जागतिक वसुंधरा दिन मराठी माहिती

Earth Day Information In Marathi – वसुंधरा, पृथ्वी, भूमी, माता अश्या विविध नावाने ओळखला जाणारा व सजीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी. या ग्रहाने लाखो वर्षापासून सजीवांना आपल्या कुशीत ठेवले. विविध जीवांच्या गरजा पर्यावरणाच्या माध्यमातून पुरविण्याचे काम पृथ्वी करते. यामुळेच तर तिला आई किंवा माता म्हणून ओळखले जाते.

आई जशी तिच्या लेकरांना सांभाळते तसेच, धरती तिच्या लेकरांना म्हणजेच प्राणी, पक्षी किंवा इतर अन्य सजीवांना सांभाळते. असे असताना आज पृथ्वीची दयनीय अवस्था पाहायला मिळते. आपण धरतीचे महत्व समजून घेऊन त्याचे संरक्षण करावे, यासाठी 22 एप्रिल 1970 मध्ये जगात सर्वप्रथम जागतिक वसुंधरा दिन साजरा केला गेला.

या लेखातून आपण जागतिक वसुंधरा दिन (Earth Day Information In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण धरती म्हणजे काय ? महत्व व कार्य याविषयी माहिती पाहणार आहोत.

जागतिक वसुंधरा दिन मराठी माहिती (Earth day information in marathi)

Earth day information in marathi
विषयजागतिक वसुंधरा दिन
इतर नावेजागतिक पृथ्वी दिवस
धरती माता दिवस
प्रकारदिनविशेष
उद्देशनिसर्गाविषयी संरक्षणाची भावना निर्माण व्हावी
महत्वपृथ्वीचे संरक्षण व्हावे ही जनजागृती
केव्हा साजरा करतात ?22 एप्रिल (दरवर्षी)
सर्वप्रथम केव्हा साजरा केला ?22 एप्रिल 1970 रोजी

आपली पृथ्वी ही अंदाजे 5 अब्ज वर्षांपूर्वी तयार असावी, असे बऱ्याच तज्ञांचे म्हणणे आहे. पृथ्वीवर हवा, जमीन, पाणी, सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान यांचा समावेश होतो, यालाच पर्यावरण असे म्हणतात.

विविध प्रदूषणाने आणि विविध कारणाने पर्यावरणास हानी पोहचत आहे. पर्यावरणातील घटकांपैकी मानव हा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. यामुळे पर्यावरणचे संतुलन ठेवणे ही मानवाची जवाबदारी आहे. कारण आपले जीवन आनंदमय करण्यात कळत नकळत मानवानेच पृथ्वीचे नुकसान केले आहे.

यास्तव पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी तसेच कर्तव्य आहे. यासाठी 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने पहिल्यांदा वसुंधरा दिवसाचे आयोजन केले.

यातून पर्यावरणाचे महत्व काय आहे ? याविषयी जागृती अभियान राबवले जाते. आपल्या पर्यावरणाचे रक्षण कसे करावे आणि का करावे याचे शिक्षण देण्याच्या हेतूने वसुंधरा दिवस साजरा केला जातो.

पर्यावरण आणि मानवी जीवन माहिती (humans and environment relationship mahiti marathi)

Earth Day Information In Marathi

पर्यावरण आणि मानव यांचा खूप जवळचा संबंध आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला असे म्हंटले जाते.

आपल्या मूलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला अन्न, वस्त्र, निवाऱ्याची आवश्यकता असते. या गरजा भागवण्यासाठी मानवाने बेसुमार जंगलतोड केली. यामुळे जंगलात राहणाऱ्या पक्षी, प्राणी बेघर झाले. यात अनेक जैवविविधता धोक्यात आली आहे.

मानवी वस्तीचा संबंध पर्यावरणाशी जवळपास 2 लाख वर्षांपूर्वी आला असावा, असे म्हणतात. तेव्हापासून आतापर्यंत मानवाने केलेल्या आविष्काराने मानवी जीवनच बदलून गेले.

नवे नवे शोध लागले, यातून औद्योगिकीकरण झाले, तंत्रज्ञान वाढीस लागले, लोकसंख्या वाढली, शहरीकरण वाढले यातूनच जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. या सर्व घटनाक्रमात पर्यावरणाला वारंवार हानी पोहचत गेली.

जागतिक वसुंधरा दिवस इतिहास (world earth day information in marathi)

मानव प्रजात झपाट्याने विकास करत आहे. मागील काही शतकापासून मानव आपले जीवन आनंदमय करण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग करत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे पर्यावरणातील घटकात बदल होत आहे.

यामुळे जल, ध्वनी, वायू, जमिनीची धूप होत आहे. मानव विकास साधताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. पृथ्वीवरील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचे मुख्य कारण माणसाचा विकास व नैसर्गिक आपत्ती.

नैसर्गिक आपत्तीत भूकंप, ज्वालामुखी, चक्रीवादळ, महापूर आदी गोष्टींचा समावेश होतो. या समस्यांमध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. पण मानवनिर्मित होणारे दुष्परिणाम आपण नक्कीच रोखू शकतो.

पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि वसुंधरा पूर्वीसारखी फुलून यावी या उद्देशाने जगभर 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करण्यात येतो. यामुळे लोकांमध्ये पर्यावरण रक्षणाची ओढ निर्माण होण्यास मदत होईल.

जागतिक वसुंधरा दिन कसा साजरा करायचा (how to celebrate world environment day mahiti)

Earth Day Information In Marathi

22 एप्रिल रोजी जरी पृथ्वी दिवस साजरा केला जात असला तरीदेखील आपण प्रत्येकाने दररोज हा दिवस साजरा केला पाहिजे. यासाठी काही खास करण्याची गरज नाही किंवा वेगळा वेळ पण काढायची गरज नाही.

फक्त आपल्या दैनंदिन जीवनातील कामात नियम लावून घ्या. उदा. पाण्याचा वापर करताना जपून करावा. पाण्याचे स्त्रोत आपल्याकडून दूषित होणार नाही यासाठी प्रयत्न करावा.

शहरीकरणाच्या नावाखाली होणारी जंगलतोड थांबवावी. वृक्षरोपण करून त्यांचे संरक्षण करावे. मातीची धूप होणार नाही यासाठी काळजी घ्यावी. तसेच शक्य असल्यास कोणत्याही वस्तूचा पूर्नवापर करण्याचा प्रयत्न करावा. शक्य नसल्यास त्याचे योग्य प्रकारे विघटन करावे.

तंत्रज्ञानाच्या युगात विद्युत लहरी निर्माण होतात. या विद्युत लहरी लहान पक्षाच्या जीवावर परिणाम करतात. यामुळे तंत्रज्ञानात प्रगती करताना त्यातून पर्यावरणास किंवा त्याच्या घटकास हानी पोचणार नाही, याची काळजी घ्यावी.

कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याचे विघटन करावे. शक्यतो मोकळ्या हवेत कचरा जाळून वायू प्रदूषण करू नये.

पर्यावरणीय समस्यावर उपाययोजना करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेला मदत करा. आपल्या आजूबाजूचा निसर्ग कसा व्यवस्थित राहील याकडे लक्ष द्यावे लागेल. झाडे, झुडपे, पक्षी प्राणी कोणत्याही घटकांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जागतिक वसुंधरा दिन मराठी माहिती (Earth day information in marathi) जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय तो कशासाठी साजरा करतात ?

जागतिक वसुंधरा दिन म्हणजे पृथ्वीच्या प्रती आपले प्रेम व्यक्त करणे व मनापासून तिचे रक्षण करणे. पृथ्वीच्या रक्षणाची जागरूकता प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, या हेतूने जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो.

वसुंधरा दिन कधी असतो ?

वसुंधरा दिन 22 एप्रिल असतो. पण हा दिन एकच दिवस नसून कायम साजरा करायला हवा.

वसुंधरा परिषदेत किती देश सहभागी झाले होते ?

वसुंधरा परिषदेत 141 देश सहभागी झाले होते.

पहिली वसुंधरा परिषद कोठे झाली ?

इसवी सन 1992 साली पहिली वसुंधरा परिषद ब्राझील देशाच्या रिओ दी जनेरिओ या शहरात झाली होती.

वसुंधरा या शब्दाचा अर्थ काय आहे ?

वसुंधरा या शब्दाचा अर्थ पृथ्वी असा होतो. वसुंधरा समानार्थी शब्द पुढीलप्रमाणे :
1. धरती
2. माता
3. पृथ्वी
4. भूमी

पुढील वाचन