बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय ?

Good Friday Information In Marathi – गुड फ्रायडे अर्थात शुभ शुक्रवार हा एक ख्रिस्ती समाजातील महत्वाचा दिवस मानला जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून आपल्या प्राणाचे बलिदान दिले तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे, या दिवसाला ब्लॅक डे देखील म्हणतात.

या लेखातून आपण बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय (Good Friday Information In Marathi), ख्रिस्ती समाजातील याचे महत्व आणि गुड फ्रायडे अर्थात शुभ शुक्रवार कसा साजरा करतात याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय (what is good friday and why is it celebrated)

Good Friday Information In Marathi

मित्रांनो, ख्रिश्चन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म आहे. या धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली होती. धर्म स्थापन करताना तसेच समाजातील लोकांना अज्ञान दूर करण्यासाठी, प्रेम व चांगुलपणा शिकवण्यासाठी ख्रिस्ताने अनेक संकटे सोसली.

यातलाच एक महत्वाचा दिवस म्हणजे गुड फ्रायडे. खर तर हा दिवस ख्रिस्ती बांधवांच्या जीवनातील दुःखाचा दिवस आहे. या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढवले होते.

Good Friday & Easter Sunday Connection – शुभ शुक्रवार या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने मानवी देहाचा त्याग करून तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले होते. ज्या दिवशी येशू ख्रिस्ताने प्राणाचा त्याग केला त्या दिवसाला गुड फ्रायडे तर येशू पुनर्जीवित झाले त्या दिवसाला ईस्टर संडे असे म्हणतात.

ख्रिश्चन समाजात गुड फ्रायडे आणि इस्टर संडे हे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी ख्रिस्ती लोक चर्चमध्ये प्रभू येशूची महानता, त्याग, दया आणि प्रेमाची इच्छा याविषयी स्मरण करतात.

येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर का चढवले (yeshu khrist death story in marathi)

मित्रांनो, येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र होते. त्यांनी मानवी कल्याणासाठी आणि लोकांना परमेश्वराचे वचन व शुभवार्ता सांगण्यासाठी जन्म घेऊन सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता कार्य केले.

यहूदी लोकांना यहोवा देवाकडून मानवाला पापांपासून तारण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म होईल, असा संदेश मिळाला होता. पण त्या यहूदी लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्‍वीकार केला नाही.

तरीदेखील येशू ख्रिस्त हे लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी शिक्षित करत राहिले. त्या वेळेच्या यहुदी लोकांनी ख्रिस्तांवर अनेक अत्याचार केले तरीही त्यांनी ते सर्व सहन करत आपले कार्य चालूच ठेवले.

पुढे काही कट्टर लोकांनी येशूचा विरोध करत रोमन गव्हर्नर पितालुसकडे येशू ख्रिस्ताची तक्रार केली, की येशू ख्रिस्तांची शिकवण रोमन सत्ताधारकांसाठी धोक्याची ठरत आहे.

यानंतर पितालुसने त्या वेळच्या कट्टर लोकांचे समाधान करण्यासाठी येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर चढवून जिवे मारावे, असा आदेश दिला. ही शिक्षा त्या वेळची सर्वात क्रूर शिक्षा मानली जायची.

ही शिक्षा भोगत असताना येशूने त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी परमेश्वराला प्रार्थना केली की, हे परमेश्वरा माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत.

वधस्तंभावर शिक्षा झालेला व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्या त्याचा देह त्याच्या नातेवाईकांना सोपवण्यात यायचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्युनंतर त्याचा देह एका पेटीत ठेवण्यात आले. या दिवसानंतर तीन दिवसांनी प्रभू येशू ख्रिस्त हे पुन्हा जिवंत झाले आणि त्यांच्या 40 अनुयायांना संदेश देऊन स्वर्गात गेले.

अशा प्रकारे येशूने महानता, त्याग, दया आणि प्रेमाची शिकवण जगाला अर्पण केली. याची आठवण म्हणून गुड फ्रायडे व ईस्टर संडे साजरा केला जातो.

गुड फ्रायडे कसा साजरा करतात (how to celebrate good friday in marathi)

गुड फ्रायडे या दिवशी ख्रिस्ती बांधव काळ्या रंगाचे कपडे परिधान करून चर्चमध्ये प्रार्थना करतात. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या हातातून घडलेल्या गुन्ह्यांची माफी येशूकडे मागतो.

येशू ख्रिस्त आपले कल्याण व्हावे, यासाठी क्रॉसवर चढला आणि बलिदान दिले, याविषयी ख्रिस्ताचे आभार मानले जाते. या दिवशी प्रत्येक चर्चमध्ये विशेष प्रार्थना करत येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या क्षणांचे आणि बलिदानाचे स्मरण केले जाते.

या दिवशी ख्रिस्ताची शिकवण वाचून त्यांनी सांगितलेले संदेश व शिकवण स्वतःच्या आयुष्यात लागू करतात. तसेच या दिवसापासून एक नवीन ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरू करतात.

गुड फ्रायडे हा आनंदाचा दिवस आहे का दुःखाचा (Good Friday Information In Marathi)

मित्रांनो, आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की गुड फ्रायडे हा आनंदाचा दिवस आहे का दुःखाचा ? तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो हा एक अतिशय दुःखाचा दिवस असून ख्रिस्ती धर्मात या दिवसाला ब्लॅक डे असेही म्हणतात.

यामुळे हॅपी गुड फ्रायडे म्हणणे चुकीचे आहे. या दिवशी ख्रिस्ताच्या जीवनातील घटनांपैकी एक दुःखद प्रसंग घडला होता. या दिवशी येशूला वधस्तंभावर चढवले गेले त्यानंतर येशूचा मृत्यू झाला.

अखेर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुनर्जीवित होईल, आपल्या अनुयायांना संदेश देऊन स्वर्गात गेले. अशा प्रकारे गुड फ्रायडे हा दिवस नक्कीच दुःखाचा दिवस आहे.

तरीदेखील आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की येशूने आजच्या दिवशी आपल्या पापाची शिक्षा स्वतःवर घेऊन आपल्यासाठी बलिदान दिले आहे. याची जाणीव ठेऊन आपण आजपासून ख्रिस्ती जीवनाची नवीन सुरुवात करावी आणि येशूच्या आज्ञेचे पालन करावे.

सारांश

मित्रांनो, या लेखातून आपण बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय (Good Friday Information In Marathi), याचे महत्व आणि गुड फ्रायडे कसा साजरा करतात याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. अशा करतो की, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.

संबंधित लेख

  1. ख्रिसमस नाताळ माहिती मराठी
  2. ख्रिसमस पूर्वसंध्या उत्सव माहिती मराठी

Leave a Comment