Ghorpad information in marathi – घोरपड हा सरड्यासारखा दिसणारा प्राणी असून, सरड्याहून अधिक मोठा आहे. हा प्राणी जंगलात आणि उघड्या कोरड्या मैदानात पाहायला मिळतो. घोरपडीच्या अधिक प्रजाती आहेत. हा प्राणी अतिशय चपळ प्राणी म्हणून ओळखला जातो.
या लेखात आपण घोरपड प्राण्याची (ghorpad information in marathi) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण घोरपडीची रचना, प्रजाती, फायदे आणि वापर याविषयावर चर्चा करणार आहोत.
घोरपड प्राणी माहिती मराठी (ghorpad information in marathi)

नाव | घोरपड |
वैज्ञानिक नाव | वाराणस बंगालेंसिस |
वर्ग | सरपटणारा प्राणी |
आढळ | दक्षिण आशिया आफ्रिका मलेशिया ऑस्ट्रेलिया भारत |
घोरपडीचे इंग्रजी नाव (ghorpad in english name) मॉनिटर लिझर्ड हे होय.
घोरपड दिसायला भयंकर प्राणी असला तरीदेखील तो भित्रा प्राणी असून, तो माणसावर कधीही हल्ला करत नाही. जर मराठी इतिहासात आपण पाहिलं तर, आपल्या लक्ष्यात येईल घोरपड माणसाची मैत्री होऊ शकते.
तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव यशवंती असे होते. तिच्या सहाय्याने तानाजी सिंहगड किल्ला चढले होते.
घोरपड शरीररचना माहिती मराठी (ghorpad structure in marathi)
घोरपडीचे शरीर एकदम जाड आणि मजबूत असते. तिची लांबी 175 सेंटीमीटर इतकी असते, शेपटीची लांबी 100 सेंटीमीटर इतकी असते. नर हे मादी घोरपडीपेक्षा मोठे असतात. घोरपडीचे साधारण वजन 90 किलोहून अधिक असते.
पूर्ण वाढ न झालेल्या घोरपडीच्या मानेवर, गळ्यावर व पाठीवर गडद रंगाचे आडवे पट्टे असतात. तिचे पोट पांढऱ्या रंगाचा असून त्यावर पिवळे ठिपके आणि राखाडी गडद आडवे पट्टे असतात.
घोरपडीला 78 दात असून हे दात अतिशय तीक्ष्ण असतात, जणू करवतीसारखेच. झिजलेले दात पुढे सरकतात आणि दरवर्षी चार वेळा प्रत्येक दाताच्या ठिकाणी नवे दात येत असतात.
शेपूट लांब, जाड आणि चपाती असते. यामध्ये चरबीचा साठा जास्त असतो. जर एखाद्या घोरपडीला अन्नाची कमतरता भासली तर ती चरबीपासून ऊर्जा मिळवते. पायांची बोटे लांब आणि मोठी असून त्यावर मजबूत नख्या असतात. यामुळे घोरपड बळकट नख्यांनी खडकाला घट्ट धरून जागच्या जागी चिकटून राहू शकते.
हा लेख जरूर वाचा – मांजराची माहिती मराठी (Cat information in marathi)
घोरपडीचे अन्न माहिती मराठी (ghorpad food information in marathi)
monitor lizard food in marathi – घोरपड ही मांसभक्षक प्राणी आहे. ती नेहमी पक्षी आणि त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी, लहानमोठे कीटकावर उपजीविका करते. तिची जीभ लांब आणि टोकाशी दुभागलेली असते. यामुळे तिला सहज किडे पकडता येतात.
जर एखाद्या घोरपडीला अन्नाची कमतरता भासली तर ती चरबीपासून ऊर्जा मिळवते.
भारतात आढळणारी घोरपड माहिती मराठी (monitor lizard india information in marathi)
घोरपड हा प्राणी उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी म्हणजेच दक्षिण आशिया, आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, भारत या देशांत आढळतो. हा प्राणी साधारणपणे नद्या आणि ओढे काठी पाहायला मिळतो.
तसेच इराण, अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यांत घोरपड राहतात. पानगळ, अर्धपानगळ आणि सदाहरित उष्णकटिबंधीय जंगले, काटेरी वने तसेच शेतभागात घोरपडी अधिक प्रमाणात आढळताना दिसते.
घोरपडीच्या एकूण 27-30 प्रजाती आहेत. त्यापैकी भारतात चार प्रजाती आढळतात.
हा लेख जरूर वाचा – वाघ मराठी माहिती (Tiger information in marathi)
प्रजात | आढळ |
---|---|
व्हॅरॅनस मॉनिटर | संपूर्ण भारतात |
व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस | बंगाल |
व्हॅरॅनस सॉल्व्हेटॉर | हिमालय |
व्हॅरॅनस फ्लॅव्हिसेन्स | पंजाब आणि पश्चिम बंगाल |
घोरपड प्रजनन माहिती मराठी (ghorpad animal information in marathi)
घोरपडीचा प्रजननाचा (monitor lizard reproduction in marathi) काळ जुलै ते सप्टेंबर असतो, या काळात मादी या अंडी घालत असतात. या मादी वाळवीच्या वापर नसलेल्या वारूळात अंडी घालतात. भक्षकला बिळापासून दूर ठेवण्यासाठी घोरपड अनेक बिळे बनवून पालापाचोळ्याने बंद करतात.
घोरपड एका वेळेस 25 ते 30 अंडी घालतात. बिळातील उष्ण तापमानामुळे ती उबतात. यानंतर त्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी 168 ते 254 दिवस लागतात. परंतु सर्वच अंडी व्यवस्थित उबवली जात नाहीत, 20 अंड्यांपैकी फक्त आठ ते सोळा पिल्ले जन्म घेतात.
व्हॅरॅनस निलोटिकस या ईजिप्तमध्ये नाईल नदीच्या परिसरात आढळणाऱ्या घोरपडीची अंडी उबण्यास सुमारे दहा महिने लागतात.
घोरपडीबाबत गैरसमज माहिती मराठी (ghorpad animal in marathi)
घोरपडी बाबत अनेक गैरसमज असल्यामुळे घोरपडीची शिकार केली जाते. घोरपडीची चरबी औषधी असते अशा समजूत असल्याने तिची शिकार करून तिला उकळून चरबी मिळवली जाते.
घोरपडीचे तेल वातविकारांवर उपयोगी आहे, अश्या गैरसमजुतीतून घोरपडींची हत्या करण्यात येते.
घोरपडीचा उपयोग माहिती मराठी (ghorpad benefits information in marathi)
घोरपड साप आणि उंदीर यांची शिकार करते, त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्यापासून वाचते. त्यामुळे घोरपडीचे परिसरात असलेले अस्तित्व हे संतुलित परिसंस्थेचे लक्षण मानले जाते.
घोरपड खाण्याचे फायदे (monitor lizard food benefits) – घोरपडीची अंडी आणि मांस रूचकर असल्यामुळे त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात.
घोरपडीच्या पोटावरील कातडीपासून दिमडी नावाचे वाद्य बनवले जाते. हे वाद्य महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आढळते. घोरपडीच्या कातड्याचा ढोल वगैरे वाद्यांना लावण्यास वापर होतो. तसेच या प्राण्यांच्या कातड्याचे पट्टे, बॅगा अश्या वस्तू तयार करताना वापर करतात.
सारांश
मित्रांनो या लेखातून आपण घोरपड प्राण्याची (ghorpad information in marathi) सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
घोरपडीचे वैज्ञानिक नाव काय आहे ?
घोरपडीचे वैज्ञानिक नाव वाराणस बंगालेंसिस हे आहे.
घोरपड किती वर्ष जगते ?
घोरपड कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 20 वर्ष जगते.
तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव काय होते ?
तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव यशवंती होते.