goa tourist places in marathi – देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यात्रेकरूचे भारत देशातील सर्वात जास्त आवडते ठिकाण म्हणजे गोवा. गोव्यात समुद्रकिनारे, अभयारण्ये, धबधबा आणि किल्ले खूप प्रसिद्ध आहे.
निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी आणि परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
या लेखातून आपण गोवा राज्यातील पाहाण्यासारखी ठिकाणे व माहिती (goa tourist places in marathi) जाणून घेणार आहे.
गोव्यातील पर्यटन स्थळे माहिती मराठी (goa tourist places in marathi)

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे राज्य आहे. गोव्याची राजधानी पणजी हे शहर आहे. राज्यातील सर्वात मोठे शहर वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.
नैसर्गिक सुंदरता आणि समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे.
आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे गोव्यात आहे. भारतात निसर्गरम्य ठिकाण आणि जैवविविधता पॉइंट म्हणून गोवा राज्य ओळखले जाते. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे.
समुद्रकिनारा, मंदिरे आणि चर्च, गोव्यातील बीच, धबधबे, म्युझियम आणि किल्ले गोव्यातील पर्यटकांना आकर्षित करतात.
दक्षिण गोवा पाहाण्यासारखी ठिकाणे (south goa places to visit marathi)

दक्षिण गोव्याचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर मडगांव हे आहे. तसेच वास्को दा गामा आणि मुरगाव गोव्यातील मोठी शहरे आहेत. दक्षिण गोव्यात समुद्रकिनारे, मशिदी, चर्च व मंदिरे आणि संग्रहालये आणि कला गॅलरी प्रसिद्ध आहेत.
मडगाव पासून सहा किलोमीटर अंतरावर कोल्व बीच आहे. कोल्वा बीचचे प्रमुख आकर्षण म्हणजे वॉटर स्पोर्ट्स क्लबचा आनंद घेता येतो. या ठिकाणी तुम्ही मोटार राईड करू शकता. तसेच समुद्राचा हा भाग पोहण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
येथील आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी नारळाच्या बागा आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामांनी सोडलेला बाण या बीचच्या आवारात पडला होता. यामुळे या बीचाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
मडगावपासून 37 किमी अंतरावर पालोलेम आणि आगांडो बीच आहेत. येथे समुद्रातून बोटीने प्रवास करून जावे लागतो. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्याला बटरफ्लाय बीच नाव पडले.
गोव्यात अनेक समुद्र किनाऱ्यांवर डॉल्फिन्स पाहायला मिळतात. पण हा समुद्रकिनारा खूपच शांत असल्याने डॉल्फिनचे खेळ येथे पाहण्याचा वेगळा आनंद मिळतो.
इसवी सन 1959 साली मडगावपासून 26 किमी अंतरावर जामा मशिद आहे. येथून जवळच डोम सेबॅस्टिओ या राजाच्या देणगीतून बांधलेले एक कॅथलिक चर्च बांधले. या चर्चमध्ये ख्रिश्चन कलाकृतींचे संग्रहालय आहे.
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. या ठिकाणी दूधसागर धबधबा, नेत्रावली धबधबा, आग्वाद किल्ला, मोवाचो गुणो, केसरव्हाळ आणि मये तलाव पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
सलीम अली पक्षी अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य आणि बोंडला अभयारण्य ही गोव्यातील प्रसिद्ध अभयारण्य आहेत.
उत्तर गोवा पाहाण्यासारखी ठिकाणे (north goa tourist places marathi)

उत्तर गोव्यात भव्य किल्ले, सुंदर कॅथेड्रल, गजबजलेले फ्ली मार्केट आणि इतर विविध प्रकारच्या मनोरंजक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. याचे प्रशासकीय केंद्र पणजी शहर आहे.
पणजीमध्ये ऐतिहासिक वास्तू, लॅटिन क्वार्टर, समुद्रकिनारे आणि स्ट्रीट आर्ट पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. जुने गोवा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. या ठिकाणी सुप्रसिद्ध चर्च, से कॅथेड्रल, सेंट कॅजेटन चर्च, सेंट ऑगस्टीन टॉवर पाहायला मिळतात.
अंजुना फ्ली मार्केट गोव्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी नेपाळी आणि तिबेटी हस्तकला, स्मृतीचिन्हे, निक्कनॅक, दागिने, बीचवेअर, वॉल हँगिंग्ज खरेदी करता येतात.
जगातील पोर्तुगीज साम्राज्याच्या सात आश्चर्यांपैकी एक बॅसिलिका ऑफ बॉम येशू हे आहे. हे भारतातील आणि गोव्यातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष आहे.
सारांश
या लेखातून आपण गोव्यातील पर्यटन स्थळे माहिती मराठी (goa tourist places in marathi) सविस्तरपणे जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
गोव्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
गोव्याला 160 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे.
गोव्यात किती जिल्हे आणि तालुके आहेत ?
गोव्यात एकूण दोन जिल्हे आणि 12 तालुके आहेत.
1. दक्षिण गोव्यातील तालुके यादी – साष्टी, केपे, मुरगाव, काणकोण, सांगे व धारबांदोडा
2. उत्तर गोव्यातील तालुके यादी – तिसवाडी, पेरणेम, फोंडा, बर्देझ, बिचोलीम आणि सातारी
पुढील वाचन :