गंगापूर धरणाची मराठी माहिती – gangapur dam in marathi

Gangapur dam in marathi – गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. जायकवाडी धरणाच्या अगोदर गंगापूर धरण बांधण्याचे काम सुरू केले होते. इसवी सन 1948 मध्ये गंगापूर धरण बांधण्याचे काम सुरू झाले आणि 17 वर्षानंतर म्हणजेच इसवी सन 1965 मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

या ठिकाणी हवामान उष्ण आणि कोरडे असते जास्तीत जास्त तापमान 32 अंश से. तर कमीत कमी तापमान 14 अंश से. असते. या ठिकाणी दरवषी सरासरी 1200-1500 मिमी इतका पाऊस पडतो.

या लेखात आज आपण गंगापूर धरणाची मराठी माहिती – gangapur dam in marathi पाहणार आहोत.

गंगापूर धरणाची मराठी माहिती – gangapur dam in marathi

gangapur dam in marathi
gangapur dam in marathi
अधिकृत नावगंगापूर धरण
स्थानगोदावरी नदीवर
गंगापूर, नाशिक महाराष्ट्र
स्थानिक भाषा मराठी
उंची44.20 मीटर
रुंदी3800 मीटर
जलाशय साठा167.23 दशलक्ष घनमीटर
पर्जन्यमान2250 मी.मी वार्षिक सरासरी
gangapur dam mahiti overview

1. महाराष्ट्रात दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी नदीवर जायकवाडी धरणाचा प्रकल्प आहे.

2. याचबरोबर नाशिकमध्ये गोदावरी नदीवर गंगापूर धरण हे बांधण्यात आले आहे.

3. गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.

4. गंगापूर धरणाच्या पाण्यावर नाशिक जिल्हा समृध्द व विकसित होत आहे.

5. धरणाच्या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने नाशिकमध्ये द्राक्षाचे उत्पादन अधिक घेतले जाते.

6. जगभरात द्राक्ष आणि वाईनरी उत्पादन याचा हब म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे.

7. गंगापूर धरण नाशिकचे तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

8. गंगापूर धरणाजवळ अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट ची सुविधा आहे.

9. महाराष्ट्रातील सर्वात जुने धरणांपैकी एक गंगापूर धरण आहे. धरणाच्या अवतीभवती सुंदर परीसर आहे.

10. धरणाजवळ एक सुंदर बाग आहे, ही बाग नेहमीच पर्यटकांना भुरळ घालते. या बागेत तुम्ही निसर्गसानिध्यात निवांत वेळ घालवू शकता.

11. नदीचे सुंदर रुप पाहायला मिळते. धरणात एक सुंदर बोटक्लब करण्यात आला आहे.

12. धरण ही ग्रह तारे पाहण्याकरिता एक विलक्षण जागा आहे आणि इथे उंचा ठिकाणी उभे राहून कोणीही चंद्रोदय देखील पाहू शकतो.

13. या ठिकाणचे मनाला मोहित करणारे वातावरण सहलीसाठी आणि पर्यटकांना आकर्षित करते.

14. नाशिकचा बाजार हा खरेदीसाठी प्रसिद्ध आहे आणि खरेदी करणार्‍यांसाठी नाशिक हे उत्तम ठिकाण आहे. हस्तकला, चांदीच्या वस्तु, स्मृति चिन्ह, प्राचीन तांब्याचे अवशेष आणि पितळापासून केलेल्या मूर्ती आहेत.

15. गंगापुर धरणापासून पांडव लेणी साधारणपणे 19 किलोमीटर अंतरावर आहे. पांडव लेणे हे ठिकाण सुद्धा याच ठिकाणी आहे. या बौद्ध काळातील 24 लेण्यांची साखळी आहे.

16. अंजणेरी हे नाशिक शहराजवळील सुंदर आकर्षण आहे. या ठिकाणाला हनुमानाचे जन्मस्थान आहे असे मानले जाते. या ठिकाणी तुम्ही सुंदर फुलांनी झाकलेली हिरवीगार जमीन पाहु शकतो. हिवाळा आणि पावसाळा या ऋतुत याची मजा काही वेगळीच असते.

17. गंगापुर धरणापासून 23.9 किमी अंतरावर मुक्तिधाम भारतातील महत्वाच्या हिंदू तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवणारे एक अद्वितीय मंदिर आहे. मकराना , राजस्थान येथून शुद्ध संगमरवर आणून बांधलेले हे मंदिर नाशिक शहरांमधील प्रमुख आकर्षण ठरते. या अद्भुत मंदिराच्या आत भगवदगीतामधील 18 अध्याय पाहायला मिळतात. या ठिकाणी बारा ज्योतीलिंगांच्या हुबेहूब प्रतिकृती भिंतीवर कोरल्या आहेत.

18. द्राक्षे आणि वाईनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन असल्यामुळे नाशिक भारताची वाइन राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.

19. दरवर्षी जानेवारी दरम्यान, सुळा फेस्टचे आयोजन या ठिकाणी केले जाते यामध्ये आंतरराष्ट्रीय संगीत बॅंड सादरीकरण करतात.

20. नाशिक हे स्ट्रीट फुड साठी प्रसिद्ध आहे. चिवडा आणि मिसळ हे नाशिक मधील सगळ्यात लोकप्रिय पदार्थ आहेत. या ठिकाणी अनेक उपहारगृहे आणि रस्त्यावरील गाड्या आहेत जिथे वैविध्यपूर्ण चवीचा आस्वाद घेता येतो.

गंगापूर धरणाची वैशिष्ट्य आणि इतिहास

गंगापूर धरणाला एकूण 9 मोठे दरवाजे आहेत ज्यांची उंची सुमारे 101.83 मीटर आहे. धरणाची लांबी 3800 मीटर आणि उंची 44.20 मीटर इतकी आहे.

या धरणात 215.8 दलघमी पाणीसाठा करता येतो. तर 2293 घनमीटर/सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येतो.

या धरणात वीजनिर्मतीसाठी विद्युत जनित्र बनवण्यात आली आहे ज्याद्वारे या ठिकाणी दिवसाला साधारणपणे 0.50 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.

हे धरण मातीच्या थरांनी बांधलेले आहे. या मातीच्या धरणाची ऊंची सुमारे 36.59 मीटर तर लांबी 3902 मीटर इतकी आहे. गंगापूर धरणाच्या परिसरात पूर्व ऐतिहासिक दगडाची साधने आढळली आहेत.

गंगापूर धरण – मार्ग

गंगापूरचे धरण नाशिकपासून फक्त 15-16 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण रेल्वे, हवाई, रस्त्याला लागून आहे.

नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे 254 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. तेथून गंगापूरपर्यंत सिटी बसची सोय आहे. त्याचबरोबर ओझार विमानतळ, नाशिक हे जवळील विमान सेवा आहे.

पुणे ते गंगापूर धरण 227 किलोमीटर आहे त्यासाठी 5 तास लागतात.

मुंबई ते गंगापूर धरण 176 किलोमीटर अंतरावर आहे त्यासाठी 3 तास 30 मिनिटे वेळ लागतो.

अहमदनगरपासून गंगापुर धरण 171 किलोमीटर अंतरावर आहे त्यासाठी तिथून 4 तास लागतात.

महत्वाचे – याठिकाणी पर्यटनाला येण्यासाठी पावसाळा हा ऋतू चांगला आहे. येथे येण्यासाठी मेयरची परवानगी घ्यावी लागते.

सारांश

gangapur dam in marathi – गंगापूर धरण महाराष्ट्रातील सर्वात जुने मातीचे धरण आहे. हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे. हे धरण बांधण्यासाठी जवळपास 17 वर्ष लागली. नाशिक शहर आणि आजूबाजूची शहरी भाग या धरावर अवलंबून असतो.

या धरणाच्या पाण्यामुळे नाशिक शहर द्राक्ष आणि वाईनरी मध्ये जागतिक नावलौकीक मिळवले आहे. दरवषी या ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यामुळे गोदावरी नदीवर वसलेले हे धरण एक तीर्थक्षेत्र म्हणून पाहिले जाते.

दरवषी लाखो पर्यटक येथील सुंदर परिसर आणि बोट क्लब चा आनंद घेण्यासाठी लांबून येतात. या ठिकाणी बरीच स्थलांतरीत पक्षी दिसतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते ?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण उजनी धरण आहे.

तामसवाडी धरण कोठे आहे ?

तामसवाडी धरणाला बोरी धरण असे म्हणतात. हे धरण तामसवाडी गावात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यांत आहे.

भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ?

भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड धरण आहे.

भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?

जोग धबधबा हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक धबधबा आहे. हा धबधबा शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवर स्थित असून तो दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे. त्याची उंची २९२ मीटर आहे. तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?

महाराष्ट्रातील पहिला आणि भारतील दुसरा सर्वात मोठा धबधबा ठोसेघर धबधबा आहे.

एलिफंट धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

मेघालयची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणजे शिलाँग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. शिलाँग पासून काही अंतरावर एलिफंटा धबधबा आहे.

हे देखील वाचा

Leave a Comment