Gautam buddha story in marathi – गौतम बुद्ध हे बुद्ध धर्माचे संस्थापक असून त्यांचे खरे नाव सिद्धार्थ आहे. यांना गौतम, शाक्यमुनी या टोपणनावाने देखील संबोधिले जाते.
“बुद्ध” हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे.
जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत गौतम बुद्ध यांना सर्वश्रेष्ठ मानले जाते, ते एक प्रचंड महाज्ञानी व्यक्तीमधील एक आहेत.
मानवतावादी आणि विज्ञानवादी विचारांद्वारे बुध्दांनी मानवी जीवनात असणाऱ्या दुःखाचा मार्ग शोधला आणि मानवजातीच्या कल्याणासाठी विशेष कार्य केले.
सिद्धार्थ गौतम या महामानवाच्या अनेक कथा प्रचलित आहे. त्यापैकी आपण आज गौतम बुद्ध कथा मराठी (gautam buddha story in marathi) पाहणार आहोत.
गौतम बुद्ध यांची माहिती – Gautam Buddha information in marathi

नाव | नाव – सिद्धार्थ टोपणनाव – गौतम आणि शाक्यमुनी |
जन्म | इसवी सन पूर्व 623/ 563 लुंबिनी, नेपाळ |
आईवडील | आई – महामाया वडील – शुद्धोधन |
पत्नी | यशोधरा |
मुले | राहुल |
प्रसिद्ध कार्य | बौद्ध धर्माचे संस्थापक |
महापरिनिर्वाण | इसवी सन पूर्व 543/ इसवी सन पूर्व 483 कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत |
अनुयायी | जगभरात 1 अब्ज 80 कोटी |
गौतम बुद्ध हे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वपैकी एक आहे. जगातील सर्व देशात बुद्धांचे अनुयावी आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुध्दा एक बौद्ध अनुयायी आहेत.
मानव जातीच्या कल्याणासाठी गौतम बुद्ध यांनी गृहत्याग केला आणि कठोर तपस्या करून ज्ञानप्राप्ती केली.
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती वासना, इच्छा, आसक्ती, आवड यामधून होते, म्हणून आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
भगवान गौतम बुद्ध यांनी चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग सांगितली आहे.
गौतम बुद्ध कथा मराठी – gautam buddha story in marathi
गौतम बुद्ध गावोगावी फिरून धर्माचा प्रचार करत होते. एका वेळेस ते धर्माच्या प्रसारासाठी एक गावात गेले असता, एक शेतकरी त्यांच्याजवळ आला आणि त्यांना म्हणाला – माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत, खूप त्रास आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मला सापडत नाही.
गौतम बुद्ध शेतकऱ्याला विचारतात ” नक्की काय समस्या आहे तुमची ? ”
त्यावर शेतकरी बोलू लागला, माझी बायको हल्ली माझ्यासोबत नीट वागत नाही. माझी मुले माझं काहीच ऐकत नाही. माझ्या मित्रपरिवाराने माझ्याकडे पाठ फिरवली आहे. तुम्ही मला यावर काहीतरी उपाय द्या, जेणेकरून माझ्या आयुष्यात असणाऱ्या या समस्या निघून जातील.
बुद्ध त्या शेतकऱ्याला बोलतात की तू ज्या 100 शंभर समस्याची यादी घेऊन माझ्याकडे आला आहेस, अश्या 100 समस्यांची यादी जगातील प्रत्येकाकडे आहे. त्यामुळे तुझ्या या समस्यांवर मी उपाय सांगू शकत नाही.
त्यावर शेतकरी चिडतो, आणि बोलतो मला असे वाटते मी गरीब आहे म्हणून तुम्ही मला मदत करत नाही. मी अस ऐकलंय गौतम बुद्ध एक संत आहेत, ते प्रत्येकाच्या समस्या सोडवतात पण मला वाटतं ते चुकीचं आहे. गेल्या वर्षी. या गावात एक संत आले होते, त्यांना मी माझ्या साऱ्या समस्या सांगितल्या. त्यावर त्यांनी मला यज्ञ करायला सांगितला होता. असे केल्याने थोडे का होईना मला समाधान मिळाले होते.
पण तुम्ही असे काय आहेत, तुमच्याकडे माझ्या 100 समस्यापैकी एकही समस्येचे निवारण नाही.
त्यावर गौतम बुद्ध एक स्मित हास्य करत त्याला सांगतात की तुझ्या 100 समस्येचे माझ्याकडे निवारण नाही, पण तुझ्या 101 व्या समस्येचे निराकरण माझ्याजवळ आहे.
शेतकरी थोडा गडबडत विचारतो, कोणती 101 वी समस्या ? माझ्या तर या 100 समस्या आहेत.
त्यावर गौतम बुद्ध शेतकऱ्याला बोलतात, तुझ्यावर आलेल्या परिस्थितीला तु समस्या मानत आहे हीच तुझी 101 वी समस्या आहे. कारण या जगात प्रतेकाच्या आयुष्यात समस्या आहेत.
आज तुझ्या या सगळ्या समस्या जरी सोडवल्या तरी आणखी समस्या येतच राहणार. सुख आणि समस्या या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळे तू या समस्यांना सामोरे जा तेव्हाच तुझी प्रगती होईल.
लक्षात ठेव कोणतीही समस्या तुझ्या इच्छा शक्तीपेक्षा मोठी नाही. असे केल्याने तुला तुझी जबाबदारी समजेल, आणि तुझ्या आयुष्यात आनंद येईल.
हे ऐकून त्या शेतकऱ्याला आपली चूक लक्षात येते आणि तो गौतम बुद्ध यांना आपले गुरू मानून त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी येईल त्या समस्या स्वीकारणार याची खात्री देतो.
सारांश
मित्रांनो, या कथेत आपण पाहिले की, या शेतकऱ्याने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होता. असे केल्याने त्याच्या जीवनात आनंद नाहीसा झाला होता.
गौतम बुद्ध यांच्या मते, आयुष्य हे दुःखाने भरलेले आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला आपण सामोरे गेले पहिले. तरच आपली प्रगती होईल. आणि आयुष्याचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.
गौतम बुद्ध कथा मराठी – gautam buddha story in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही गौतम बुद्धाची गोष्ट मराठी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
हे लेख जरूर वाचा – डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती (dr babasaheb ambedkar)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
बुद्ध म्हणजे काय ?
बुद्ध या शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी.
गौतम बुद्धाचे पूर्ण नाव काय आहे ?
गौतम बुद्धाचे पूर्ण नाव सिद्धार्थ गौतम आहे.
गौतम बुद्धाने दिलेल्या पहिल्या प्रवचनाला काय म्हणतात ?
गौतम बुद्धाने दिलेल्या पहिल्या प्रवचनाला धम्मचक्रप्रवर्तन किंवा धम्मचक्कपवत्तन म्हणतात.
गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला ?
गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला.
गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते ?
गौतम बुद्ध नेपाळ गणराज्यातील होते.
बुद्ध चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला ?
बुद्ध चरित्र हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला.
बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली ?
बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्धाने केली.
बौद्ध धर्माची त्रिरत्न कोणती ?
बौद्ध धर्माची त्रिरत्न – बुद्ध, धम्म और संघ
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेत कोणाला पाठवले ?
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेत महिंद्र व संघमित्रा पाठवले.
कलिंगचे युद्ध जिंकल्यानंतर कोणत्या राजाने बौद्ध धर्म स्वीकारला ?
कलिंगचे युद्ध जिंकल्यानंतर अशोकाने राजाने बौद्ध धर्म स्वीकारला.
बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत कोण गेले ?
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेत महिंद्र व संघमित्र गेले.
बुद्ध धर्म हा कसा धर्म आहे असे बुद्ध म्हणतात ?
बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म आहे, असे बुद्ध म्हणतात.
बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता ?
बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ तिपिटक आहे.
बुद्धाचा संघ कशासारखा आहे ?
बुद्धांचा संघ बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज आहे.
GOOD
Very nice imformation 👏🏼👌🏻👌🏻💐