जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे – GK questions in marathi

By | December 3, 2022

GK questions in marathi 2022 – जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला जनरल नॉलेजचे महत्व नक्कीच माहित असेल. पोलिस भरतीसाठी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञान वर आधारीत महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे विचारली जातात.

स्पर्धा परीक्षा असो की नसो तरीसुद्धा आपल्याला सामान्य ज्ञान बद्दल माहिती असायला हवी. ही माहिती आपल्याला जीवनात खूप महत्वाची ठरत असते.

त्यासाठी आज आपण या लेखात आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपण भारतील पहिले घडलेल्या घटनांचा अभ्यास करणार आहोत.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे – GK questions in marathi 2022

GK questions in marathi 2022
GK questions in marathi 2022

भारतातील सर्वात पहिले धरण कोणते आहे ?

भारतातील सर्वात पहिले धरण भाक्रा नांगल धरण आहे.

भारतातील सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे ?

भारतातील सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण हे आहे.

भारतातील पहिले हिंदी वृत्तपत्र कोणते आहे ?

भारतातील पहिले हिंदी वृत्तपत्र समाचार सुधावर्षण हे आहे.

भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते आहे ?

भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र बंगाल गॅझेट हे आहे.

भारतातील पहिले संग्रहालय कोणते आहे ?

भारतातील पहिले संग्रहालय कोलकाता मधील भारतीय संग्रहालय हे आहे.

भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे ?

भारतातील पहिले विद्यापीठ नालंदा हे आहे.

भारतातील पहिले मराठी नाटककार कोण आहे ?

भारतातील पहिले मराठी नाटककार विष्णुदास भावे हे आहेत.

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हेली नेशनल पार्क हे आहे.

भारतातील पहिली महिला पायलट कोण आहे ?

भारतातील पहिली महिला पायलट सरला ठकराल या आहे.

भारतीय पहिली महिला रेल्वे चालक कोण आहे ?

भारतीय पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव (भोसले) या आहे.

भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे ?

भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आहेत.

भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे ?

भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या आहे.

भारताची पहिली महिला डॉक्टर कोण आहे ?

भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी या आहेत.

पहिली भारतीय महिला क्रिकेट समालोचक कोण होती ?

पहिली भारतीय महिला क्रिकेट समालोचक शांता रंगास्वामी या आहे.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या ?

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाईं फुले होत्या.

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत ?

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या.

भारतातील पहिल्या अणु पाणबुडीचे नाव काय आहे ?

भारतातील पहिल्या अणु पाणबुडीचे नाव आयएनएस अरिहंत हे आहे.

भारतातील पहिला साखर कारखाना कोणता आहे ?

विखे पाटील सहकारी प्रवरा साखर कारखाना हा भारतातील पहिला साखर कारखाना आहे.

भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे ?

भारतातील पहिला रंगीत चित्रपट किसान कन्या हा आहे.

भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे ?

भारतातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदूर्ग हा आहे.

भारतातील पहिला बोलपट चित्रपट कोणता आहे ?

भारतातील पहिला बोलपट चित्रपट अयोध्येचा राजा हा आहे.

भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना कोठे आहे ?

भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगालमधील फुलती या ठिकाणी आहे.

भारतातील पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी झाला ?

भारतातील पहिला सहकारी कायदा 1992 साली झाला.

भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?

भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे होते.

भारताचे पहिले गव्हर्नर कोण आहे ?

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे आहेत

भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते ?

भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह होते

भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?

दार्जिलिंग शहरापासून 12 किलोमीटर अंतरावरील आर्टा टी इस्टेटच्या डोंगर पायथ्याला भारतातील पहिले जलविद्युत केंद्र आहे.

भारतातील पहिली जनगणना कधी झाली ?

पहिली जनगणना 1972 ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. 1881 ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.

भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणती आहे ?

भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आहे.

भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या आहे.

भारतातील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली ?

कावसजी दावर यांनी भारतातील पहिली कापड गिरणी सुरू केली.

भारतातील पहिल्या कापड गिरणी चे संस्थापक कोण होते ?

भारतातील पहिल्या कापड गिरणी चे संस्थापक कावसजी दावर हे होते.

भारतात येणारा पहिला इंग्रज कोण होता ?

थॉमस स्टिव्हन्सन हा भारतात येणारा पहिला इंग्रज होता.

भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत ?

भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे आहेत.

भारतातील पहिले नियतकालिक कोणते आहे ?

भारतातील पहिले नियतकालिक दिग्दर्शन हे आहे.

भारतातील पहिले नियोजित शहर कोणते आहे ?

भारतातील पहिले नियोजित शहर चंदीगड हे आहे.

भारतातील पहिले न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले ?

भारतातील पहिले न्यायालय आंध्र प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आले.

भारतातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे ?

भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश या राज्यात आहे.

भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?

भारतातील पहिले बाल न्यायालय दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आले.

भारतातील पहिले केरोसिन मुक्त शहर कोणते आहे ?

भारतातील पहिले केरोसिन मुक्त शहर दिल्ली आहे.

भारतातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे ?

भारतातील पहिले कॅशलेस गाव धसई (मुरबाड) हे आहे.

भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे ?

भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे आहे.

भारतात पहिला कोरोना रुग्ण कधी सापडला ?

भारतात पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये सापडला.

भारतातील पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे ?

भारतातील पहिला हिंदी चित्रपट राजा हरिश्चंद्र हा आहे.

भारतातील पहिला राजा कोण होता ?

भारतातील पहिला राजा भरत हा होता.

भारतातील पहिला मुस्लिम शासक कोण होता ?

भारतातील पहिला मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबक हा होता.

भारतातील पहिला मेगा फूड पार्क कोठे आहे ?

भारतातील पहिला मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्याच्या देगाव याठिकाणी आहे.

भारतातील पहिले नाणे कोणी सुरू केले ?

भारतातील पहिले नाणे काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग या राजवटींनी सुरू केले.

भारताचे पहिले वन विषयक धोरण केव्हा लागू करण्यात आले ?

भारताचे पहिले वन विषयक धोरण इसवी सन 1894 साली लागू करण्यात आले.

भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण आहेत ?

भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन हे आहेत.

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (janral nolej question in marathi)

महाराष्ट्राचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत ?

महाराष्ट्राचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षेत्रीय आहेत.

ई-गव्हर्नन्स राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

ई-गव्हर्नन्स राबवणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते आहे ?

ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

युवा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

युवा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

सिकलसेलग्रस्तांना मोफत एसटी प्रवास देणारे पहिले राज्य कोणते आहे ?

सिकलसेलग्रस्तांना मोफत एसटी प्रवास देणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

भूजलसंबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

भूजलसंबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते आहे ?

भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य महाराष्ट्र आहे.

गृहनिर्माण प्राधिकरण सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे ?

गृहनिर्माण प्राधिकरण सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे.

भारतातील पहिला ई-ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता आहे ?

भारतातील पहिला ई-ऑफिस प्रणाली जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र (24 डिसेंबर 2012) आहे.

भारतातील पहिला मोबाईल ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता आहे?

भारतातील पहिला मोबाईल ऑफिस प्रणाली जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र आहे.

महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे?

महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे.

भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे?

भारतातील पहिला डिजिटल जिल्हा नागपूर आहे.

भारतातील मोफत फोर जी वाय-फाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे ?

भारतातील मोफत फोर जी वाय-फाय सेवा देणारी पहिली नगरपालिका सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आहे.

भारतातील पहिले सोलर सिटी कोणते आहे ?

भारतातील पहिले सोलर सिटी मलकापूर हे साताऱ्यातील शहर आहे.

भारतातील पहिले वाय फय गाव कोणते आहे?

भारतातील पहिले वाय फय गाव – पाचगाव जिल्हा नागपूर

भारतातील पहिले आधार गाव कोणते आहे ?

भारतातील पहिले आधार गाव – टेंभली नंदुरबार

भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते आहे?

भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव – हरिसाल अमरावती

भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते आहे ?

भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव सातारा जिल्ह्यातील भिलार गाव आहे.

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे ?

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव – धसई ठाणे

घनकचरा पासून ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती आहे ?

घनकचरा पासून ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगरपालिका पुणे महानगरपालिका आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कुठे आहे ?

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ पुणे जिल्ह्यात आहे.

भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणता आहे ?

महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे.

महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र कोठे आहे ?

महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र डोंगरगाव जिल्हा नागपूर येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते आहे ?

महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य आहे.

शेतकऱ्यांचा पहिला संप घडलेले जगातील पहिले ठिकाण कोणते आहे ?

इसवी सन 1933 मध्ये जगातील शेतकऱ्यांचा पहिला संप अलिबाग तालुक्यातील चरी कोपर या ठिकाणी घडला.

भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे नागरी संकुल कोठे आहे?

भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे नागरी संकुल मुंबईत आहे.

भारतातील सर्वात मोठे कोरिया मंदिर (लेणे) कोठे आहे.

भारतातील सर्वात मोठे कोरिया मंदिर कैलास मंदिर वेरुळ महाराष्ट्र या ठिकाणी आहे.

राज्यातील पहिला सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प कोठे आहे ?

राज्यातील पहिला सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प निजल बुद्रुक जिल्हा भंडारा येथे आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार कोण आहेत?

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले या आहे.

भारतातील पहिला मूक चित्रपट कोणता आहे?

भारतातील पहिला मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला.

भारतीय चित्रपटाचे जनक कोण आहेत ?

भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब तथा धुंडिराज गोविंद फाळके आहेत.

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (GK questions in marathi) जाणून घेतली.

जनरल नॉलेज मराठी (GK questions in marathi) हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जनरल नॉलेज इन मराठी (GK questions in marathi) चे काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला पाठवा या लेखात ते समाविष्ट करू.

One thought on “जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे – GK questions in marathi

  1. Sonu

    मस्त होते जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *