मजेशीर मराठी शेलापागोटे (Fishpond In Marathi)

Fishpond In Marathi – नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शेलापागोटेबद्दल माहितीच असेल, ज्याला आपण इंग्रजीत फिशपाँड असे म्हणतो. शालेय जीवनात असताना प्रत्येकाला स्वतःचे कलागुण दाखवण्याची एक संधी असते, ती संधी म्हणजे फिशपाँड.

शालेय शिक्षण घेताना वार्षिक स्नेहसंमेलनाचे (गॅदरिंग) कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, जसे की. सांस्कृतिक, भाषण, नाटक इत्यादी. या कार्यक्रमात सर्वात मजेशीर कार्यक्रम म्हणजे फिशपाँड.

जर तुम्ही तुमच्या महाविद्यालयात गॅदरिंगमध्ये सहभागी होत असाल, आणि तुम्हाला गॅदरिंग शेलापागोटे सोबत गाजवयची असेल तर मजेशीर मराठी शेलापागोटे (fishpond in marathi) हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जर तुम्ही शालेय शिक्षण पूर्ण केले असेल, तर हा लेख वाचून तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.

शेलापागोटे म्हणजे काय (fishpond meaning in marathi)

fishpond meaning in marathi

शेलापागोटे म्हणजे एक असा खेळ, ज्यामध्ये एकजण आपल्या मित्राचे, मैत्रिणीचे किंवा शिक्षकाच्या नावाने एका संदेशासह चिठ्ठी लिहून एका काचेच्या घड्यात टाकतो. यानंतर काही वेळाने हा संदेश नावासह सर्वांसमोर वाचला जातो.

गंमत म्हणजे या चिठ्ठीत तुम्ही काहीही लिहू शकता, जसे की एखादे गुपित, त्याची चीड, किंवा इतर गोष्टी, ज्यातून काही विनोद किंवा हास्य निर्माण होऊ शकेल.

पण मित्रांनो, लक्षात ठेवा हा फक्त एक खेळ असतो, त्यामुळे यातून कोणाची मने दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. खेळ खेळून झाल्यावर सर्व गोष्टी तिथल्या तिथेच विसरून जाव्या. यामुळे घडलेल्या गोष्टी वैयक्तिक घेऊ नका.

शेलापागोटे शिक्षकांसाठी मराठी (fishpond in marathi for teachers)

fishpond in marathi for teachers

1. फळ्यावर लिहून लिहून संपवले सगळे खडू, आता तरी गुरुजी द्या कि तुमच्या लग्नाचे लाडू 😂😁

2. कधीकाळी आला होता रोग नारू, आमच्या गणिताच्या सरांना लागते कधीमधी दारू

3. सर रोज नको त्या प्रश्नपत्रिका, आम्हाला हवी तुमची लग्नाची पत्रिका

4. घड्याळात वाजले बारा, सर बस झाला अभ्यासाचा पसारा

5. इकडून आला वारा, तिकडून आला वारा आमच्या गणिताच्या सरांचा चढतो सारखा पारा

6. सर कशाला हवा तुम्हाला बॉब कट, एकदाच मारून टाका की आपला गांधी कट

7. भूगोलात सुटतात सोसाट्यांचे वारे, प्रमोद सर नुसतेच छडीने मारे

8. विनोद सर आम्हाला सांगतात हे खंड ते खंड, अन् मधल्या सुट्टीत खातात ते नुसते श्रीखंड

9. अगोदर वाटतात उत्तरपत्रिका, मग वाटतात प्रश्नपत्रिका, आतातरी सांगा कधी देणार लग्नपत्रिका

10. विनोद सर दिसायला दिसतात भारी, रहायला राहतात भारी पण आता तुम्हाला एकच सांगतो आतातरी लागा संसारी

11. इतिहासाच्या तासाला आमच्या मॅडमची चालते कायम चळवळ, अन आम्हाला मात्र करून देत नाहीत वळवळ

12. भूगोलाच्या मॅडम म्हणतात, लवकर आणा ती पृथ्वी गोल, पण त्याच बनल्यात शिकवून शिकवून ढब्बू ढोल

13. निकिता बाई वर्गात आल्या की सांगतात काहीबाही, त्यांना बेल होताच असते घरी जायची घाई

संबंधितहीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे शाळेतील प्रार्थना मराठी

वर्गातील मुलींसाठी खास शेलापागोटे (fishpond in marathi for girl)

fishpond in marathi for girl

14. वादळात येतो नुसता जोरदार वारा, मॅडमचा लुक नुसता आ रा रा रा

15. हवी कोणी आपली मनापासून वाट पाहणारी, हीच आहे का ती भंडाऱ्यात दोनवेळा जेवणारी

16. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, आमच्या येडीच्या नाक्यावर चष्म्याचे ओझे

17. आरश्यात पाहिले की, आरसा म्हणतो ब्युटीफुल, मागे पाहिले की म्हणतो, एप्रिल फुल

18. स्वत:ला समजते ऐश्वर्या राय, ही तर आमच्या घरची कामवाली बाय

19. हम दो सहेलिया बचपन की, एक पचास और पचपन की

20. दूर से देखा तो आसमान की परी, पास जाकर देखा तो पावडर की परी

21. भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गए, कुछ गिरफ्तार हो गए, तो कुछ हमारे पास रह गए

22. सेल सेल सेल, खोबरेल तेलाचा सेल, आता तरी लाव तुझ्या झिपऱ्याला तेल

23. सामने से देखा तो कश्मिर की कली, पीछे से देखा तो जय बजरंगबली

24. आमची येडी करायला गेली रक्तदान, डॉक्टर बोलल्या वेडे बाटली नको चमचा आण

25. स्वतःला समजते ममता कुलकर्णी, तिच्यापेक्षा बरी आमची मोलकरीण

26. स्वतःला समजते ऐश्वर्या राय, दिसते मात्र भंगार गोळा करायला आलेली बाई

27. प्रियांकाचा चेहरा आहे भोळा, पण लफडे असतील सोळा

28. आता काय मी सांगू, दाजिबा कोणाला सांगू, मलाच वाटते माझी लाज, वजन काट्यावर उभी राहता, वजनाचा काटा तुटला आज

29. रूप तुझे मस्ताने, नीट बस नाहीतर, बेंच तुटेल तुझ्या वजनाने

30. आमच्या नदीचे गेले पाणी आटून, या म्हशीचे लग्न लावा एकादा रेडा गाठून

31. हे दोघे चंगू आणि मंगु, यांना काय माहीत यांची मी एकच आहे गंगू

संबंधितलहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

बेस्ट फ्रेंडसाठी खास मराठी फिशपाँड (fishpond in marathi for best friend)

fishpond in marathi for best friend

32. पाणी गरम केल्यावर आल्या नुसत्या वाफा, पोरी म्हणतात बाकी सगळे झेंडू, तूच माझा चाफा

33. चेहरा भोळा, लफडी सोळा, तरी भाऊ थांबतोय कुठे, अजूनही पोरींचे नंबर करतोय गोळा

34. पाळण्यात बसून खेळत होतो झोका,
दादाचा फोटो पाहून रणवीरने दिला कतरीनाला धोका

35. मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
भाऊला पाहून पोर म्हणतात, हाय हाय कसं गालात हसतं आमचं फुलपाखरु

36. फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
इतक्या गोड चेहऱ्याला फेअर अँड लव्हली कशाला

37. तुझ गाव पुना
माझ गाव पुना
आपल्या दोघांची जोडी म्हणजे
तंबाखू आणि चुना

38. पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटतं, ती एकदाच दात घासते

39. काय मी सांगू, कसं मी सांगू
मलाच वाटे माझी लाज
माझ्यामुळे तुटला वजन काटा आज

40. दुरून पाहिली तर पोरगी दिसू लागली एकदम किल्लर, जवळून पाहिले तर मागू लागली चिल्लर

41. मला कवितेचा आहे छंद
मला कवितेचा आहे छंद
यमक जुळला म्हणून सांगतो,
तू आहेस मंद

42. रुप तेरा मस्ताना
कवळी पडली हसताना
आणि टेबल पडले बसताना

43. बनवलेत लाडू त्यात टाकला रवा,
मुंबई पुण्याच्या पोरी म्हणतात,
आम्हाला हाच नवरा हवा

44. कॉलेजला येतो सुटाबुटात
आणि घरी झोपतो गोणपाटात

45. बोलतो खणखणीत
चालतो खणखणीत
समोर दिसल्यावर वाटते द्यावे एक सणसणीत

46. छुम छुम कर आयी
झूम झूम कर चली गयी
सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधकर चली गयी

47. तुझ्यासाठी माझं मनं कोरं पान आहे,
अरे इतका उतावळा होऊ नकोस मी एंगेज आहे

48. झाली होती नाईट
म्हणून चालू करायला गेलो लाईट,
लाईट काही बंद पडला नाही,
पण कमी पडली हाईट

49. जिथे असेल फुकटची पार्टी
तिथे हजर असतील आमची ही सगळी कार्टी

50. गायीला इंग्रजीमध्ये म्हणतात काऊ,
लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ

संबंधितमतलबी लायकी स्टेटस मराठी

बेस्ट फ्रेंडसाठी खास मराठी फिशपाँड (fishpond in marathi for boy)

fishpond in marathi for boy

51. भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि दादाच नुसता फोटो पाहायला पोरी बसतात नटून थटून

52. प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचो
भाऊ आमचा घालतो अमूल माचो

53. अरे कुठं तो शाहरुख
आणि कुठे ते सल्लू
आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात
आलं रे माझं पिल्लू

54. भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून,
ती पळाली वावरात टंबरेल टाकून

55. डोक्याची झाली वाटी, हाडांची झाली काठी,
तरी प्रत्येकाला वाटे सगळ्या मुली माझ्याच पाठी

56. बाटलीत बाटली, काचेची बाटली
भाऊचा लुक बघून कोरोनाची फाटली

57. खिशात नाही आणा
आणि म्हणजे मला बाजीराव म्हणा

58. कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा दिसतो कसा राजहंस

59. आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळणे असतील
अशावेळी चांगल्या चपला वापरा

60. पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका

संबंधितमराठी टोमणे मारणारे कोट्स (taunting quotes in marathi)

सारांश

तर मित्रांनो, आशा करतो की आम्ही संग्रहित केलेले मजेशीर मराठी शेलापागोटे (fishpond in marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असतील. जर तुमच्याकडे स्नेहसंमेलन कार्यक्रम (गॅदरिंगसाठी) लागणारे अजून शेलापागोटे असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा.

Leave a Comment