fd and rd in marathi – मुदत ठेव आणि आवर्ती ठेव या दोन्हीही ठेवीचे प्रकार आहेत. आता ठेव म्हणजे काय ? तर ठेव म्हणजे एक ठराविक रक्कम परतावा मिळेल या हेतूने बँकेत, पतसंस्थेत किंवा इतर वित्तीय संस्थामध्ये जमा करणे होय.
या लेखातून आपण ठेवीविषयी (deposit information in marathi) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण ठेवीचे प्रकार, फायदे व इतर बरीच माहिती समजावून घेणार आहोत.
Table of Contents
- ठेव म्हणजे काय (deposit meaning in marathi)
- मुदत ठेव योजना (fixed deposit information in marathi)
- आवर्ती ठेव म्हणजे काय (recurring deposit meaning in marathi)
- मुदत ठेव आणि आवर्ती ठेव फरक काय आहे (difference between fd and rd in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
ठेव म्हणजे काय (deposit meaning in marathi)

विषय | ठेव |
प्रकार | वित्तीय गुंतवणूक |
उद्देश | चांगला परतावा मिळवण्यासाठी |
एक चांगली गुंतवणूक आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकते. यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गुंतवणुकीसाठी मार्ग शोधत असतो. प्रामुख्याने बँका, पतसंस्था व अन्य वित्तीय संस्था ग्राहकांना आकर्षित करत नवनवीन गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देतात.
या पर्यायांपैकी ठेव (deposit) हा एक महत्वपूर्ण पर्याय आहे. ठेव म्हणजे एका विशिष्ट वेळेने, विशिष्ट व्याजासोबत पैसे परत मिळतील, या उद्देशाने केली जाणारी गुंतवणूक होय.
बँकेतील ठेव ही सुरक्षिततेची ठेव मानली जाते. यासोबतच काहीजण पतसंस्था व वित्तीय संस्था यांच्याकडे ठेव जमा करतात.
गुंतवणूक किती दिवसांसाठी केली आहे ? यावरून ठेवीचे दोन प्रकार वर्गीकरण करण्यात येते.
मुदत ठेव योजना (fixed deposit information in marathi)
एफडीचा मराठी फुल्ल फॉर्म (fd full form in marathi) मुदत ठेव असा आहे. यालाच मूल्य ठेव व मुदत ठेव या नावाने ओळखले जाते.
मुदत ठेव योजना (fixed deposit) हा ठेवीचा पहिला प्रकार आहे. या प्रकारात एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली रक्कम मुदतीदरम्यान काढता येत नाही.
उदा. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत 10,000 रुपयांची रक्कम मुदत ठेव योजना अंतर्गत 12 महिन्यासाठी जमा केली. तर 12 महिन्यांच्या आत जमा केलेली रक्कम तुम्ही कधी शकत नाही. जर तुम्ही ही रक्कम निर्धारित मुदतीच्या अगोदरच काढून घेतली, तर तुम्हाला त्याचे व्याज मिळत नाही.
तसेच मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते किंवा ही रक्कम पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. मुदत ठेवीत पैसे अधिक काळासाठी ठेवले तर जास्त व्याजदराने परतावा मिळतो.
यासाठी मुदत ठेव सुलभ व्हावी या हेतूने ठेवीच्या विविध योजना आहेत. या योजनेनुसार मुदत ठेवीच्या तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे मासिक व्याज मुदत ठेव, दुसरा प्रकार त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव व तिसरा पर्याय पुनर्निवेश योजना.
मासिक व्याज मुदत ठेव (monthly fixed deposit plan) – या योजनेत आपल्याला दर महिन्याला व्याजाची रक्कम मिळते. पण संपूर्ण वर्षात मिळणाऱ्या व्याजापेक्षा ही रक्कम थोडी कमी असते. उदा. 10,000 रुपयांवर 10 टक्के दराने एक वर्षाचे 1000 रुपये होतात. पण हीच रक्कम 10 टक्के दराने मासिक व्याजावर ठेवली तर महिन्याला 83.33 या दर मिळतो.
त्रैमासिक मुदतीची ठेव योजना (three months fixed deposit plan) – दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम मिळते. पेन्शन धारक ग्राहकांमध्ये आवडती योजना आहे.
पुनर्निवेश योजना (reinvestment fixed deposit plan) – दर तीन महिन्यांनी मिळणारी व्याजाची रक्कम पुन्हा मुदलात गुंतवली जाते अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाची रक्कम आणि मुद्दल हे मुदतीच्या शेवटी मिळते.
आवर्ती ठेव म्हणजे काय (recurring deposit meaning in marathi)
आरडीचा मराठी फुल्ल फॉर्म (rd full form in marathi) आवर्ती ठेव असा आहे. आवर्ती ठेव ही एक विशेष प्रकारची मुदत ठेव आहे ज्यामध्ये दर महिन्याला किंवा दरवर्षी ठराविक रक्कम जमा केली जाते.
मुदत ठेव व आवर्ती ठेव योजनेवर जवळपास सारखेच व्याज मिळते. या प्रकारची ठेव ठराविक तारखेला परिपक्व होते. ही ठेव विशेषतः अशा लोकांसाठी सोयीस्कर आहे ज्यांचे नियमित उत्पन्न निश्चित आहे.
तसेच या योजनेमुळे लोकांना दर महिन्यात आपल्या जवळील रक्कम गुंतवणूक करून तिचे मूल्य वाढवण्याची संधी मिळते.
आवर्ती ठेवीचा किमान कालावधी सहा महिने आणि कमाल कालावधी दहा वर्षे इतका असतो. या योजनेअंतर्गत दर महिन्याला काही ठराविक रक्कम जमा करावी लागते. जर कोणत्याही हप्त्याला उशीर झाला, तर खात्यातील देय व्याज कमी केले जाते.
मुदत ठेव आणि आवर्ती ठेव फरक काय आहे (difference between fd and rd in marathi)
मुदत ठेव | आवर्ती ठेव |
---|---|
मुदत ठेव योजनेचा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत असतो. | आवर्ती ठेवीचा कार्यकाळ साधारणपणे 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत बदलतो. |
दरवर्षी जमा झालेल्या व्याजावर चक्रवाढ व्याज मोजले जाते. | कंपाउंडिंग व्याज साधारणपणे प्रत्येक तिमाहीत मोजले जाते. |
सर्व निवासी भारतीय आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (HUFs) मुदत ठेव खाते उघडण्यास पात्र आहेत. | सर्व निवासी भारतीय आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) आरडी खाते उघडण्यास पात्र आहेत. हे खाते अल्पवयीन मुलांसाठी त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक देखील उघडू शकतात. |
भांडवल आणि कार्यकाळ यावर मुदत ठेव व्याज अवलंबून असते. | कालावधी आणि मासिक गुंतवणूक रकमेवर आवर्ती व्याज दर अवलंबून असतो. |
या योजनेअंतर्गत कर सूटकलम 80C च्याआयकर कायदा 1961 लागू आहे. हे 5 वर्षांपेक्षा जास्त ठेवींसाठी लागू आहे. | या योजनेत कोणताही कर लाभ दिला जात नाही. |
बहुतेक बँका ठेव मूल्याच्या 70 ते 90 टक्के कर्ज देतात. | बहुतेक बँका ठेव मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज देतात. |
या योजने मुदतपूर्व पैसे काढल्यावर दंड आकारतात. | या योजने मुदतपूर्व पैसे काढल्यावर दंड आकरत नाही. काही बँका दंड आकारू शकतात. |
या योजनेत मिळणारे व्याज करपात्र असते आणि बहुतेक बँका TDS कापतात. | या योजनेत मिळणारे व्याज करपात्र असते आणि बहुतेक बँका TDS कापतात. |
सारांश
या लेखातून आपण मुदत ठेव आणि आवर्ती ठेव माहिती मराठी (fd and rd in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
वाणिज्य बँकेत मुदत ठेव जास्तीत जास्त किती कालावधी पर्यंत करता येते ?
वाणिज्य बँकेत मुदत ठेव जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत करता येते.
कोणत्या ठेवीवर जास्त व्याजदर असतो ?
पुनर्निवेश योजना मुदत ठेवीवर जास्त व्याजदर असतो. रक्कम व कालावधी यांच्यावर व्याजदर अवलंबून असतो.
कोणती ठेव मुदत पूर्ण झाल्यानंतर परत केली जाते ?
आवर्ती ठेव मुदत पूर्ण झाल्यानंतर परत केली जाते.
मुदत ठेव म्हणजे काय ?
मुदत ठेव म्हणजे एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव होय.
आवर्ती ठेव म्हणजे काय ?
आवर्ती ठेव म्हणजे अशी मुदत ठेव ज्यामध्ये दर महिन्याला किंवा दरवर्षी ठराविक रक्कम जमा केली जाते.
पुढील वाचन :