शेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी

Categorized as Blog

Farmers problems and solutions in marathi – शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा! जीवनास आवश्यक असणाऱ्या बाबींची निर्मिती करणारा शेतकरी आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपल्या देशात अर्थव्यवस्थेचा पाया शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. यामुळे शेतकरी हा भारतातील समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

मानव फार पूर्वीपासून पिकांची लागवड करत आहे. शेतीचा प्रयोग साधारणपणे आदिमानवापासून केलेला दिसून येतो. शेती आणि शेती व्यवसायावर शेतकऱ्याची उपजीविका चालत असते.

शेती व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहावे लागते. परिणामी शेतकरी वर्गाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. या लेखातून आपण शेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी (Farmers problems and solutions in marathi) जाणून घेणार आहोत.

शेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी (Farmers problems and solutions in marathi)

शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते सुपीक जमीन आणि पाणी. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य होते, पाण्याची कमतरता असली तर पाण्याच्या इतर स्रोतांमार्फत शेती केली जाते.

याव्यतिरिक्त शेतीसाठी पुरेसे मनुष्यबळ लागते. पुरेसे मनुष्यबळ असले की शेतातील पिकांची निगा योग्य राखता येते. तसेच शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी भांडवल म्हणजेच पैसा आवश्यक ठरतो.

यानंतर तयार झालेला शेतमाल जेथे विकला जातो त्या बाजारपेठेचा बाजारभाव यावर शेतकऱ्याचे उत्पन्न अवलंबून असते.

शेतीचा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे, असे म्हंटले तरी वागवे ठरणार नाही. शेतकऱ्याने केलेली मेहनत, चांगला पाऊस आणि बाजारातील चांगला मिळणारा भाव यावर शेतकऱ्याचे उत्पन्न ठरते.

शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात. असे असले तरीदेखील भारतील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला दिसून येतो.

Related – भारतातील कुटिरोद्योग माहिती

शेती विषयक समस्या माहिती मराठी (problems of farmers in marathi)

जर हवामानात अचानक बदल झाला, तर शेतातील पिकांचे खूप नुकसान होते. परिणामी शेतात घेतलेली मेहनत आणि हजारो रुपये खर्च करून तयार झालेला शेतमाल वाया जातो.

शेती करताना शेतकऱ्याला पुढील संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यास केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही.

  • बेमोसमी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे एक नैसर्गिक आपत्ती असल्याने यापासून पिकांचे संरक्षण करता येत नाही. यावर उपाय म्हणून पिकांचा विमा योजना काढावा लागतो.
  • बेमोसमी पावसाला ओला दुष्काळ म्हणून ओळखला जातो. या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
  • तसेच पाऊस न पडल्याने देखील पिकांचे नुकसान होते, यालाच कोरडा दुष्काळ म्हंटले जाते.
  • ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ यातून सुरक्षित वाढलेले पीक बाजारपेठेतील विकताना, बाजारभावात होणारी घसरण शेतकऱ्याला अडचण निर्माण करतात.
  • शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज
  • परतफेडीची मुदत
  • निर्यातीतील होणारे शासकीय बदल

ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां समस्यांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा शेतकरी सर्वांना लागणारे अन्नधान्य पिकवतो.

शेती विषयक समस्या वर उपाय माहिती मराठी (Solutions to farmers problems in marathi)

शेतीत उत्तम पीक घेण्यासाठी सुपीक जमीन आवश्यक असते. त्यासाठी जमिनीची वेळेवर मशागत करणे आवश्यक असते. पीक चांगले यावे, म्हणून खतांचा योग्य वापर करावा लागतो. रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करून सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे.

मातीचा कस वाढवण्यासाठी हंगामी आणि विविध पीक घेतले पाहिजे. योग्य नियोजित पिकांची लागवड करून मातीचा कसं वाढत जातो.

ज्वारी, बाजरी, मका आणि कडधान्ये यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी संशोधन व विस्तार कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पिकविलेल्या पिकावर विमा काढून पिकाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

शेतीसोबतच प्रत्येक शेतकऱ्याने शेळीपालन, मत्स्य व्यवसाय, कोबंडी पालन असे शेतीला जोडधंदा केला पाहिजे. यामुळे शेतकरी वर्गाला फक्त शेतीवरच अवलंबून राहावे लागणार नाही.

कृषी विद्यापीठ आणि शासनाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना तयार करून त्या प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना पुरविल्या पाहिजे. तरच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना बरे दिवस येतील.

सारांश

या लेखातून आपण शेतकरी समस्या व उपाय (Farmers problems and solutions in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच सामायिक करा.

FAQs

शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

पोशिंदा म्हणजे पालनपोषण करणारा होय. ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां समस्यांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा शेतकरी सर्वांना लागणारे अन्नधान्य पिकवतो. यामुळे शेतकऱ्यास जगाचा पोशिंदा म्हंटले जाते.

आद्य शेतकऱ्यांचा काळ कोणता?

आद्य शेतकऱ्यांचा काळ म्हणून नवाश्मयुगाला ओळखले जाते. या काळाला मानवी विकासाचा टप्पा म्हणून ओळखतात. या काळात मानवाने चाकाचा शोघ, अग्नीचा वापर, पशुपालन, कृषिउद्योग, सामूहिक, कौटुंबिक जीवनाला प्रारंभ व कापडनिर्मितीचा शोध लावला.