ड्रॅगन फळाची माहिती मराठी

Dragon fruit in marathi information – सुंदर आणि आकर्षक दिसणारे ड्रॅगन फ्रूट अमेरिकेच्या वाळवंटात आढळतात. सध्या भारतात हे फळ बाराही महिने विक्रीसाठी उपलब्ध असते. निरोगी आरोग्य आणि सौंदर्य वाढवणाऱ्या फळात अनेक पोषक घटक असल्याने ड्रॅगन फळ खाणे सर्वच जण पसंत करतात. या लेखातून आपण ड्रॅगन फळाची माहिती (dragon fruit in marathi information) जाणून घेणार आहोत.

ड्रॅगन फळाची माहिती (dragon fruit in marathi information)

dragon fruit in marathi information
नावड्रॅगन फ्रूट
शास्त्रीय नावSelenicereus undatus
इतर नावेपिटाया किंवा पिठाया
प्रकारउष्कटिबंधीय फळ
वर्ग कॅक्टस
उत्पादनअमेरिका आणि दक्षिण आफ्रिका
विक्री जगभर
उपयोगी निरोगी आरोग्य आणि सौंदर्य

ड्रॅगन फळ हे मुळात अमेरिकेतील मेक्सिसो येथील असून आता ते बहुतांश प्रदेशात पिकवले जाते. या फळांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय शेतकरी या पिकाचे उत्पादन घेत आहेत. ड्रॅगन फळ तीन रंगाचे असतात, लाल, पांढरे आणि पिवळे.

ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर केला जातो. सौंदर्य प्रसाधनामध्ये उपयोगात येणारे ड्रॅगन फळ आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहे.

ड्रॅगन फळ खाण्याचे फायदे (dragon fruit benefits in marathi)

ड्रॅगन फळात विटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. यासोबतच कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. फळाच्या बाहेरुन जाड साल असून आत पांढरा किंवा लाल गर असतो. त्यात किवीसारख्या बिया असतात.

या फळात फाइबर जास्त प्रमाणात असल्याने पोट साफ राहण्यास मदत होते. पेट सफा तो हर रोग दफा ! रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. तसेेच या फळात असणारे गुणधर्म कोलेस्टेरॉल आणि साखर कमी डायिबटीस धोका कमी करतात.

या फळातील गुणधर्मामुळे हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार यापासून मुक्ती मिळते.

ड्रॅगन फ्रुटमध्ये बेटा कॅरेटीन, लायकोपिनी आणि बेटालिनी असते, यामुळे क्रोनिक आजारापासून आराम मिळतो. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम ड्रॅगन फळ करते. यामुळे अशा रुग्णांना डॉक्टर ड्रॅगन फुट खाण्याचा सल्ला देतात.

ड्रॅगन फळात अनेक आरोग्यदायी बॅक्टरिया असतात, याच्या सेवनाने पोटाशी निगडीत असलेले आजार कमी होतात, प्रतिकारशक्ती वाढते, शरीरातील आर्यन पातळी वाढीस लागते.

या फळात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते, यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते व त्वचेला तजेला देते.

ड्रॅगन फळ हे डेंग्यूच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. या फळाच्या बियांमध्ये फायटोकेमिक्सल्समध्ये अँटिऑक्सिडंट व अँटीव्हायरस चे पोषक घटक असतात यामुळे डेंग्यूच्या आजारापासून मुक्ती मिळते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण ड्रॅगन फळाची माहिती (dragon fruit in marathi information) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

ड्रॅगन फळाची लागवड करण्यासाठी कशी जमीन लागते ?

ड्रॅगन फळाची लागवड करण्यासाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी, जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थयुक्त, वालुकामय तसेच मध्यम हलकी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचाड्रॅगन फळाची लागवड कशी करावी?

ड्रॅगन फळात कोणकोणते पौष्टिक घटक असतात ?

ड्रॅगन फळात एंन्टी ऑक्सीडेंट, विटामिन सी, प्रोटीन कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, आणि कार्बोहाइड्रेड इत्यादी पौष्टिक घटक असतात.

हे लेख देखील वाचा :

Leave a Comment