गोवा मुक्ती दिवस माहिती मराठी

Goa Liberation Day Information In Marathi – देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यात्रेकरूचे भारत देशातील सर्वात जास्त आवडते ठिकाण म्हणजे गोवा. आज गोवा हे राज्य स्वतंत्र होऊन 60 वर्ष पूर्ण झाली.

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे राज्य आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 14 वर्षाने म्हणजेच 19 डिसेंबर 1961 या दिवशी स्वतंत्र झाला.

तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल, भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा मुक्त व्हायला चौदा वर्षे का लागली?

या लेखात आपण गोवा मुक्ती दिवस माहिती मराठी (Goa Liberation Day Information In Marathi) जाणून घेणार आहोत.

गोवा राज्याची माहिती मराठी (Goa State Information In Marathi)

Goa Liberation Day Information In Marathi
नावगोवा
ठिकाणभारत देश
राजधानीपणजी
अधिकृत भाषाकोकणी आणि मराठी
राज्यपालमृदुला सिन्हा
सरकारचे प्रमुखप्रमोद सावंत
स्थापना30 मे 1987
लोकसंख्या14,57,723 ( 2011 च्या जनगणनेनुसार )
क्षेत्रफळ3,702 चौ. किमी
आयएसओ संक्षिप्त नावIN-GA
प्रसिद्धसमुद्रकिनारे, अभयारण्ये, धबधबा आणि किल्ले

1. इसवी सन 1956 मध्ये गोवा या राज्यात सेंट पॉल कॉलेजमध्ये आशियातील पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन केली.

2. इसवी सन 1842 या साली भारतातील पहिले मेडिकल कॉलेज गोवा राज्यातील पणजी या ठिकाणी स्थापन करण्यात आले.

3. गोवा राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना दुचाकी वाहने भाड्यावर मिळतात.

4. पर्यटकांना भारतातील सगळ्यात जास्त आवडीचे ठिकाण म्हणजे गोवा. मांसाहारी यात्रेकरूंसाठी गोवा म्हणजे स्वर्गच. या ठिकाणी मद्यपानाची करण्यास सोय आहे.

5. भारत देशातील राज्यांपैकी क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात लहान राज्य असूनही भारत देशाच्या सर्वात श्रीमंत राज्यांपैकी गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

6. भारतील राज्यांपैकी गोव्यात दोन स्वतंत्रता दिन साजरे करतात – 15 ऑगस्ट आणि 19 डिसेंबर

7. गोव्याच्या स्वातंत्र्यकार्यात राम मनोहर लोहिया यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

8. राज्याच्या अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त महसूल पर्यटन क्षेत्रातून जमा होतो.

9. भारताची कोकिळा लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे गोव्याचे रहिवाशी आहेत.

10. गोवा हे राज्य समुद्रकिनारे, अभयारण्ये, धबधबा आणि किल्ले यासाठी प्रसिद्ध आहे.

11. महाभारतातील पांडव येथील गुफेत राहत होते, अशी मान्यता आहे. या गुफेला पांडव गुफा म्हणतात.

12. भारतातील राज्यांपैकी गोवा हे राज्य स्वतंत्र दर्जा असलेले राज्य आहे.

13. मंगेशी मंदिर हे राज्यातील सर्वात मोठे मंदिर आहे.

14. गोव्याच्या उत्तर दिशेला महाराष्ट्र तर पूर्व आणि दक्षिण दिशेला कर्नाटक ही राज्ये आहेत. गोव्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

संबंधित लेखमहाराष्ट्र दिन माहिती मराठी

15. गोव्यात पोर्तुगीज संस्कृती पाहायला मिळते. त्याचबरोबर हिंदू आणि ख्रिस्ती संस्कृती पाहायला मिळते. सर्व जमातीमधील लोक एकमेकांसोबत आनंदाने राहतात.

16. गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी आणि नाताळ अशी सर्व धर्मातील सण सर्वजण एकत्र येऊन साजरे करतात.

17. शेती आणि मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहे. तसेच या ठिकाणी तांदूळ आणि कडधान्याचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात.

18. या ठिकाणी मॅगनीज, लोह आणि बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.

19. संत फ्रान्सिस झेव्हिअरचे शव गोव्यातील Basilica Of Bom Jesus Church चर्चमध्ये ठेवण्यात आले आहे

20. गोवा हे राज्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. येथे बरीच गोवा पाहाण्यासारखी ठिकाणे आहेत.

गोव्यातील प्रमुख समुद्रकिनारे, गोव्यातील मंदिरे, गोव्याचा बीच आणि गोव्याचा सीन अशी सर्व गोवा पाहण्यासारखी ठिकाणे खालील तक्यात दिली आहेत.

समुद्रकिनारेअभयारण्येधबधबा आणि किल्ले
कोलवाभगवान महावीर अभयारण्यदूधसागर धबधबा
दोना पावलाबोंडला अभयारण्यआग्वाद किल्ला
मिरामारखोतीगाव अभयारण्यमये तलाव
कळंगुटसलीम अली पक्षी अभयारण्यकेसरव्हाळ
हणजुणेमोवाचो गुणो
पाळोळेनेत्रावली धबधबा
वागातोर
हरमल
आगोंद
बागा
मोरजी

गोवा स्वतंत्रता दिवस मराठी माहिती (Goa Liberation Day Information In Marathi)

goa liberation day information in marathi

21. इसवी सन 1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा याने भारतात प्रवेश केला, त्यानंतर इसवी सन 1510 मध्ये पोर्तुगीजांनी व्यापारी म्हणून त्यांच्या वखारी गोव्यात टाकल्या.

22. त्या वेळी गोव्यावर विजापूरच्या आदिलशहाची सत्ताहोती, ही सत्ता मोडून पोर्तुगीजांनी त्यांची सत्ता गोव्यात कायम केली.

23. अशा प्रकारे भारत देश ब्रिटिश तर गोवा आणि दमण-दीव हे प्रांत पोर्तुगीजांची हातात होते.

संबंधित लेखदादरा नगर हवेली मराठी माहिती

24. 15ऑगस्ट 1947 या रोजी भारत ब्रिटिश सत्तेतून मुक्त झाला. त्यांनतर काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक प्रांत भारतात सामील झाली.

25. पण या स्वातंत्र्य राज्यात गोव्याचा समावेश झाला नाही. पंतप्रधान आणि इतर मंत्री यांनी गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीज साम्राज्याच्या विरुद्ध नव्हते.

26. गोव्याच्या स्वातंत्र्यकार्यात राम मनोहर लोहिया यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

27. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगाव येथे जाहीर सभा घेऊन पोर्तुगीजांविरुद्ध आवाज उठवला.

28. ही गोवा मुक्तीसाठीची पहिली ठिणगी होती. यानंतर आंतरिक कार्यकर्तेनी आपली कामे चालूच ठेवली.

29. प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे यासारखे अनेक स्वातंत्र्यसैनिक तयार झाले. यातूनच आझाद गोमंतक दलाची स्थापना झाली.

30. या दलाचं नेतृत्व प्रभाकर सिनारी यांच्याकडे होते. यानंतर लगातार पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक छोटे-मोठे हल्ले झाले, त्यात या सशस्त्र दल जिंकत राहिले.

31. संगीतकार सुधीर फडके यांनी सुद्धा गोवा मुक्ती लढाईत सहभाग घेतला होता.

32. सुधा जोशी, सिंधुताई देशपांडे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, शांत राव अश्या अनेक स्त्रिया या स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाल्या.

33. स्वातंत्र्यसैनिकांनी आपले कार्य चालूच ठेवले.

34. 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या.

35. पोर्तुगीजांनी ब्रिटन, अमेरिका या मित्र देशांकडे मदतीचा हात मागितला पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कम आणि योग्य असल्यामुळे या मित्र देशांनी पोर्तुगीजांना मदत करणं नाकारलं.

36. पोर्तुगीज सरकारची भारतीय लष्कराने आणि स्वातंत्र्यसैनिकांनी कोंडी केली.

37. पत्रादेवी या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांवर पोर्तुगीज सैन्याने मोठा गोळीबार केला.

38. त्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक मृत्युमुखी पडले.

39. शेवटी 19 डिसेंबर 1961 रोजी रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले.

40. अश्या प्रकारे 451 वर्ष राज्य करणाऱ्या पोर्तुगिज सत्तेतून गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त झाला.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

इसवी सन 1510 मध्ये गोवा कोणी काबीज केला ?

इसवी सन 1510 मध्ये गोवा पोर्तुगिज या सत्तेने काबीज केला.

गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख कोण होते ?

गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख गिरीश राया चोडणकर होते.

पंधराशे दहा मध्ये गोवा कोणी काबीज केला ?

पंधराशे दहा मध्ये गोवा अफोंसो डी अल्बुकर्क (Afonso de Albuquerque) काबीज केला.

गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते ?

गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते राम मनोहर लोहिया हे होते.

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण गोवा राज्याची माहिती (Goa Information In Marathi) आणि गोवा मुक्ती दिवस (Goa Liberation Day Information In Marathi) याबद्दल माहिती जाणून घेतली.

गोवा मुक्ती दिवस माहिती मराठी (Goa Liberation Day Information In Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या पोस्टसाठी आमच्या ब्लॉगला पुन्हा भेट द्या.