नैसर्गिक आपत्ती भूकंप माहिती मराठी

Earthquake information in marathi – निसर्गात नेहमीच काहीतरी बदल होताना आपण पाहतो. काही बदल निसर्गतः होतात तर काही माणसाने केलेले असतात. निसर्गतः झालेल्या काही बदलामुळे मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो, त्या बदलास नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकट असे म्हणतात.

दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी आणि चक्रीवादळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. ही संकटे आल्यावर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जीवाची आणि आर्थिक नुकसान होते.

दुष्काळ हा दोन प्रकारे येतो. सुका दुष्काळ आणि ओला दुष्काळ, या दोन्ही वेळी मानवासोबतच इतर जीवांचे हाल होतात. वेळप्रसंगी काहींचा जीव देखील जातो.

त्सुनामी आणि चक्रीवादळाचा फटका साधारणपणे समुद्रकिनारा असलेल्या प्रदेशातील लोकांना बसतो. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होत असतात.

भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल झाल्याने होत असतो. या वेळी जमिनीला भेगा पडून जमीन कंपन करू लागते. पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपापैकी जास्तीत जास्त भूकंप सौम्य स्वरूपाची असतात. म्हणजेच ही भूकंप विध्वंसक नसून सौम्य स्वरूपाची असतात.

या लेखातून आपण नैसर्गिक आपत्ती भूकंप याविषयी माहिती (Earthquake information in marathi) मराठीत जाणून घेणार आहोत. यात आपण भूकंपाची करणे आणि परिणाम यावर देखील चर्चा करणार आहोत.

नैसर्गिक आपत्ती भूकंप माहिती मराठी (Earthquake information in marathi)

Earthquake information in marathi

bhukamp mahiti marathi – पृथ्वीच्या भूगर्भात होणाऱ्या हालचालींमूळे मोठ्या प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते त्यामुळे भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. या हालचालीमुळे जमिनीला भेगा पडतात आणि ती कंपनी पावते, यालाच भूकंप असे म्हणतात.

भूकंपामुळे जमिनीला भेगा पडून दरी निर्माण होत असते. यावेळी पृथ्वीच्या भूगर्भात निर्माण होणारे धक्के आणि लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात.

भूकंपाच्या जमिनीखालील उगमस्थानस भूकंपनाभी असे म्हणतात. या नाभीच्यावर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी सर्वात जास्त नुकसान केंद्रबिंदूच्या आसपास होते.

साधारणपणे भूकंप हे दोन स्वरुपात होतात, सौम्य आणि विध्वंसक. पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपाचे स्वरूप साधारणपणे सौम्य स्वरूपाचेच असते. पण काही वेळा झालेले भूकंप अतिशय विध्वंसक स्वरूपाचे होते.

12 जानेवारी 2010 रोजी हैती या देशात एक विध्वंसक भूकंप झाला होता. या वेळी दोन ते तीन लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. इतर जीव आणि आर्थिक मालमत्तेचे हानी झाली ती वेगळीच.

भूकंपाचे प्रकार मराठी (bhukampache prakar in marathi)

भूकंपाचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते, पहिला प्रकार नैसर्गिक आणि दुसरा कृत्रिम भूकंप. नैसर्गिक भूकंप म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे घडवून आलेला भूकंप होय.

कृत्रिम भूकंप म्हणजे मानवाने केलेल्या कृतीमुळे घडवून आलेला भूकंप होय. माणसाने विविध गोष्टींचा शोध लावला असून अजून बऱ्याच गोष्टीचा शोध लावण्याचा तो कायमच प्रयत्न करत असतो.

खाणकाम आणि उत्खनन करणे, परमाणु चाचण्या, तलाव सरोवरे बांधणे, माती विषयक संशोधन, जमिनीतून आणि समुद्रातून नैसर्गिक मिळवण्यासाठी केलेले प्रकल्प यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडून भूकंप घडून येतो.

भूकंपाची कारणे माहिती मराठी (earthquake causes in marathi)

bhukamp honyachi karne – आपण वर पाहिल्याप्रमाणे भूकंपाच्या प्रकारानुसार भूकंप घडून येत असतो. पृथ्वीच्या भूकवचावर भेगा आहेत, या भेगांखालचे खडकांचे थर एकमेकांवर घसरतात यावेळी होणाऱ्या हालचालींमुळे भूकंप होतो.

ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग असते. यामधून पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस, उष्ण वायू आणि राख बाहेर पडतात. यातून ज्वालामुखी पर्वत निर्माण होतो.

तेलाच्या शोधासाठी जमिनीत खोदकाम करतात. यामुळे पृथ्वीच्या आतमध्ये खोलवर असणाऱ्या खडकांचं संतुलन बिघडते. पृथ्वीच्या आतमध्ये खडक, वाळू, दगडांचे अनेक थर आहेत. पण जेव्हा खोलवर खोदले केलं जातं तेव्हा हे थर उद्ध्वस्त होऊन त्यांच्यातली ऊर्जा मोकळी होते. यामुळे भूकंप होतो.

वीजनिर्मिती आणि अण्वस्त्र चाचण्या करताना मोठे स्फोट घडवून आलेले जातात, यामुळे देखील भूकंप होत असतो. या भूकंपाला स्फोटक भूकंप म्हणतात.

सिंह, कुत्रे, गाय, बैल अश्या प्राण्यांना 40-45 मिनिटे आधीच भूकंपाची होते. यामुळे हे प्राणी आपल्या जागेवरून पळत सुटतात तसेच विचित्र आवाज काढतात.

भूकंपाचे परिणाम माहिती मराठी (earthquake effects in marathi)

bhukamp che parinam – भूकंप ही नैसर्गिक घटना आहे. मात्र, बऱ्याच वेळा मानवी कारणामुळेही ते येतात. यामुळे सर्वात जास्त नुकसान माणसाचेच होत असते.

भूकंप आला की जमिनीची थरकाप सुरू होते, यामुळे त्या जमिनीवर बांधलेले घरे, इमारतींचा पाया विस्कळीत होतात, काही वेळा विध्वंसक स्वरूपाचा भूकंप झाला तर या इमारती आणि घरे जमीनदोस्त होतात.

भूकंपाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आणि प्राण्यांना आपले जीव गमवावे लागतात. भूकंपानंतर भूस्खलन होते. पावसाळ्यात डोंगर कोसळतात.

समुद्रात होणाऱ्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण होतात. परिणामी समुद्रातील जीवांचे नुकसान होते. समुद्र किनाऱ्यावरील गावातील लोकांसाठी धोका निर्माण होतो. भूकंप झाल्याने इमारती, वीज आणि गॅस लाईन, झाडे झुडपे अशा बऱ्याच गोष्टीचे नुकसान होते.

सारांश

या लेखातून आपण नैसर्गिक आपत्ती भूकंप माहिती मराठी (Earthquake information in marathi) जाणून घेतली. याविषयी काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. बाकी ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भूकंप म्हणजे काय ?

भूगर्भातील हालचालींमूळे मोठ्या प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते. यामुळे भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, जमिनीला भेगा पडणे, कंपन होणे याला भूकंप असे म्हणतात.

वारंवार भूकंप होणारी महाराष्ट्रातील दोन ठिकाणे कोणती आहेत ?

महाराष्ट्रात हिंगोली, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यात वारंवार भूकंप होतात.

भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते आहे ?

सेस्मोग्राफ आणि सेस्मॉमीटर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र आहे.

भूकंपाच्या वेळी कोणती दक्षता घ्यावी.

भूकंपाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला भूकंपाचा लहान धक्का बसतो आणि त्यानंतर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी हालचाल करुन सुरक्षित स्थळी पोहोचावे.

भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे ?

रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

पुढील वाचन :

  1. भूकंप दक्षता व मार्गदर्शक तत्त्वे
  2. पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती
  3. पर्यावरण नीतीची पंचवीस सूत्रे माहिती मराठी
  4. पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी