मुदत ठेव खाते माहिती मराठी (fd full form in marathi)

By | November 19, 2022

FD full form in marathi – एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली रक्कम व ही रक्कम मुदतीदरम्यान काढता येत नाही, त्यास मुदत ठेव असे म्हणतात. ही रक्कम बँकेत ठेवल्यानंतर आपल्याला काही टक्के व्याज मिळत असते. त्यामुळे बहुतांश लोक पैसे सुरक्षित ठेऊन त्याची वाढ व्हावी या हेतूने बँकेत मुदत ठेव खाते उघडतात आणि गुंतवणूक करतात.

भारतातील सरकारी आणि खासगी या दोन्ही प्रकारातील बँका मुदत ठेव खात्याची सुविधा देतात. मुदत ठेवीवर जास्तीत जास्त वार्षिक 7 टक्के व्याज मिळू शकते. व्याजाचा दर आपण कोणती बँक खाते उघडले आहे त्यानुसार बदलते.

या लेखातून आपण मुदत ठेव खाते माहिती मराठी (fd full form in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण मुदत ठेव खाते, प्रकार, उपयोग आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाडिमॅट अकाउंट माहिती मराठी (Demat account information in marathi)

Table of Contents

मुदत ठेव खाते माहिती मराठी (fd full form in marathi)

fd full form in marathi
विषय मुदत ठेव खाते
प्रकार गुंतवणूक खाते
उपयोगगुंतवणूक करण्यासाठी
सुविधा पुरविणारेसरकारी आणि खाजगी बँक, वित्तीय संस्था

fd full form in marathi – एफडीचा फुल्ल फॉर्म फिक्स्ड डिपॉजिट (fixed deposit) असा आहे, ज्याचा मराठी अर्थ मुदत ठेव किंवा मूल्य ठेव असा आहे. बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांना आकर्षक व्याजदर देऊन गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करतात. यामुळे बँक किंवा वित्तीय संस्थेला सामान्य लोक किंवा व्यापारी आपले पैसे देऊन व्याज मिळवतात.

rd full form in marathi – आरडीचा फुल्ल फॉर्म रेक्युरींग डिपॉजिट (Recurring deposit) असा आहे. आवर्ती ठेव ही भारतीय बँकांद्वारे ऑफर केलेली एक विशिष्ट मुदत ठेव आहे, जी नियमित उत्पन्न असलेल्या लोकांना त्यांच्या आवर्ती ठेव खात्यात दरमहा एक निश्चित रक्कम जमा करण्यास आणि मुदत ठेवींवर लागू असलेल्या दराने व्याज मिळविण्यास मदत करते.

हा लेख जरूर वाचाबीटीएसटी व्यापार माहिती (btst trade in marathi)

मुदत ठेव खाते म्हणजे काय (what is fixed deposit with example)

बँक ही पैश्याची देवाणघेवाण करणारी संस्था आहे. बँक ग्राहकांना विविध सेवा पुरविते. यापैकीच एक सेवा म्हणजे विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना. या योजनेतून ग्राहक निर्धारित मुदतीसाठी काही रक्कम बँकेत जमा करतात. या रकमेवर बँक ग्राहकांना नियमानुसार व्याज देते. पण ग्राहक जेव्हा या योजनेअंतर्गत पैसे बँकेत जमा करतो, त्यांनतर निर्धारित करण्यात आलेल्या मदतीशिवाय त्याला आपले पैसे काढता येत नाहीत. जर त्याने ते पैसे काढले तर त्यास व्याज मिळत नाही.

मुदत ठेवीचे प्रकार माहिती मराठी (types of fixed deposit)

मुदत ठेवीचे एकूण तीन प्रकार आहेत, पहिला प्रकार मासिक व्याज मुदत ठेव, दुसरा प्रकार त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव आणि तिसरा प्रकार पुनर्निवेश योजना हा आहे.

#1 मासिक व्याज मुदत ठेव – या ठेवीवर दर महिन्याला व्याजाची रक्कम मिळते. संपूर्ण वर्षात मिळणाऱ्या व्याजापेक्षा ही रक्कम थोडी कमी असते. उदा. 10,000 रुपयांवर 10 टक्के दराने दरवर्षी 1,038 रुपये मिळतात. पण हीच रक्कम 10 टक्के दराने मासिक व्याजावर ठेवली तर मिळणारी रक्कम 82.65 रुपये दर महिन्याला मिळतात.

#2 त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव – दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम मिळते. पेन्शन धारक ग्राहकांमध्ये आवडती योजना आहे.

#3 पुनर्निवेश योजना – दर तीन महिन्यांनी मिळणारी व्याजाची रक्कम पुन्हा मुदलात गुंतवली जाते. अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाची रक्कम आणि मुद्दल हे मुदतीच्या शेवटी मिळते.

हा लेख जरूर वाचाव्यापार खाते म्हणजे काय (trading account information in marathi)

शाखेत जाऊन मुदत ठेव खाते कसे उघडायचे (how to open fixed deposit account by visiting branch)

  1. तुमचे बँकेत आधीच बचत खाते असल्यास, त्यांच्या वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा.
  2. फॉर्ममध्ये योग्य कालावधी आणि रक्कम भरा.भरलेला अर्ज बँकेच्या शाखेत सबमिट करा.
  3. काही बँकांना तुम्हाला तुमच्या नॉमिनीचे तपशील सबमिट करण्याची आवश्यकता असू शकते, त्यामुळे तुमच्याकडे अचूक माहिती असल्याची खात्री करा.
  4. एफडीची रक्कम भरण्यासाठी तुमच्या खात्यात पुरेसे पैसे असल्याची खात्री करा.
  5. बँकेला भेट देण्यापूर्वी तुम्ही फॉर्म डाउनलोड करू इच्छित नसल्यास, तुम्ही शाखेच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला तो फॉर्म देण्यास सांगू शकता.

नेट बँकिंगवरून मुदत ठेव खाते कसे उघडायचे (how to open a fixed deposit account online)

  1. तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग वेबसाइटला भेट द्या.
  2. तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  3. ओपन डिपॉझिट खाते किंवा ‘फिक्स्ड डिपॉझिट खाते उघडा’ किंवा तत्सम आवाज पर्याय शोधा.
  4. तुमच्या FD ची रक्कम आणि कालावधी निवडा.
  5. उर्वरित तपशील भरा जसे की नॉमिनीचे नाव, पत्ता, संबंधित बँक खाते क्रमांक.
  6. गुंतवणूकीची रक्कम डेबिट करण्यासाठी स्थायी सूचना द्या.
  7. तुमच्या बचत खात्यातून तुमच्या मुदत ठेव खात्यात ते हस्तांतरण मंजूर करा आणि प्रमाणित करा.

बँकिंग ॲपद्वारे मुदत ठेव खाते कसे उघडायचे (How to open a Fixed Deposit account through an app)

  1. तुमच्या बँकेचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा.
  2. तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
  3. ओपन डिपॉझिट खाते किंवा फिक्स्ड डिपॉझिट खाते उघडा.
  4. रक्कम आणि कार्यकाळ निवडा.
  5. उर्वरित तपशील भरा.
  6. तुमच्या बचत खात्यातून FD खात्यातील हस्तांतरणास मान्यता द्या.

मुदत ठेव आणि आवर्ती ठेव म्हणजे काय (fd and rd difference in marathi)

मुदत ठेव (Fixed Deposit) म्हणजे एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते.

आवर्ती ठेव (Recurring deposit) ही भारतीय बँकांद्वारे ऑफर केलेली एक विशिष्ट मुदत ठेव आहे जी नियमित उत्पन्न असलेल्या लोकांना त्यांच्या आवर्ती ठेव खात्यात दरमहा एक निश्चित रक्कम जमा करण्यास आणि मुदत ठेवींवर लागू असलेल्या दराने व्याज मिळविण्यास मदत करते.

#आवर्ती ठेव (Recurring deposit)मुदत ठेव
कालावधी6 महिने ते 10 वर्ष7 दिवस ते 10 वर्ष
व्याज गणनाप्रत्येक तीन महिन्यांनीवार्षिक
पात्रतासर्व भारतीयसर्व भारतीय
कर लाभ5 वर्षाच्या ठेवीवर आयकर 1961 नुसार कर सुट
व्याजदरबँकेवर आधारितबँकेवर आधारित
मुदतीपूर्वी रक्कम काढणेदंडाशिवाय रक्कम काढता येते. रक्कम काढताना दंड आकारण्यात येतो.
उत्पन्न व्याजकरपात्र करपात्र

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण मुदत ठेव खाते माहिती मराठी (fd full form in marathi) जाणून घेतली. यात आपण मुदत ठेव खाते, प्रकार, उपयोग आणि इतर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

वाणिज्य बँकेत मुदत ठेव जास्तीत जास्त किती कालावधी पर्यंत करता येते ?

वाणिज्य बँकेत मुदत ठेव जास्तीत जास्त 8 ते 10 वर्षापर्यंत करता येते.

कोणती ठेव सर्वात जास्त व्याजदर मिळवून देतात ?

पुनर्निवेश योजना ठेव सर्वात जास्त व्याजदर मिळवून देतात.

पोस्टाचे मुदत ठेव व्याजदर किती आहे ?

पोस्टाचे मुदत ठेव व्याजदर वार्षिक 6.5 टक्के इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *