पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती मराठी (environment pollution types in marathi)

Environment pollution types in marathi – नको तो घटक, नको त्या ठिकाणी, नको त्या प्रमाणात निर्माण होतो, त्यास प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे नैसर्गिक कारणांनी तसेच मानवनिर्मित गोष्टींनी होत असते. प्रदूषणाने सर्व सजीव सृष्टीवर गंभीर परिणाम होत असतो.त्यामुळे यावर प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

मागील लेख पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी यात आपण पर्यावरणाचे महत्व जाणून घेतले आहे. या लेखातून आपण आज प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती मराठी (environment pollution types in marathi) जाणून घेणार आहोत.

प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती मराठी (environment pollution types in marathi)

environment pollution types in marathi
environment pollution types in marathi
विषय प्रदूषणाचे प्रकार
प्रकारपृथ्वीवर परीणाम करणारे घटक
परिणामपृथ्वीचे प्रदूषण
environment pollution types in marathi

पर्यावरणाच्या समस्यासाठी मानव हा इतर सजिवांपेक्षा जास्त कारणीभूत ठरतो. कारण तो आपल्या जीवनातील सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अती प्रमाणात गैरवापर करतो. उदाहरणार्थ. शहरी भागात लोकवस्ती करण्यासाठी झाडांची होणारी कत्तल.

प्रदूषणाचे मुख्य प्रकार तीन आहेत. प्रदूषणाचा पहिला प्रकार म्हणजे जलप्रदूषण, दुसरा वायुप्रदूषण आणि तिसरा मृदाप्रदूषण होय. या तिन्ही घटकांतून होणारे प्रदुषण पर्यावरणातील घटकांवर विपरीत परिणाम करतात.

या तिन्ही प्रकारात प्रदुषण कोणत्या प्रकारे होते ? हे समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवू शकणार आहोत.

जलप्रदूषण प्रकार, परिणाम, कारणे आणि उपाय माहिती मराठी (water pollution in marathi)

water polution in marathi

जल प्रदूषण समस्या मानवनिर्मित कृत्याने घडून येते. वाढत्या लोकसंख्यामुळे पाण्याचा वापर वाढत चालला आहे यामुळे पाणी प्रदूषणाचे प्रमाण सगळीकडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

जल प्रदूषण व्याख्या (water pollution definition in marathi)

मानवी कृत्याने पाण्याच्या मूलभूत गुणधर्मात काही बदल होऊन ते पिण्यायोग्य राहत नाही. या पाण्याचा वापर मानवी आणि इतर सजीवांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो. यालाच जलप्रदूषण असे म्हणतात.

जल प्रदूषण परिणाम मराठी माहिती (water pollution effects in marathi)

वाढत्या जल प्रदूषणाने पुढील गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनात होताना दिसून येतो.

 • पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित होऊन पाणी पिण्यायोग्य राहत नाही.
 • दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात.
 • पिके आणि फळभाज्यांची गुणवत्ता कमी होते. परिणामी त्यातून आपल्या शरीरास आवश्यक तितके घटक मिळत नाहीत.
 • प्राणी, पक्षी यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका उद्भवतो.
जल प्रदूषणाची कारणे कोणती आहेत ?(water pollution causes in marathi)
 • दैनंदिन स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर होतो. कपडे धुणे, भांडी घासणे या मध्ये असणारे साबण किंवा रासायनिक द्रव्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. हे प्रदूषित पाणी ड्रेनेजमार्फत नदीत मिळते. त्यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण होते.
 • औद्योगिक क्षेत्रात विविध उत्पादने तयार करण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये वापरलेले पाणी आणि विविध रसायने कारखान्यातून बाहेर पडतात. हे पाणी टाकाऊ पदार्थ मिसळलेले पाणी असते. त्यामुळे ते दूषित झालेले असते. हेच पाणी पुढे नदी,नाले किंवा तलाव यांच्यात मिसळले गेले की पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात.
 • शेती करताना वापरण्यात येणारे कीटकनाशके आणि खत यापासून प्रदूषण होते.
 • समुद्र मार्गाने जहाजाच्या माध्यमातून तेलाची वाहतूक केली जाते. त्याचं तेलाची गळती होते तसेच जहाजाचा काही अपघात झाला तर तेल समुद्रात मिसळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलचरांच्या हानी होते.
 • मृत पावलेले प्राणी, उत्सवात वापरलेल्या मूर्ती आणि प्लास्टिक कचरा पाण्याच्या स्रोतांमध्ये टाकल्या जातात त्या कारणाने पाणी प्रदूषण होते.
जल प्रदूषणावर उपाययोजना (water pollution remedy in marathi)
 • विहिरी, तलाव आणि सार्वजनिक नळ योजनेजवळ कचरा टाकू नये.
 • पाण्याच्या पाईपजवळ भांड्यांना कल्हई करू नये.
 • निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव किंवा धरणात टाकू नये.
 • जल प्रदूषण संबंधित सर्व कायदे माहित करून घ्या आणि त्या कायद्याचे पालन करणे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचाजल प्रदूषण कारणे मराठी माहिती (water pollution causes in marathi)

वायुप्रदूषण प्रकार, परिणाम, कारणे आणि उपाय माहिती मराठी (air pollution in marathi)

air polution in marathi

वायूप्रदुषणाने सगळ्याच सजीवसृष्टीला धोका पोहोचत असतो. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन वायू ची गरज भासते. पण या प्रदूषणामुळे ऑक्सिजन वायू हा विषारी बनत जातो परिणामी आपल्या आरोग्याला अनेक प्रकारांनी धोका निर्माण होत असतो.

वायू प्रदूषण व्याख्या मराठी (air pollution definition in marathi)

वायु प्रदूषण म्हणजे काय तर हवेमध्ये झालेले भौतिक, जैविक किंवा रासायनिक बदलामुळे सजीवाच्या आरोग्याला, सुरक्षेला आणि कल्याणला हानी पोहचते. यालाच वायुप्रदूषण असे म्हणतात.

वायु प्रदूषण परिणाम मराठी (air pollution effects in marathi)
 • कायम धुरामध्ये बसल्याने डोळे सुजणे, डोळ्याची आग होणे, नाकाचा दाह होणे, दमा आणि फुप्फुसाचे अनेक आजार होतात.
 • घसा दुखणे, डोळ्याची आग होणे, झोप न येणे.
 • श्वसन यंत्रणेवर गंभीर परिणाम होतो.
 • छातीवर दाब येतो.
 • डोकेदुखी आणि उलट्या होणे.
 • कॅन्सर होण्याची शक्यता असते.
 • मिनीमाटा रोग होण्याची शक्यता असते.
 • मानसिक विकार जडतात, सतत चिडचिड होते आणि शरीराला सूज येते.
वायू प्रदूषणाची कारणे काय आहे ? (Air pollution causes in marathi)
 • रंग बनवण्याच्या प्रक्रियेतून स्फोटक पदार्थ निर्माण होतात.
 • वाहने आणि कारखान्यांमधून जाळलेल्या हायड्रोकार्बन्स
 • बोरोन निर्मिती संयंत्रातून
 • पारायुक्त कीटकनाशक बनवल्याने
 • कारखान्याच्या चिमणीतून येणारा धूर
 • कोळसा आणि तेल जाळल्याने, वाहनातून निर्माण होणारा धूर
 • रासायनिक कारखाने, पेपर मिल्स
 • पेट्रोलियम शुध्दीकरण
 • तंबाखू किंवा धूम्रपान करताना तयार झालेल्या धूर
वायू प्रदूषण उपाययोजना मराठी (air pollution remedy in marathi)
 • घरे , कारखाने , वाहने इ. तून होणाऱ्या धूरचे उत्सर्जन कमीत कमी ठेवणे.
 • फटाक्यांचा वापर टाळा .
 • कचरा कचराकुंडीतच टाकावा, कचरा जाळून त्याची विल्हेवाट लावू नये.
 • थुंकण्यासाठी भांडे किंवा वाहत्या गटारींचा वापर करावा.
 • हवेच्या प्रदूषण संबंधित कायदे व नियमांची माहिती करून घेणे व त्यांचे पालन करणे.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचावायू प्रदूषण मराठी माहिती (air pollution information in marathi)

मृदाप्रदूषण प्रकार, परिणाम, कारणे आणि उपाय माहिती मराठी (soil pollution in marathi)

soil pollution in marathi

भूमी सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा आधार म्हणून ओळखली जाते. सजीवांचा जन्म, विकास आणि शेवट याच जमिनीशी निगडित आहे. डोंगर, दऱ्या, नदी नाले अश्या प्रत्येकास जमिनीचा आधार लागत असतो.

जमिनीवर सर्व जीवजंतू, प्राणिमात्र आणि वनस्पती, इतर घटक वास्तव्यास आहे. जमिनीमध्ये आपल्याला विविध खनिज पदार्थ, वायू आणि पाणी मिळत असते.

वाढत्या शहरीकरणामुळे दाट लोकवस्ती होत आहे, यामध्ये अनेक झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडत आहे. याचे परिणाम सर्व जग विविध प्रकारच्या दुष्परिणामांना तोंड देत आहे.

भूमी प्रदूषण म्हणजे काय ? (soil pollution definition in marathi )

मानवी निर्मित कारणांनी किंवा नैसर्गिक पद्धतीने जमिनीची धूप व हानी होते. जमिनीच्या मूळ गुणवत्तेत बदल होतो. यालाच भूमी प्रदूषण असे म्हणतात.

मृदा प्रदूषण परिणाम मराठी (soil pollution effects in marathi)
 • जमिनीवर टाकलेलेया उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा व वापरात आणलेल्या रसायनिक टाकाऊ घटका यांच्या मिश्रणातून माती नापीक होते.
 • हवा, पाणी आणि मृदेच्या प्रदूषणामुळे रोगांच्या साथी पसरतात.
 • हानिकारक किरणोत्सारी पदार्थ हे जलचर व जमीनीवरील वनस्पती, पिके यांच्याद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इत्यादीचा समावेश असतो. या धातूंमुळे रोग पसरतात याने मृत्यू होऊ शकतो.
 • जंगलतोड केल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. जंगले कमी झाल्याने भूपृष्ठावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते.
 • जमिनी ओसाड पडतात.
 • असह्य उष्णतेने अनेक जीव बळी जातात.
 • जमीन कोरडी नापीक होते.
 • प्राणवायू व कार्बन डाय ओक्साईड यांचा समतोल ढासळतो.
मृदा प्रदूषण कारणे मराठी (soil pollution causes in marathi)
 • चांगले पीक यावे यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ही खाते आणि कीटकनाशके तसेच इतर टाकाऊ पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा कस कमी होऊन ती नापीक बनते.
 • रासायनिक खतांमुळे पिकासाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होतो.
 • रासायनिक खताचा अंश पाण्यामार्फत पिकांमध्ये मिसळतात. अन्नाद्वारे ते मानवी शरीरात प्रवेश करतात आणि आपले आरोग्य बिघडते.
 • रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक व चोपड होतात.
 • जमिनीत सलग तीच ती पिके घेतल्याने माती नापीक बनते.
 • पिकांना जास्त पाणी दिल्याने उत्पादन चांगले येत नाही. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी दिले पाहिजे. तसे न केल्यास मृदेचा वरचा थर खारट, नापीक व कडक बनतो.
मृदा प्रदूषण उपाय योजना मराठी (soil pollution remedy in marathi)
 • वनस्पतींची भरपूर प्रमाणात लागवड आणि जतन करावे.
 • पिकांना, वनस्पतींना गरजेपुरताच पाणी पुरवठा करावा.
 • ठिबक सिंचनाने 90% पाण्याची बचत होते, त्यामुळे त्याचा वापर करावा.
 • शेतीची मशागत उतारच्या दिशेने करू नये.
 • नांगरणी, पेरणी आडव्या दिशेत करावी.
 • शेतात सलग एकाच एक पीक घेऊ नये.
 • मशागत आडव्या दिशेने करावी.
 • जमिनीवर गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे.
 • मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे.
 • अतिज्वलनामुळे व अन्य कारणांमुळे विषारी वायू निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, कारण विषारी वायूने जमिनीची धूप होते.

हा लेख जरूर वाचाभूमी मराठी माहिती (land information in marathi)

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती मराठी (environment pollution types in marathi) जाणून घेतली. यात आपण प्रदूषणाचे प्रकार, परिणाम, कारणे आणि उपाय याविषयी माहिती मराठी (environment pollution types in marathi) जाणून घेतली आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला ? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला environment pollution types in marathi माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पर्यावरणीय प्रदूषणाची व्याख्या करा.

नैसर्गिक किंवा मानवी कृत्यांमुळे पर्यावरणात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो यालाच पर्यावरणाचे प्रदूषण असे म्हणतात.

पर्यावरण संरक्षण कायदा कधी करण्यात आला ?

पर्यावरण संरक्षण कायदा 23 मे 1986 रोजी करण्यात आला.