कोण कोणाकडे राजीनामा देतो?

Polity General Knowledge Questions With Answers In Marathi – भारतीय राज्यघटनेनुसार पदावरील व्यक्तीला मुदतपूर्व राजीनामा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक असते. याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे कारण राज्यघटनेवर आधारित अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जातात.

या लेखातून मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेनुसार देशातील पदाधिकारी आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ? (polity general knowledge questions and answers in marathi) याविषयी मराठी जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत.

भारतीय राज्यघटना – कोण कोणाकडे राजीनामा देतो ? (polity general knowledge in marathi)

polity general knowledge questions with answers in marathi
विषय राज्यघटना – कोण कोणाकडे राजीनामा देतो ?
प्रकारजनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे

राज्य विधिमंडळाचे सदस्य कोणाकडे राजीनामा सादर करतात ?

राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार असे म्हणतात. राज्य विधिमंडळाचे सदस्य संबंधित सभागृहांच्या सभापतीकडे (अध्यक्षांकडे) राजीनामा सादर करतात.

घटक राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री कोणाकडे राजीनामा सादर करतात ?

घटक राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मुख्यमंत्र्यांकडे किंवा राज्यपालांकडे राजीनामा सादर करतात.

घटक राज्यांचे मुख्यमंत्री राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

घटक राज्यांचे मुख्यमंत्री राजीनामा संबंधित घटक राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

संसद सदस्य राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

संसदेच्या सदस्याला खासदार असे म्हणतात. संसद सदस्य राजीनामा संबंधित सभागृहाच्या सभापती किंवा अध्यक्षांकडे सादर करतात.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री राजीनामा प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपतींकडे सादर करतात.

पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतात.

विधानसभा उपाध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

विधानसभा उपाध्यक्ष आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर करतात.

विधानसभा अध्यक्ष राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

विधानसभा अध्यक्ष राजीनामा विधानसभा उपाध्यक्षाकडे सादर करतात.

विधान परिषद उपसभापती राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

विधान परिषद उपसभापती राजीनामा विधानपरिषद सभापतिकडे सादर करतात.

विधान परिषद सभापती राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

विधान परिषद सभापती राजीनामा विधानपरिषद उपसभापतीकडे सादर करतात.

लोकसभेचे अध्यक्ष राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

लोकसभेचे अध्यक्ष राजीनामा लोकसभेचे उपाध्यक्षाकडे सादर करतात.

लोकसभेचे उपाध्यक्ष राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

लोकसभेचे उपाध्यक्ष राजीनामा लोकसभेच्या अध्यक्षांकडे सादर करतात.

राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

राज्यसभेच्या सभापतीला उपराष्ट्रपती असे म्हणतात. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतात.

राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा राज्यसभेचे सभापतीकडे म्हणजे उपराष्ट्रपतीकडे सादर करतात.

उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात.

राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे सादर करतो ?

राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सादर करतो.

सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय राज्यघटना – कोण कोणाकडे राजीनामा देतो ? (मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे – polity general knowledge questions with answers in marathi) जाणून घेतले आहे.

तुम्हाला अजून जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे (general knowledge questions with answers in marathi) हवे असतील तर आम्हला नक्की कळवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.