महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी

Festival of maharashtra information in marathi – महाराष्ट्र राज्य व सण यांची चर्चा जगभर होत असते. कारण महाराष्ट्र राज्यात विविध जातीधर्माचे लोक एकत्र येईल, गुण्यागोविंदानं सण साजरे करतात. प्रत्येक सणाला एक विशिष्ट महत्व आहे.

या लेखात आपण महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi) पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi)

Festival of maharashtra information in marathi
Festival of maharashtra information in marathi

सण हा शब्द क्षण ह्या संस्कृत शब्दापासुन तयार झाला आहे. क्षण-छण-सण अशी या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. भारतातील सर्व सण आणि उत्सव पुराण कथेवर आधारित आहे. तसे पाहिले तर प्रत्येक सण हे वेगवेगळे कारणांनी साजरे करतात. भारतात फक्त एकच धर्माचे लोक नसून विविध धर्माची आणि पंथाची लोक या ठिकाणी आहे. त्यामुळे सण आणि उत्सव हे देखील विविध धर्माची आहेत.

त्यापैकी काही सणाना विशिष्ट असा कालखंड ठरला आहे, जसे की दिवाळी पाच दिवसांची असते.

यातील काही सण पौराणिक कथेवर आधारित आहे तर काही लोकपरंपरा तर काही सण राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा दिवस म्हणून साजरा करतात.

वर्षाच्या सुरवातीपासूनच विशिष्ट तिथीस येणारे देवदेवता, संत, विद्वान महाराजे, गोसावी, फकीर, धर्म संस्थापक, वीरपुरूष, ग्रामदेवता, नगर देवता, राष्ट्रदेवता या सर्वांचे जन्मदिवस, स्थापनादिन किंवा महापरिनिर्वाण, युद्ध दिवस किंवा विजय दिवस ठरलेले आहेत. या सर्वपार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात तसेच भारत देशात सण साजरे केले जातात.

मराठी महिन्यानुसार साजरे करणारे सण (Festival of maharashtra information in marathi)

मराठी महिनेसणांची नावे
चैत्र गुढीपाडवा
रामनवमी
हनुमान जयंती
चैत्रागौर
वैशाखसीता नवमी
ज्येष्ठवटपौर्णिमा
आषाढआषाढ एकादशी
गुरुपौर्णिमा
श्रावणनागपंचमी
राखी पौर्णिमा
गोकुळाष्टमी
पोळा
भाद्रपदहरितालिका
गणेश उत्सव
गौरीपुजन
आश्विननवरात्र
दसरा
कोजागिरी पौर्णिमा
दीपावली
वसुबारस
धनत्रयोदशी
नरक चतुर्दशी
लक्ष्मीपूजन
कार्तिकबलिप्रतिपदा
भाऊबीज
कार्तिकी एकादशी
तुलसी विवाह
त्रिपुरी पौर्णिमा
मार्गशीर्षभगवतगिता जयंती
दत्त जयंती
पौषमकरसंक्रांत
रथ सप्तमी
महाशिवरात्री
माघवसंत पंचमी
फाल्गुनहोळी
मराठी महिने व सण – Festival of maharashtra information in marathi

वरील तक्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख सण सांगितले आहेत.

याव्यतिरिक्त आपण आता सर्व धर्मीय सण आणि उत्सव यांची विभागणी करून माहिती जाणून घेतली आहोत.

राष्ट्रीय सण आणि उत्सव

भारत देशातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी हे काही सण आहेत. भारतीय स्वातंत्र्यदिवस आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.

राष्ट्रीय सणांची नावे – भारतीय स्वातंत्र्यदिवस , भारतीय प्रजासत्ताक दिन

वैष्णव सण आणि उत्सव

यामध्ये प्रामुख्याने रामनवमी ,कोजागरी पौर्णिमा , दीपावली, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, कृष्णजन्माष्टमी, हनुमान जयंती, परशुराम जयंती, दसरा (विजयादशमी) या सणांचा समावेश होतो.

हिंदूंचे सण आणि उत्सव

यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, परशुराम जयंती, आषाढी एकादशी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी), पोळा या सणांचा समावेश होतो.

त्याबरोबरच गणेश चतुर्थी, रक्षाबंधन, घटस्थापना, दसरा (विजयादशमी), कोजागरी पौर्णिमा, दीपावली, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी , सट, दत्त जयंती, मकरसंक्रांत, दुर्गाष्टमी, महाशिवरात्र, होळी, रंगपंचमी हे देखील सण साजरे केले जातात.

यामधील दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो.

बौद्धांचे सण आणि उत्सव

बौध्द धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा भारतासह जगभरात साजरी केली जाते.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोसर, सम्राट अशोक जयंती, अशोक विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, शौर्य दिन कोरेगाव भिमाची लढाई, रमाई जयंती साजरी केली जाते.

याव्यतिरिक्त मनुस्मृती दहन दिन, संविधान दिन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन, माई जयंती, संत रोहिदास जयंती महात्मा फुले जयंती साजरी करतात.

जैनांचे सण आणि उत्सव

जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्मांपैकी एक आहे. हा प्राचीन भारतीय धर्म आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे.

अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे.

या धर्मांत प्रामुख्याने वर्षप्रतिपदा, ज्ञानपंचमी, चातुर्मासी चतुर्दशी, कार्तिक पौर्णिमा, मौनी एकादशी, पार्श्वनाथ जयंती, मेरु त्रयोदशी, महावीर जयंती, दिवाळी साजरी केली जातात.

इतर सण आणि उत्सव

चेटीचंड, चालिहो, तिजरी, थडरी, गुरू नानक जयंती ही सिंधी धर्मातील प्रमुख सण आहेत.

शिख धर्मांत प्रामुख्याने गुरू नानक जयंती, वैशाखी, होला मोहल्ला, गुरू गोविंदसिंह जयंती, वसंत पंचमी साजरी केली जाते. त्याचबरोबर पतेती हा पारशी धर्मीय सण साजरा करतात.

मुस्लिम सण आणि उत्सव – मोहरम, मिलाद-उन-नवी, शाब-ए-मेराज, शाब-ए-बरात, ईद-उल-फ़ित्र (रमजान ईद), ईद-उल-अधा (बकरी ईद) ही मुस्लिम धर्मातील पवित्र सण आहेत.

ख्रिश्चन सण आणि उत्सव – येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन नाताळ ख्रिस्तमस हा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

त्याचबरोबर लेंट, गुड फ्रायडे, ईस्टर पाम संडे, पेंटेकोस्ट, मेरी, जोसेफ, पीटर, झेवियर इ. संतांचे सण देखील साजरे केले जातात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता ?

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आहे. या उत्सव साधारण 10 दिवसांचा असतो.

नागपंचमी माहिती मराठी

श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते, त्यामूळे या दिवसास नागपंचमी असे म्हणतात. भारत देशातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले आणि या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची आणि नागाची पूजा केली, अशी कथा प्रचलित आहे.

बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी

वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी करतात. त्याचबरोबर या एकच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते.

गुढीपाडवा माहिती इतिहास

गुढीपाडवा हा एक भारतातील प्रमुख सण आहे. हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात लोक घराच्या दारात उंचावर गुढी उभारतात.

दिवाळी सणाची माहिती

दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण असून, त्यामुळे दिवाळीत सर्वत्र प्रकाशमय वातावरण करण्यात येते. दिव्याला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो, अशी मान्यता आहे.

भारतीय सण व पर्यावरण

भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यातील प्रमुख सण म्हणजे दिवाळी. दिवाळी या सणात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवून साजरा करतात. परिणामी हे फाटके पर्यावरण दूषित करण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यावर सर्वांनी मिळून काहीतरी उपाय करायला हवा.

तमिळ समाजाचा नववर्षारंभ दिन म्हणून कोणता सण साजरा केला जातो ?

तमिळ समाजाचा नववर्षारंभ दिन म्हणून पोंगल हा सण साजरा केला जातो.

नेपाळचा राष्ट्रीय उत्सव कोणता ?

नेपाळचा राष्ट्रीय उत्सव नवरात्र व दसरा आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi) जाणून घेतली. तसेच या लेखात आपण भारतातील सणांची माहिती मराठीत पाहिली आहे.

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला महाराष्ट्रातील सणांची माहिती मराठीत (Festival of maharashtra information in marathi) आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Comment