Farmers Autobiography In Marathi – शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा! जीवनास आवश्यक असणाऱ्या बाबींची निर्मिती करणारा शेतकरी आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपल्या देशातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. यामुळे शेतकरी हा भारतातील समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
शेती व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहावे लागते. परिणामी शेतकरी वर्गाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आज आपण याच शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध (farmers autobiography in marathi) पाहणार आहोत.
शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध (farmers autobiography in marathi)

हॅलो गुड मॉर्निंग..गुड आफ्टरनून आणि गुड इवनिंग कसे आहात सगळेजण? काय झालं?? असे आश्चर्यचकित का झालात?? अहो मी शेतकरी. तुमचा लाडका शेतकरी, तुमच्या भाषेत जगाचा पोशिंदा.
मी शेतकरी असलो म्हणून काय झालं, एवढं तर इंग्रजी मला म्हणता येतच. मला माहिती आहे तुम्हाला राम राम मंडळी.. काय कसे आहात असे ऐकायची सवय आहे. परंतु काळ बदललेला आहे, म्हणून मला देखील बदलणे गरजेचे आहे.
मी आधीच तंत्रज्ञान व अन्य काही गोष्टी यामुळे मागे पडलेलो आहे, परंतु आता मला मागे राहून चालणार नाही. कारण की मी शेतकरी आहे ,याची मला जाणीव आहे.
परंतु ही जाणीव तुम्हाला आहे का? मी तुम्हाला कुठल्या पद्धतीचा जाब विचारणार नाहीये, पण माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटत आहे. तुम्हाला वाईट देखील वाटेल परंतु या काही गोष्टी तुम्हाला सांगणे गरजेचे आहे. नाहीतर येणारा काळ हा मला माफ करणार नाही.
एकेकाळी मी जगाचा पोशिंदा होतो. भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून मानला जायचा. आजही 50 टक्के पेक्षा जास्त लोक शेती करतात असे अनेक पुस्तक, ग्रंथालय आणि सरकारी कागदांवर हा आकडा मोठ्या दिमाखात मिरवला जातो परंतु हे खरे आहे का?
भारत खरच कृषीप्रधान देश आहे का? जर असे असेल तर भारतातील कृषीप्रधान देशात शेतकरी गरिबीमध्ये का जगत आहे? आणि रस्त्यावर जगणारा शेतकरी दिवसेंदिवस पांगळा का होत आहे? बरं याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? असेल तर मला देखील सांगा आणि नसेल तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम मात्र आवश्य करा.
Related – शेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी
शेतकरी आत्मकथा निबंध मराठी (marathi nibandh shetkaryachi atmakatha)
मी शेतकरी, माझ्या दिवसाची सुरुवात सूर्य उगवण्याच्या अगोदर होते आणि शेवट सूर्य मावळल्यावर होतो. तुमच्यासारखे मला नऊ ते पाच जॉब काही करता येत नाही. एसीचा तर माझ्याशी दूर संबंध देखील येत नाही. मला रखरखत्या उन्हामध्ये आणि सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये अगदी विठ्ठलासारखे मातीमध्ये उभे राहावे लागते. कारण की मला तुम्हाला जगवायचे आहे.
मी जर काम केले नाही शेतामध्ये पेरणी केली जाणार नाही. शेती केली नाही तर तुमच्या सर्वांचे जगण्याचे वांदे होतील आणि मी इतका निष्ठुर होऊ शकणार नाही. मला तुम्हाला जगवणे भाग आहे.
मला तुमची काळजी आहे, परंतु तुम्हाला माझी काळजी आहे का? आज तुम्ही पैसे कमवत आहात. महिन्याला हजारो रुपये कमवत आहात. परंतु बाजारामध्ये जाताना भाजीवाल्याकडे गेल्यावर तो जे पैसे सांगेल ते पैसे आपण देतो का? उलट भाजी महाग झालेली आहे असे म्हणूनच त्याच्यावर ओरडत असतो. त्याला अतिरिक्त पैसे देण्याऐवजी आपले पैसे कसे वाचतील याचा विचार करत असतो.
परंतु हाच विचार मॉलमध्ये गेल्यावर, कपडे खरेदी करताना मात्र येत नाही. हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थ खाताना मात्र येत नाही. हा फरक आपल्याला दूर करायचा आहे, असे जर झाले तर शेतकरी सुखाने जगू शकेल.
आज शेतीमध्ये पीक उगवताना बी -बियाणे महाग झालेले आहे. शेताच्या मालाला योग्य तो भाव नाही. निसर्ग तर रुद्ररूपच धारण करत आहे. डोक्या एवढे तयार झालेले पीक एका मुसळधार पावसाने नष्ट होऊन जाते ,अशावेळी मला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय उरत नाही.
कर्जाचा डोंगर इतका झाला आहे की माझे कुटुंब रात्री नीट देखील झोपत नाही. तुमचे कुटुंब मात्र एसीच्या थंडगार हवेमध्ये निवांत झोपत असते. मला मान्य आहे की मला देखील काही गोष्टी शिकून घेणे गरजेचे आहे.
शेतीवर भविष्यात भागणार नाही, परंतु असा विचार जर प्रत्येक शेतकऱ्याने केला तर आपण खायचे तरी काय? हा देखील मोठा प्रश्न आहे. मी तुमच्याकडे तक्रार करत नाहीये. तुम्ही माझीच माणसे आहात आणि म्हणूनच माझ्या मनातले काही दोन शब्द तुमच्यासमोर मांडून माझे मन हलके करत आहे.
या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला वेळ मिळाला तर माझे म्हणणे एकदा आठवण करून पहा आणि या सर्व गोष्टींवर विचार करून पहा.
माझ्यासाठी इतकं करायला आणि जर माझ्यासाठी काहीतरी करावं वाटलं तर पुढच्या वेळी तुमच्या आजूबाजूला एखादा शेतकरी जर दिसला तर त्याला एक मिठी मारायला विसरू नका, कारण की तुम्ही दिलेला हात तुमचा आधार आम्ही समजू आणि तुम्ही दिलेली मिठी प्रेमाचे प्रतीक समजू आणि हेच तुमचे प्रेम तुमचा सन्मान आमच्या जगण्याला बळ देईल.
रस्त्यावर विकणारा भाजीपाल्याला योग्य भाव द्या. त्याला ही दोन पैसे कमविण्याची संधी द्या. हीच नम्र विनंती..
सारांश
आशा करतो की, तुम्हाला शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध (farmers autobiography in marathi) नक्की आवडला असेल.
जर तुम्हाला कोणत्याही विषयावर आत्मकथा, निबंध किंवा भाषण हवे असेल, तर आम्हाला कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर संबंधित विषयावर लेख प्रसिद्ध करू.
तुम्हाला आवडतील असे काही निबंध –