अर्थशास्त्राची व्याख्या मराठी – economics definition in marathi

Published Categorized as मराठी माहिती

अर्थशास्त्राची व्याख्या मराठीअर्थशास्त्र सामाजिक शास्त्र आहे. मानवाच्या आर्थिक प्रश्न आणि आर्थिक गोष्टींचा विचार केला जातो. ॲडम स्मिथ याला अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. इसवी सन 1776 मध्ये द वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक ॲडम स्मिथ अर्थशास्त्रचा पाया घातला.

काल मार्क्स याने भांडवलशाही वर टीका करून साम्यवादाचा पुरस्कार केला. केन्स याने रोजगार, व्याज आणि पैसा याची कल्पना मांडली. यातील तज्ञांनी अर्थशास्त्र विकसित करण्याचे काम केले.

अर्थशास्त्रात मानवाच्या गरजा आणि उपलब्ध साधनांच्या संदर्भात मानवी वर्तनाचा विचार केला जातो. अनेक शास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत.

अर्थशास्त्राची व्याख्या मराठी
अर्थशास्त्राची व्याख्या मराठी

आजच्या या लेखात आपण विविध अर्थशास्त्राची व्याख्या मराठीमध्ये पाहणार आहोत.

अर्थशास्त्राची व्याख्या मराठी

अर्थशास्त्र संपत्तीचे शास्त्र आहे.

ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणतात. ॲडम स्मिथ आणि त्यांचे अनुयायी यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे, उत्पत्ती, विभाजन यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र आहे.

ॲडम स्मिथ यांची व्याख्या

राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप आणि तिच्या उत्तपतीचे कारणे यांचे विवेचन करणारे शास्त्र.

जॉन स्टुअर्ट मिल यांची व्याख्या

अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे स्वरूप, तिच्या उत्पादनाचे आणि विभाजनाचे सिद्धांत आणि ह्या मानवी इच्छेच्या सर्वव्यापी हेतूच्या बाबतीत अखिल मानवजातीची अगर एखाद्या मानवी समाजाची स्थिती ज्या कारणामुळे प्रगतीच्या अगर त्याविरुद्ध दिशेने नेली जाते. अश्या सर्वांचा अभ्यास ज्यात प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरीत्या केला जातो. या शास्त्रास अर्थशास्त्र असे म्हणतात.

ॲडम स्मिथ आणि जॉन स्टुअर्ट मिल यांच्या व्याख्येत संपला महत्व दिले आहे. काही अर्थशास्त्रतज्ञानुसार मानवी कल्याण हा अर्थशास्त्राचा मुख्य विषय आहे. त्यांच्या मते संपत्ती हे साधन आहे साध्य नाही.

उपलब्ध साधनांच्या मदतीने सर्व मानव जातीने स्वतःचे कल्याण कसे करावे, याचा अर्थशास्त्रात विचार केला जातो. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचे शास्त्र आहे.

डॉ. मार्शल यांनी केलेली व्याख्या

अर्थशास्त्र म्हणजे मानवी जीवनाच्या सामान्य व्यवहारातील मनुष्य प्रयत्नांचा अभ्यास होय. यशा सात कल्याण साधण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या भौतिक साधनांची प्राप्ती व उपयोग यांच्याशी निगडित असलेल्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांचा अभ्यास केला जातो.

वरील व्याख्यान डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्रात संपत्तीचा अभ्यास मानवी करण्याची दृष ठेवून केला जातो असे म्हटले आहे. डॉक्टर मार्शल यांचे व्याख्यान खूप अर्थतज्ज्ञांना मान्य नाही.

त्यांच्या मते, अर्थशास्त्राची व्यक्तीक फक्त भौतिक साधनांपुरती मर्यादित नाही, तर अर्थशास्त्र अमूर्त अथवा बहुतेक साधनांचा विचार केला जातो.

डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राचे काही भाग पाडून व्याख्या बनवली आहे. यामध्ये प्रामुख्याने मानवी जीवनाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक असे भाग पाडले आहेत.

प्रा. रॉबिन्स यांच्या मते, अर्थशास्त्र मध्ये माहेरची साडी आणि अमर्यादित साध्ये यांचा ताळमेळ कसा करायचा, याचा अभ्यास अर्थशास्त्रात असतो.

प्रा. रॉबिन्स यांची व्याख्या

अर्थशास्त्र हे साध्य आणि पर्यायी उपयोगाची मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

या ठिकाणी प्रा. रॉबिन्स यांनी काही मुद्दे विचारात घेतले.

1. आपल्या गरजा आणि इच्छा मर्यादित असतात आणि ते कायम वाढतच राहतात.

2. अमर्यादित गरजांचे आपण महत्व मापन करून त्यांचा योग्य क्रम लावू शकतो.

3. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी साधने मर्यादित असतात, त्यांचा वापर जपून केला पाहिजे.

काही महत्वाचे

मानवाच्या गरजा असंख्य असतात. पर्यंत गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात.

अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना म्हणतात. डॉक्टर मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ सामाजिक शास्त्र आहे. तर प्राध्यापक रॉबिन्सच्या मते, अर्थशास्त्र हे मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये अर्थशास्त्राची व्याख्या मराठीमध्ये जाणून घेतली.

यामध्ये प्रामुख्याने ॲडम स्मिथ, जॉन स्टुअर्ट मिल, डॉ. मार्शल आणि प्रा. रॉबिन्स यांनी केलेल्या अर्थशास्त्राच्या व्याख्या पहिल्या आहेत.

अर्थशास्त्राची व्याख्या मराठी याबद्दल काही प्रश्न असल्यास, कमेंट मध्ये नक्की विचारा.

जर तुम्हाला अर्थशास्त्राची व्याख्या माहिती उपयुक्त वाटली, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

हे देखील वाचा

अर्थशास्त्र प्रश्न उत्तर मराठी (FAQ)

1. मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केली ?

उत्तर – मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या डॉ. मार्शल यांनी केली.

2. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ?

उत्तर – एकूण रोजगार , एकूण बचत , एकूण भांडवल गुंतवणूक आणि राष्ट्रीय उत्पन्न या सारख्या मोठया समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्रांची शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय.

3. अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे ?

उत्तर – अर्थशास्त्र हे सामाजिकशास्त्र आहे.

4. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते?

उत्तर – भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना मानले जाते.

5. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला ?

उत्तर – अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ आर्य चाणक्य लिहिला.

6. बेकारी चा अभ्यास अर्थशास्त्राच्या कोणत्या शाखेत केला जातो ?

उत्तर – बेकारी चा अभ्यास अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र मध्ये केला जातो.

7. राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणाचा आहे ?

उत्तर – राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला.

Leave a comment

Your email address will not be published.