Eye Flu Information In Marathi – नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, नवी दिल्ली या भागात डोळ्यांची साथ पसरलेली आहे. लोकांचे डोळे येण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. यामुळे डॉक्टरांनी दिलेला धोक्याचा इशारा लक्षात घेऊन सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज आहे.
यासाठी आपण या लेखातून डोळे येण्यामागची कारणे, डोळे येण्याची लक्षणे व डोळे आल्यावर काय करावे (Eye Flu Information In Marathi) याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डोळे कशामुळे येतात (Eye Flu Information In Marathi)
डोळे येणे हा डोळ्यांना होणारा संसर्ग रोग आहे. याला कंजंक्टिवायटिस किंवा डोळे लाल होणे असेही म्हणतात. यालाच आपण सोप्या भाषेत डोळे येणे असे म्हणू शकतो.
पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे व्हायरस पसरण्याची संधी मिळते. या ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. आपल्याला वारंवार घाम येतो. यामुळे आपण आपला चेहरा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावत राहतो.
वारंवार चेहऱ्याला हात लावल्यामुळे या रोगाचा संसर्ग होतो आणि डोळे येण्याची साथ पसरते.
Related – चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय
डोळे येण्याची लक्षणे काय आहेत (dole yene lakshan in marathi)
डोळे साधारणपणे संसर्गामुळे येतात. जंतू, बॅक्टेरिया किंवा विषाणू हे डोळे येण्यास कारणीभूत आहेत. काहीवेळा सर्दीमुळेही डोळे येऊ शकतात. तर सर्दीमुळे डोळे येण्याच्या साथीचा प्रसारही होऊ शकतो.
डोळे येण्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
- डोळे हलके लाल होऊ लागतात.
- डोळ्यातून पाणी यायला लागतं.
- खाज येऊ लागते.
- डोळ्यात थोडी चिकटपणा येतो.
- डोळ्यात वारंवार खाज येते.
डॉक्टर सांगतात की, डोळे येण्याची लक्षणे आधी एका डोळ्यात दिसू लागतात, नंतर ती दुसऱ्या डोळ्यामध्येही दिसू लागतात.
डोळे न येण्यासाठी काय करावे (Conjunctivitis treatment in Marathi)
डॉक्टर सांगतात की, कोणताही संसर्ग जन्य आजारापासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेणं गरजेचं असतं, ती घेतल्याने या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.
डोळे न येण्यासाठी तुम्ही पुढील काळजी घेऊ शकता.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टावेल वापरणं टाळावं
- हात स्वच्छ धुवावेत
- डोळ्यांना सारखा हात लावू नये
डोळे आल्यावर अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. ज्या व्यक्तिचे डोळे आले आहेत अशा व्यक्तीचा हातरुमाल, टॉवेल वापरू नये. सर्दी, ताप आल्यास किंवा नाक शिंकरल्यानंतर डोळ्याना स्पर्श करु नये.
डोळे आल्यावर काय करावे (conjunctivitis treatment in marathi)
साधारणपणे डोळे आल्यावर 2 आठवड्यांच्या दरम्यान हा आजार बरा होतो. पण हा आजार बरा करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला पुरक अशीच औषधं घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
मध हा डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन त्यात दोन चमचे मध घाला. त्यानंतर या मधाच्या पाण्याने डोळे धुवा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
गुलाब जलाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्याने डोळ्यांना आराम मिळतो. गुलाब जलामुळे संक्रमण करणाऱ्या जंतूंशी लढण्यास मदत होते. यामुळे हे पाणी डोळ्यांच्या फ्लूमुळे होणारी समस्या कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो.
डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी बटाटा खूप उपयोगी ठरू शकतो. बटाट्याचे गोल काप करून डोळ्यांवर 10-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीची पाने पाण्यात रात्रभर भिजत ठेऊन सकाळी ही पाने गाळून या पाण्याने डोळे धुवा. तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असून ते डोळ्यांच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात. अर्धा चमचा हळद पावडर थोड्या कोमट पाण्यात मिसळून हळदीच्या पाण्यात कापूस भिजवून डोळ्यांना लावला की डोळ्यातील घाण निघून जाते.
नेत्र सौदर्य प्रसाधनाच्या जास्त वापरामुळे, डोळ्यावर वार्याचा मारा जास्त होतो. तसेच अतिनील किरणांमुळे डोळे येतात. यामुळे डोळे आल्यावर नेत्र सौदर्य प्रसाधनाचा वापर कमी किंवा शक्य असल्यास पूर्ण बंद करावा.
डोळ्याची जळजळ होत असल्यास डोळ्यावर थंड पाणी टाका. डोळ्यांतून चिपड येत असेल तर, डोळे कोमट पाण्याने व टिश्यू पेपरने वारंवार साफ करा, यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
Related – केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय माहिती
लहान मुलांचे डोळे येणे घरगुती उपाय
जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरू नका. सध्या मुलांचा मोबाईल आणि कॉम्प्युटरवर सगळ्यात जास्त वेळ जात आहे. अशात मुलांना थंड पाण्याने डोळे धुवायची सवय लावा.
डोळे आलेल्या लहान मुलांना शाळेत पाठवू नये. तसेच गर्दी किंवा मैदानावर खेळण्यासाठी पाठवू नये. मोबाईल आणि टीव्हीचा वापर पूर्णपणे बंद करावा.
डोळे आल्यावर स्वतःचा मनाने मेडिकल मध्ये जाऊन गोळ्या औषधे न आणता, डोळे आल्यावर आधी नेत्र तपासणी करून, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.
सारांश
तर मित्रांनो मी आशा करतो की, तुम्हाला डोळे येण्यामागची कारणे, डोळे येण्याची लक्षणे व डोळे आल्यावर काय करावे (Eye Flu Information In Marathi) याची सविस्तर माहिती मिळाली असेल.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर मित्रांनाही नक्कीच शेअर करा.