Dr. Babasaheb Ambedkar Yanche Samajik Vichar – मित्रांनो, देशातील सर्व जाती-धर्मातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती, 14 एप्रिल समाजाच्या आणि भारत देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस मानला जातो.
14 एप्रिल म्हणजे एक सोनेरी दिवस, मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते जगभरातील 100 हून अधिक देशात साजरा केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी उभारलेली चळवळ आणि कार्य होय.
भारत देशाच्या विविध क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले, म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात.
14 एप्रिल 2023 रोजी भीमराव आंबेडकरांची 132वी जयंती, या निमित्ताने आपण या लेखातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार (Dr. Babasaheb Ambedkar Yanche Samajik Vichar) याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती (Amazing Facts About Dr. BR Ambedkar In Marathi)

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi – 14 एप्रिल 1891 या दिवशी भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. वडील रामजी व भीमाबाई यांच्या शुद्ध विचार व आचारात भीमरावांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
यानंतर त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहासशास्त्र आणि कायदाशास्त्र अश्या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला.
भीमराव आंबेडकरांनी 18-18 तास अथक परिश्रम घेत एकूण 32 पदव्या प्राप्त केल्या. त्यांनी इंग्रजीसह 11 वेगवेगळ्या भाषा अवगत केल्या होत्या.
संबंधित लेख – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या आहेत ?
सुरवातीच्या काळात त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील म्हणून काम केले. पुढे त्यांनी देशाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत महत्वाची कामगिरी बजावत लोकांना आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली.
लोकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना हक्काने जगता यावे यासाठी आंबेडकरांनी अनेक संघर्ष, सत्याग्रह करत समाजात समता व न्याय प्रस्थापित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार (Dr. Babasaheb Ambedkar Yanche Samajik Vichar)

Social Views Of Ambedkar In Marathi – डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे सामाजिक कार्य करण्यासाठी अर्पण केले होते. देशातील सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या यादीत बाबासाहेबांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्यासाठीचे कार्य अतुलनीय आणि वंदनीय आहे.
अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आंबेडकरांनी लहानपणापासूनच अनुभवले होते, कारण त्यांचाही जन्म एका अस्पृश्य कुटुंबात झाला होता. यामुळे त्यांनी अस्पृश्यता नष्ट करून अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास करायचा हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठरविले. यातूनच त्यांनी दलीत समाजाच्या उद्धारासाठी मोठी चळवळ केली.
दलीत वर्गाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच्या या चळवळीतून समाजात मोठी क्रांती घडून आली.
बाबासाहेबांनी मांडलेल्या अस्पृश्यतेसंबंधी विचारात त्यांनी असे म्हंटले आहे की, अस्पृश्यता ही मानवनिर्मित असून भारताच्या इतिहासात याचे रहस्य दडले आहे.
पूर्वी बौद्ध धर्माचा आश्रय घेतलेल्या वर्गाला ब्राह्मणांनी व सवर्णांनी अस्पृश्य ठरवले. इतिहासाची पाने उलगडल्यावर लक्षात येते की, वेदांमध्ये एकूण चार वर्ण आहेत – ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र. यामध्ये कोठेही अस्पृश्य हे वर्ण नसून ते मानवनिर्मित आहेत.
खरे पाहता, पूर्वी अस्पृश्य मोठ्या पदांवर होते, अनेक राज्ये त्यांचा अधिकारात होती. परंतु सवर्णांनी विशेषतः ब्राह्मणांनी त्यांची अवनती घडवून आणली, म्हणूनच अस्पृश्यता ही ब्राह्मणांनी निर्माण केलेली व्यवस्था असून हिला ईश्वराची मान्यता किंवा वेदांचा आधार नाही, असे स्पष्ट मत बाबासाहेबांनी मांडले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्म व जात याविषयीचे विचार (BR Ambedkar view on religion in marathi)
Social Views Of Dr Babasaheb Ambedkar – मित्रांनो, भारत या देशाच्या इतिहास पाहिला असता लक्ष्यात येते की भारतात फार पूर्वीपासूनच जातीव्यवस्था अस्तित्वात आहे. पण ही जातीव्यवस्था हिंदु धर्मसंस्थेने निर्माण केली आहेत, असे आंबेडकर म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा विध्वंस ही दोन जातव्यवस्थावर आधारित पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकाच्या स्वरूपात त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले आहे, ते पुढीलप्रमाणे आहे.
जात ही श्रम विभाजनाच्या तत्त्वावर आधारलेली नसून ती पूर्वकर्माशी आणि पुनर्जन्माशी जोडली गेली. त्यामुळे ती पूर्णपणे अशास्त्रीय आहे. यामुळे समाजात उच्च-नीचता निर्माण झाली असून हिंदू समाजाचे विघटन झाले आणि नैतिक अवनती सुद्धा झालेली आहे.
यातूनच जाती-जातीमधील तणाव वाढून सामाजिक संबंध बिघडले आहेत. यामुळे जातिव्यवस्था हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्त्वाचा दोष असून अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक असल्याचे बाबासाहेब मानतात.
बाबासाहेब हिंदू धर्मविषयक विचार मांडताना म्हणतात मानवी जीवनात धर्म अतिशय महत्वाची गोष्ट आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती व समाजाला धर्माची नितांत गरज असून धर्म हे माणसाच्या विकासाचे व उन्नतीचे एक महत्त्वाचे साधन बनू शकते.
आंबेडकरांच्या मते, धर्म हा बुद्धिनिष्ठा आणि नैतिकता यांच्याशी विसंगत नसावा तर त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि ज्ञान हीच जीवनाची मूलतत्त्वे असावी.
पण हिंदु धर्माने जी मानवी मनात उच्च-नीचतेची कल्पना रुजवली आहे, त्यामुळे हिंदु धर्म जातीव्यवस्थेच्या दोषाने भरलेला आहे. यामुळे हिंदू धर्मात परिवर्तन घडवून येणे अशक्य आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
संबंधित लेख – भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती
धर्म आणि समाज परिवर्तन करण्यासाठी आंबेडकरांनी मांडलेले मत (BR Ambedkar view on religion in marathi)
Social Views Of Dr Babasaheb Ambedkar – जातीव्यवस्थेमुळे हिंदु धर्माला कलंक लागला असून, यातून बाहेर पडायचे असेल तर हिंदू धर्मात परिवर्तन होणे गरजेचे आहे, असे बाबासाहेबांचे मत होते. यासाठी बाबासाहेबांनी धार्मिक परिवर्तनाची दिशा कशी असावी, याविषयी मत मांडले आहे.
हिंदु धर्मात तेहतीस कोटी देव आहेत, अशी मान्यता आहे. पण आंबेडकर यांच्या मते हिंदू धर्मात इस्लाम, ख्रिश्चनांप्रमाणे, एक देव आणि एकच धर्मग्रंथ असावा. यासाठी हिंदु धर्मातील वेद, शास्त्रे, पुराणे नष्ट करावीत.
तसेच हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथांच्या आधारे जे लोक आचरणाचा उपदेश करतात त्यांना शिक्षा व्हावी. अर्थात हिंदु धर्मातील पुरोहित वर्ग आवश्यकता असेल तरच असावा परंतु तो जन्मधिनिष्ठ नसावा, असल्यास अश्या व्यक्तींनी सरकारकडून पुरोहितपणाचा परवाना रीतसर घ्यावा.
पुरोहित हा अन्य सरकारी नोकराप्रमाणे सरकारी नोकर असावा. अर्थात त्यावर कायद्याचे बंधन असावे तसेच सरकारने धर्माधिकाऱ्यांची संख्या मर्यादित करावी. अश्या प्रकारे हिंदु धर्म आणि समाज परिवर्तन करण्यासाठी आंबेडकरांनी मत मांडले.
पण हिंदू धर्मात सुधारणा घडवून येणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कारण बाबासाहेबांच्या मते, बौद्ध धर्माने तेजस्वी आणि संपन्न अशा संस्कृतीचा पाया घातला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यामागे काय कारणं होती (Why Ambedkar Converted to Buddhism)
Why Dr Ambedkar Rejected Hinduism And Choose Buddhism – बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, नीतिमत्तेची शिकवण देणारा, स्वातंत्र्य-समता-बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करणारा, गरिबांविषयी कळवळा असणारा धर्म हाच खरा धर्म असतो.
हिंदु धर्म आणि समाज परिवर्तन व्हावे म्हणून आंबेडकरांनी बरेच प्रयत्न केले. यासाठी त्यांनी महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. तसेच बाबासाहेबांनी एस.एम जोशी, सावरकर, श्रीधर टिळक अश्या अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली.
बाबासाहेबांनी समाजाचे सवर्ण समाजाचं परिवर्तन व्हावे, म्हणून वर्तमानपत्रे चालू केली. इसवी सन 1942 पासून ते राजकारणातही सक्रिय झाले, यासाठी त्यांनी राज्यघटना लिहिली. या घटनेत त्यांनी सगळ्यांना अधिकार दिले होते.
पण यातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला काहीही फायदा झाला नाही, म्हणून शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी हिंदू धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्माचे चिकित्सक परीक्षण केले असता, त्यांना बौद्ध हा धर्म आवडला. कारण आंबेडकरांच्या मते, माणसाला चांगल्या व सुखी जीवनासाठी आवश्यक असणारा धर्म अंधश्रद्धामुक्त, प्रज्ञा, करुणा आणि समतेचा पुरस्कार करणारा असावा.
अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती फक्त बौद्ध धर्मात सापडतात असे म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी तीन लाख लोकांसमवेत बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
संबंधित लेख – धम्मचक्र प्रवर्तन दिन माहिती मराठी
सारांश
मी आशा करतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार (Dr. Babasaheb Ambedkar Yanche Samajik Vichar) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. धन्यवाद.