि शीख असे सर्वच आनंदाने साजरा करतात. साधारणपणे दिवाळी पाच दिवस असते.

हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक सण जो आध्यात्मिक “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय” याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो तो म्हणजे दीपावली.

या सणाला लक्ष्मी देवी, गणेश, राम-सीता, विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर यांची पूजा करतात.

या लेखातून आपण लक्ष्मी पूजन मुहूर्त मराठी (Diwali puja shubh muhurat 2022 marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज शुभ करण्याचे शुभ मुहूर्त जाणून घेणार आहोत.

Table of Contents

धनतेरस पूजा मुहूर्त मराठी (dhanteras puja shubh muhurat 2022 marathi)

Diwali puja shubh muhurat 2022

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन अवतरले होते, म्हणून या तिथीला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात.

dhanteras date 2022 marathi – या वर्षी धनतेरस शनिवार दिनांक 22 ऑक्टोंबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्षी शनिवारी द्वादशी तिथी सायंकाळी 6.02 पर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. त्रयोदशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.03 पर्यंत राहील.

काही लोक शनीवरी 22 तारखेला धनत्रयोदशी साजरी करतील तर काही लोक रविवारी 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करतील.

हा लेख जरूर वाचादिवाळी शुभेच्छा संदेश मराठी 2022

नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त माहिती (narak chaturdashi 2022 shubh muhurat marathi)

नरक चतुर्दशी हा एक हिंदु सण आहे. हा सण दिवाळी या पाच दिवसांच्या उत्सवाचा हा दुसरा दिवस आहे. या दिवशी कृष्णाने असुर (राक्षस) नरकासुरचा वध केला अशी मान्यता आहे.

या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. त्यानंतर यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.

narak chaturdashi 2022 date marathi – या वर्षी नरक चतुर्दशी सोमवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी पहाटे 05:08 ते 06:31 मिनिटांपर्यंत नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त माहिती (Laxmi Pujan Shubh Muhurt 2022 in marathi)

दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला खूप महत्त्व दिले जाते.

या दिवशी उटने लाऊन आंघोळ करतात. हिंदू धर्मातील प्रमुख साणांपैकी हा एक सण असून या दिवशी लक्ष्मीपूजन करून एक आनंदाचा क्षण साजरा करतात.

समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. यावेळी लक्ष्मी देवीला लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात.

धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. तसेच चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांची पूजा केली जाते. या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

लक्ष्मी पूजन मुहूर्त मराठी (lakshmi puja 2022 muhurat marathi) – या वर्षी लक्ष्मी पूजन सोमवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सायंकाळी 6:53 ते रात्री 8:16 मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

हा लेख जरूर वाचावसुबारस माहिती मराठी

बलिप्रतिपदा पाडवा शुभ मुहूर्त (diwali balipratipada 2022 shubh muhurat in marathi)

हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. हा सण दिवाळीतील तिसरा दिवस म्हणून साजरा करतात. या दिवसाला दिवाळी पाडवा असे देखील म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीराजाला कपटाने जमिनीत म्हणजे पाताळात गाडले अशी मान्यता आहे.

diwali balipratipada 2022 date marathi – या वर्षी बलिप्रतिपदा पाडवा बुधवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रात: 02:42 ते रात्री 01:46 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी आयुष्यमान योग, शोभण योग आणि सौभाग्य योग असतील.

भाई दूज शुभ मुहूर्त मराठी (bhai dooj shubh muhurat 2022 marathi)

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते.

भाऊ बहिणीच प्रेमसंवर्धनाचा हा दिवस असून या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. यावेळी भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

bhai dooj 2022 date and time marathi – या वर्षी भाऊबीज पाडवा बुधवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी 01:18 ते 03:33 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे.

हा लेख जरूर वाचाआपण दिवाळी का साजरी करतो?

सारांश

या लेखातून आपण दिवाळी पूजेचा मुहूर्त, लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ माहिती (Diwali puja shubh muhurat 2022 marathi) जाणून घेतली आहे. यात आपण यात आपण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज शुभ करण्याचे शुभ मुहूर्त विषयी माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…

– Happy Diwali 2022

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

2022 मध्ये दिवाळी किती तारखेला आहे ?

धनतेरस 22 ऑक्टोंबर 2022 या तारखेला आहे. या दिवसापासून दिवाळी सण सुरू होतो.लक्ष्मी पूजन 24 ऑक्टोंबरला आहे. 25 ऑक्टोंबरला गोवर्धन पूजा आहे. भाऊबीज 26 ऑक्टोंबरला आहे. अश्या प्रकारे दिवाळी सण 22 ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोंबर पर्यंत आहे.

दिवाळी ही किती दिवस असते ?

वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अश्या सहा दिवसांची दिवाळी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *