मागील लेखात आपण वायदे बाजार व ऑप्शन ट्रेडिंग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यात आपण पहिले की, शेअर्सची मागणी व पुरवठा यावर आधारित ऑप्शन चैनमध्ये किमतीत बदल होतात.
हा बदल नेमका कसा होतो ? ऑप्शन चैनच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक (factors affecting price of an option chain marathi) कोणते आहेत, तसेच या किंमतीचा अंदाज कसा ठरवावा लागतो ? अश्या विविध प्रश्नाची उत्तरे आपण या लेखाद्वारे समजून घेणार आहोत.
Table of Contents
- ऑप्शन चैनच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक (factors affecting price of an option chain marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
ऑप्शन चैनच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक (factors affecting price of an option chain marathi)
विषय | ऑप्शन चैनच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक |
प्रकार | किंमतीवर परिणाम करणारे घटक |
दररोजच्या जीवनात आपण अनेक व्यवहार करत असतो, हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैसा एक माध्यम म्हणून काम करते. एखाद्या वस्तूच्या किंवा सेवेच्या बदल्यात द्यावे लागणारे मूल्य म्हणजे किंमत होय.
किंमत ही कोणत्याही वस्तूच्या किंवा सेवेच्या मागणी व पुरवठा यावर आधारित असतो. याप्रमाणे शेअर्सची किंमत त्याची होणारी मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे शेअर बाजारातील शेअर्सची किंमत वाढ आणि घट होताना अनेक घटक महत्त्वाचे ठरतात.
#1 सध्याची स्टॉक किंमत
ऑप्शन चैनमधील किंमती शेअरच्या मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. ऑप्शन चैनमध्ये कॉल व पुट हे दोन प्रकार असतात. जर अंतर्निहित मालमत्तेची किंमत वाढली तर कॉलची किंमत वाढते. अंतर्निहित मालमत्तेची किंमत कमी झाली तर पुटची किंमत वाढते.
उदा. आयडिया शेअर्सची किंमत सध्या 8 आहे. या महिन्यात आयडिया 10 रुपयांपर्यंत जाईल, म्हणून मी strike price 10 वर कॉल ऑप्शन खरेदी केला. जर आयडियाची किंमत वाढली तर कॉलची किंमत वाढून मला फायदा होईल. याउलट जर आयडिया चा शेअर आठ रुपयेच्या खाली गेला तर कॉलची किंमत कमी होऊन पुटची किंमत वाढेल.
#2 चालू स्ट्राइक किंमत
स्ट्राइक किंमत म्हणजे अंतर्निहित मालमत्तेची किंमत या किंमतीवर कॉल व पुट खरेदी किंवा विक्री केला जातो. ही किंमत ऑप्शन चैनमध्ये खूप महत्वाची असते.
कॉल ऑप्शन चैनमध्ये वरच्या स्ट्राइक किमतीवर कमी प्रिमियम द्यावा लागतो. तर खालच्या स्ट्राइक किमतीवर जास्त प्रिमियम द्यावा लागतो.
याउलट पुट ऑप्शन चैनमध्ये खालच्या स्ट्राइक किमतीवर कमी प्रिमियम द्यावा लागतो. तर वरच्या स्ट्राइक किमतीवर जास्त प्रिमियम द्यावा लागतो.

उदा. SBI ची 9 सप्टेंबर रोजी किंमत 553 रुपये आहे. 29 सप्टेंबर पर्यंतच्या ऑप्शन चैनमध्ये 530 च्या स्ट्राइक किंमतीवर कॉल ऑप्शनसाठी 29.20 रुपये प्रीमियम द्यावे लागत आहे. तर याच स्ट्राइक प्राईजवर 4.70 रूपये प्रीमियम द्यावे लागत आहे.
#3 ऑप्शन कालावधी
स्टॉक एक्सपायर होताना स्टॉक किंमत व स्ट्राइक किंमत एकच तर शेअर्सचे आंतरिक मूल्य (intrinsic value) शून्य असते.
ऑप्शन चैनमध्ये कॉलचे आंतरिक मूल्य काढताना स्टॉक किंमतीमधून स्ट्राइक किंमत वजा करावी लागते. वजा करून आलेले उत्तर शुण्याहून लहान असेल तर आंतरिक मूल्य नसते.
ऑप्शन चैनमध्ये पुटचे आंतरिक मूल्य काढताना स्ट्राइक किंमतीमधून स्टॉक किंमत वजा करावी लागते. वजा करून आलेले उत्तर शुण्याहून लहान असेल तर आंतरिक मूल्य नसते.
कॉल व पुट ऑप्शन केव्हा केव्हा एक्सपायर होणार आहे ? यावरून ऑप्शन चैनच्या किंमतीवर परिणाम होतो. जर ऑप्शन चैनमधील कॉल व पुटची एक्सपायरी होण्यासाठी अधिक दिवस असेल तर त्याची किंमत जास्त असते. याउलट एक्सपायरी होण्यासाठी दिवस कमी असेल तर किंमत कमी कमी होत जाते.
#4 अंतर्निहित मालमत्तेची देवाणघेवाण (volatility in options)
स्टॉकची देवाणघेवाण म्हणजेच अंतर्निहित मालमत्तेची उदा. शेअर्स खरेदी वाढली तर कॉल ऑप्शन चैनच्या किंमती वाढतात, याउलट शेअर्स विक्री वाढली तर पुट ऑप्शन चैनच्या किंमती वाढतात.
स्टॉक मार्केटमध्ये volatility च्या मदतीने आपण बाजाराचा कल ओळखू शकतो. यासाठी अनेक इंडिकेटर्स उपलब्ध आहेत याच्या मदतीने तुम्ही बाजाराचा अचूक अंदाज बांधू शकता.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये ऑप्शन चैनच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक (factors affecting price of an option chain marathi) जाणून घेतले. या घटकावर ऑप्शन चैनच्या किंमती बदलतात.
ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
What is strike price meaning in options marathi ?
strike price म्हणजे ऑप्शन चैनमधील अशी किंमत जिथे आपण कॉल व पुट ऑप्शन खरेदी किंवा विक्री करतो.
Best indicator to calculate volatility
1. Bollinger Bands
2. Keltner Channel
3. Donchian Channel
4. Average True Range (ATR)
5. India VIX
पुढील लेख :