महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

General knowledge questions in marathi – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या विषयावर राज्यसेवा पूर्व आणि मुख्यपरीक्षा, राज्य उत्पादन निरीक्षक, कर सहायक, मेगा भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. या लेखातून आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न आणि उत्तरे (general knowledge questions in marathi) जाणून घेणार आहोत.

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जनरल नॉलेज मराठी (general knowledge questions in marathi)

general knowledge questions in marathi
विषयआधुनिक महाराष्ट्राचा इतिहास (जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे)
उपयुक्तसामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा

इंग्रज आणि मराठे यांच्यात तीन युद्धे कोणत्या काळात झाली ?

इंग्रज आणि मराठे यांच्यात तीन युद्धे इसवी सन 1774 ते 1818 या काळात झाली.
1. पहिले इंग्रज आणि मराठा युद्ध – इसवी सन 1775 ते इसवी सन 1782
2. दुसरे इंग्रज आणि मराठा युद्ध – 1803 ते 1805
3. तिसरे इंग्रज आणि मराठा युद्ध – 5 नोव्हेंबर 1817 (याला खडकीची लढाई असे म्हणतात.)

1857 च्या उठाव पूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष कोणाकोणात झाला ?

1857 च्या उठाव पूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार आणि रामोशी यांच्यात झाला.
रामोशी या शब्दाचा अर्थ रानात राहणारे लोक असा होतो.

महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण आहेत ?

महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे आहेत. फडके यांच्या अगोदर 60 वर्ष अगोदर नरवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीची सुरुवात केली. त्यामुळे उमाजी नाईक यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते.

इसवी सन 1828 मध्ये कोळी समाजाने कोणाच्या नेतृत्वाखाली सशस्त्र उठाव केला ?

इसवी सन 1828 मध्ये कोळी समाजाने रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र उठाव केला.

उमाजी नाईक कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व करीत होता ?

उमाजी नाईक रामोशी जमातीच्या उठावाचे नेतृत्व करीत होता.

कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांना ब्रिटिशांनी कोणता किताब दिला ?

कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांना ब्रिटिशांनी विश्वासराव हा किताब दिला.

क्रांतिवीर भागोजी नाईक यांनी उठाव कुठे केला ?

क्रांतिवीर भागोजी नाईक यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी उठाव केला.

खानदेशातील भिल्ल उठावाचे नेते कोण होते ?

खानदेशातील भिल्ल उठावाचे नेते कजारसिंग हे होते.

बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

26 ऑगस्ट 1852 रोजी नौरोजी फरदूनजी आणि जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुंबईच्या मोठ्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली.

ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

इसवी सन 1866 मध्ये दादभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केव्हा झाली ?

28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली.

राष्ट्रीय चळवळीचे तीन कालखंड कोणते आहेत ?

राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळीचे तीन कालखंड पडतात.
1. मवाळ कालखंड – इसवी सन 1885 ते 1905
2. जहाल कालखंड – इसवी सन 1905 ते 1920
3. गांधी युग – इसवी सन 1920 ते 1947

साहित्यिकांना लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या असे आव्हाहन कुणी केले ?

साहित्यिकांना लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या असे आव्हाहन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केले.

सविनय कायदेभंग चळवळ कोणी सुरू केली ?

इसवी सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली.

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केव्हा झाली ?

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी झाली.

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जनरल नॉलेज मराठी (general knowledge questions in marathi)

द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ?

द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली.

नवीन महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

नवीन महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.

अखिल भारतीय किसान सभा कोणी स्थापन केली ?

अखिल भारतीय किसान सभा प्रा. एन. जी. रंगा यांनी स्थापन केली.

अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते ?

अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती हे होते.

अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठे घेण्यात आले ?

अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन टीटवाळा (ठाणे) या ठिकाणी घेण्यात आले.

महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना कोणी केली ?

3 ऑगस्ट 1947 रोजी महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना शरद जोशी यांनी केली.

समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली ?

13 मार्च 1927 समता सैनिक दलाची स्थापना डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी केली.

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?

प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले पाहिजे असा आग्रह कोणी धरला ?

प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले पाहिजे असा आग्रह सयाजीराव गायकवाड यांनी धरला.

दलित पँथर पक्षाची स्थापना कोणी केली ?

3 ऑक्टोंबर 1957 रोजी दलित पँथर पक्षाची स्थापना केली.

नोंदणी विवाह कायदा केव्हा पारित करण्यात आला ?

नोंदणी विवाह कायदा इसवी सन 1872 मध्ये पारित करण्यात आला.

भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण ?

भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होय.

भारतीय महिला परिषद स्थापना केव्हा झाली ?

इसवी सन 1904 मध्ये रमाबाई रानडे यांनी भारतीय महिला परिषद स्थापन केली.

सेवा सदन संस्थेची स्थापना कोणी केली ?

इसवी सन 1908 मध्ये रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली.

संतती नियमन चळवळीचे जनक कोण ?

संतती नियमन चळवळीचे जनक रघुनाथ धोंडो कर्वे हे आहेत.

हे देखील वाचाजनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जनरल नॉलेज मराठी (general knowledge questions in marathi)

भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन कोणी केले ?

भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन ताराबाई शिंदे यांनी केले. त्यांनी इसवी सण 1882 साली स्रीपुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला.

राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना कोणी केली ?

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे (राऊत) यांनी राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना केली.

विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे ?

विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला डॉ. रखमाबाई राऊत या आहेत.

हुंडाविरोधी कायदा केव्हा मंजूर झाला ?

इसवी सन 1961 मध्ये हुंडाविरोधी कायदा मंजूर झाला.

गर्भपात विरोधी कायदा केव्हा मंजूर करण्यात आला ?

इसवी सन 1972 मध्ये गर्भपात विरोधी कायदा मंजूर करण्यात आला.

स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली ?

इसवी सन 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना करण्यात आली.

मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम कधी अंमलात आला ?

1 एप्रिल 1949 पासून मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम अंमलात आला.

विदर्भात शिक्षणाचा प्रसार कुणी केला ?

विदर्भात शिक्षणाचा प्रसार संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केला.

जीवन शिक्षण हे मासिक कोण प्रकाशित करते ?

जीवन शिक्षण हे मासिक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद प्रकाशित करते.

बालभारती स्थापना केव्हा करण्यात आली ?

इसवी सन 1967 मध्ये बालभारतीची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्रात छापून तयार झालेले पहिले पुस्तक कोणते आहे ?

इसवी सन 1822 मध्ये पंचोपाख्यान हे महाराष्ट्रात छापून तयार झालेले पहिले पुस्तक आहे.

महाराष्ट्रातील आद्यकवी कोण आहेत ?

मुकुंदराज हे महाराष्ट्रातील आद्यकवी आहेत.

हायकू काव्यप्रकार मराठीत कोणी रूढ केला ?

हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीत शिरीष पै यांनी रूढ केला.

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण आहेत ?

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव हे आहेत.

मराठीतील पहिले पौराणिक नाटक कोणते ?

मराठीतील पहिले पौराणिक नाटक पहिला पांडव हे आहे.

महाराष्ट्रातील सुवर्णयुग म्हणून कोणता काळ ओळखला जातो ?

सातवाहन काळ (शालिवाहन काळ) महाराष्ट्रातील सुवर्णयुग म्हणून काळ ओळखला जातो.

शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे कुठले आहे ?

मराठवाड्यातील वेरुळ या ठिकाणचे भोसले हे शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे आहे.

महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या किती आहे ?

महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या 12, 861 (विकिपीडियानुसार) आहे.

आधुनिक महाराष्ट्र राज्याचा पाया कोणी रचला ?

अनेक समाजसुधारक, नेते मंडळी, क्रांतिकारक, लेखक आणि समाजातील अनेक बांधव एकत्र येऊन आधुनिक महाराष्ट्र राज्याचा पाया रचला.

महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी कोणते राज्य अस्तित्वात होते ?

महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी द्विभाषिक मुंबई हे राज्य अस्तित्वात होते.

हे देखील वाचा100+ जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 2022

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न आणि उत्तरे (general knowledge questions in marathi) जाणून घेतली आहेत. जनरल नॉलेज मराठी (janaral noleg questions and answers in marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जनरल नॉलेज इन मराठी (GK questions in marathi) चे काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला पाठवा या लेखात ते समाविष्ट करू.

Leave a Comment