भारताची वनसंपत्ती मराठी माहिती

Categorized as Blog

भारताची वनसंपत्ती माहिती – वृक्षांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्राला वन म्हणतात. वनांमुळे सजीवांना नैसर्गिक निवरा मिळतो, तसेच जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते. पृथ्वीवर एकूण 4 ते 5 अब्ज हेक्टर जमीन जंगलाने व्यापली आहे. यापैकी भारतात 24 टक्के जमिनीवर जंगल आहे. इसवी सन 2017 ते 2019 या दरम्यान भारतात 13.209 चौ.किमी वनक्षेत्र वाढले आहेत. या लेखातून आपण भारताची वनसंपत्ती विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

भारताची वनसंपत्ती मराठी माहिती

भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभाग अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ.हेक्टर जमीन जंगलाने व्यापली आहे. भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखाली आहे.

भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काही राज्यात जंगलाचे प्रमाण कमी तर काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे. सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

भारतात सर्वात जास्त जंगल मध्यप्रदेश राज्यात असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा आहे.

भरात देशात 4,975 चौ.किमी खारफुटीचे जंगल आहे. देशातील वनांचे वर्गीकरण केले असता, 55% राखीव वने, 28% संरक्षित वने तर अवर्गीकृत वने 17% इतकी आहे. संसदेने जून 2019 मध्ये 24.39% क्षेत्र हरित पट्टा आहे अशी माहिती दिली होती.

भारतातील वनांचे प्रकार

भारतातील वनांचे वर्गीकरण पाच प्रकारात केले जाते. या वनामध्ये जैवविविधता आढळून येते. तसेच या वेगवेगळ्या झाडांच्या लाकडाचा वापर विविध कामांसाठी होतो. यात काही औषधी तर काही लाकडांपासुन विविध वस्तू बनविले जातात.

उष्णप्रदेशीय सदाहरित वने – भारतात 250 सेमीपेक्षा जास्त पावसाच्या भागात सदाहरित जंगले आहेत. या जंगलात असणाऱ्या झाडांची वाढ 50 मीटर पर्यंत होते. या प्रकारातील वनांत सर्वाधिक जैवविविधता आढळून येते.

उष्णप्रदेशीय सदाहरित वनांत महोगणी, एबनी, रोजवूड, आयर्नवूड, बिशपवूड, रबर, आंबा, जांभूळ, शिसव, साल, हिरडा, बांबू आणि वेत ही झाडे आढळतात.

ही झाडे हिमालयाचा पायथा, पूर्व आणि पश्चिम घाटाच्या उतारावर आढळतात. या झाडांची पाने रुंद व हिरवीगार असते. यापासून मिळणारे लाकूड कठीण व टिकाऊ असते. या लाकडाचा उपयोग इमारती आणि जहाज बांधणी करण्यासाठी केला जातो.

उष्णप्रदेशीय पानझडी वने – या प्रकारच्या झाडांना मोसमी वन म्हणून ओळखले जाते. साधारणपणे ही वने मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा आणि महाराष्ट्र राज्यात आढळतात.

उष्ण कोरड्या हवेत बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष पाने गाळतात. यामधे प्रामुख्याने साल, साग, वड, पळस, शिसम, खैर, अर्जुन, मोह, पिंपळ, अंजन, धावडा, चंदन, किंजळ, कुंभी आणि बांबूचा समावेश होतो.

या झाडांचा वापर जहाजबांधणी, रेल्वे डबे आणि खेळणी करण्यासाठी केला जातो.

उष्ण प्रदेशीय काटेरी वने – भारतील कच्छ, सौराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यातील काही प्रदेशात ही वने आढळतात. या झाडांची पाने लहान असतात.

यात प्रामुख्याने बाभूळ, सालई, निवडुंग, हिवर, बोर, केतकी, खैर, अँकेसिया, खेजडी, नागफणी, कोरफड, घातपात झाडांचा समावेश होतो.

पर्वतीय वने – भारतातील जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात ही वने आढळतात. यामधे पाईन, ओक, चेस्टनट, देवदार, फर, पॉपलर, बर्च आणि म्यापल यांचा समावेश होतो. याशिवाय या वनात सफरचंद, अक्रोड आणि चेरी अशी समशीतोष्ण प्रदेशातील फळे येतात.

पर्वतीय वनांत आढळणाऱ्या वृक्षांचे लाकूड मऊ व वजनाने हलके असतात. यापासून आगकाड्या, कागदाचा लगदा आणि कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जातात.

समुद्रकाठची वने – या वनांना खारफुटीची जंगले देखील म्हणतात. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या दलदलीत किंवा त्रिभुज प्रदेशात ही वने आढळतात.

पश्चिम बंगालमधील सुंदरबन, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात ही वने आढळतात. या वनातील झाडांपासून सुगंधी तेल, अत्तर आणि कागदाची निर्मिती केली जाते.

भारताची वनसंपत्ती रोचक तथ्य मराठी

राजस्थानच्या वाळवंटात सुईसारख्या लांब फांद्यांचे व पाने नसलेली वने आढळतात. यामधे खिप झुडूप, खैर, फोग, निवडुंग, खेजरी आणि बेरी हे वृक्ष आढळतात.

इस्रायली बाभूळ हे झाड वाळवंटात वनीकरण करण्यासाठी वापरले जाते. राजस्थान वाळवंटात जोजोबा या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. याच्या बियांपासून तेल काढले जाते.

दुआर प्रदेशात साल आणि शिसव हे प्रमुख वृक्ष आढळतात. तसेच साल आणि सेमल हे वृक्ष गंगेच्या मैदानातील भांबर व तराई प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतात.

दक्षिण सह्याद्रीत निलगिरी व साग या झाडांची जास्त लागवड केली जाते. द्वीपकल्पीय पठारी भागात गवताळ प्रदेश आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गवताळ प्रदेशाला तराईचे प्रदेश म्हणून ओळखतात.

भारतातील एकूण वनक्षेत्र पैकी 52 टक्के वनक्षेत्र हिमालयात आहे. येथील उष्ण कटिबंधातील पानझडी वनांत साल वृक्ष आढळतात.

हिमालयातील वनांचे तीन प्रकार पडतात.

  1. अतिउंचावरील वने – यात हंगामी फुलझाडांचा समावेश होतो.
  2. मध्यम उंचावरील वने – यात सुचीपर्णी वनांचा समावेश होतो. उदा. पाईन, फर आणि देवदार
  3. हिमालयाच्या पायथ्याशी असलेली वने – सुचीपर्णी व पानझडी वृक्ष यांची मिश्रवने आढळतात.

अंदमान बेटावरील जंगलात धूप व रुद्राक्षाची वने आढळतात. तसेच येथे असणारे महोगनी वृक्षाचे लाकूड फर्निचर बनवण्यासाठी वापरतात.

बिहार, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यातून लाखेचे उत्पादन होते. याचा वापर औषध, रंग, ग्रामोफोन रेकॉर्ड आणि बांगड्या बनविण्यासाठी करतात. बाभुळी पासून मिळणारी साल औषधे बनवण्यासाठी वापरली जातात.

भारतातील किनारी भागात काजू आणि फणस या झाडांची लागवड जास्त प्रमाणात करतात. विषुवृत्तीय प्रकारच्या वनात चंदन हा उच्च व्यापारी मूल्य असलेल्या झाडांची जंगले आहेत.

FAQs

सदाहरित वने म्हणजे काय?

सदाहरित वने म्हणजे अशी जंगले ज्या ठिकाणी सर्व झाडे बाराही महिने हिरवीगार असतात.

पाणलोट क्षेत्र म्हणजे काय?

जमिनीचे असे क्षेत्र जेथे पडणारे पावसाचे सर्व पाणी, एखाद्या विशिष्ट पाणीसाठ्यास येउन मिळते, ते क्षेत्र म्हणजे त्या पाणीसाठ्याचे पाणलोट क्षेत्र होय.

भारतातील वनांचे प्रकार किती व कोणते आहेत?

भारतातील वनांचे प्रकार पाच आहेत, ते पुढीलप्रमाणे.
1. उष्णप्रदेशीय सदाहरित वने
2. उष्णप्रदेशीय पानझडी वने
3. उष्ण प्रदेशीय काटेरी वने
4. पर्वतीय वने
5. समुद्रकाठची वने

भारतातील वनांचे प्रमाण किती आहे?

भारतातील वनक्षेत्र सध्या एकूण वनक्षेत्राच्या 25.56 टक्क्यांपर्यंत आहे.

मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला भारताची वनसंपत्तीची सविस्तर माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.