बँक जुळवणीपत्रक तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता
बँकेमार्फत व्यवहार करत असताना आपण केलेल्या प्रत्येक व्यवहारांची नोंद बँक स्वतंत्रपणे लिहून ठेवत असते. तसेच व्यापारी आपल्या व्यवहारांची नोंद रोकड पुस्तकात लिहितो. बऱ्याचदा या दोन्ही पुस्तकातील शिल्लक रकमेत फरक आढळून येतो. हा फरक शोधून काढण्यासाठी बँक जुळवणी पत्रक उपयोगी पडते. या लेखातून आपण बँक जुळवणीपत्रक कसे तयार करतात, तसेच ते तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.