शुभ सकाळ मराठी संदेश (Good Morning marathi message)

By | October 6, 2022

Good Morning marathi message – सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसून ती देवाची सुंदर कलाकृती असते. अंधारावर प्रकाशाने केलेली मात असते. प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. याच साक्षीला हाताशी धरून आपण आपल्या जीवनाची नवी सुरूवात करायची असते.

नवे ध्येय, नवी ऊर्जा, नवा विचार आपल्या मनात निर्माण करून जीवनाचे ध्येय प्राप्त करूया. या लेखातून आम्ही काही निवडक मराठी शुभ सकाळ संदेश (Good Morning marathi message) देत आहोत. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील नव्या दिवसाची सुरूवात कराल.

हे संदेश तुम्ही तुमच्या परिवाराला, मित्रांना व प्रियजनांना पाठवू शकता. यामुळे त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि ते आनंदी देखील होतील. चला तर मग सुरू करूया….

Table of Contents

शुभ सकाळ मराठी संदेश (Good Morning marathi message)

Good Morning marathi message

सकाळ हसरी असावी, ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..

मुखी असावे पांडूरंगाचे नाम, सोपे होई सर्व काम..🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

गर्व करून कुठल्यानात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा..

कारण, वेळ आल्यावर पैसा नाही तर, माणसंच साथ देतात..

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा, आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधित करून जातो..

आपला दिवस आनंदी जावो!

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका.. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरीबीची जाण असली की…बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..

मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.

💐💐 शुभ सकाळ 💐💐

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही.. मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

किती दिवसाचे आयुष्य असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण

या जगात उद्या काय होईल, ते कोणालाच माहित नसते..

म्हणुन आनंदी रहा….

।। आपला दिवस आनंदी जावो – आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो. ।।

🌷 शुभ सकाळ 🌷

शुभ सकाळ कोट्स मराठी (good morning quotes in marathi)

good morning quotes marathi

जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल.

🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच आहेत….

फरक एवढाच,

आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात….

💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

यशस्वी आयुष्यापेक्षा, समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..

कारण, यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो..

सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

लहानपासुनच सवय आहे, जे आवडेल ते जपुन ठेवायचं..

मग ती वस्तु असो वा….तुमच्यासारखी गोडं माणसं.🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात,

पण चांगले मित्र नक्की असतात..

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

शोधणार असाल तर काळजी करणारे शोधा कारण, गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतील…!

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..

एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि, तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,

आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे,

आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…

💐 !! शुभ सकाळ !! 💐

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..

💐 !! शुभ सकाळ !! 💐

निसर्गावर आधारित शुभ प्रभात सुविचार (nature good morning marathi status)

nature good morning marathi status

हे जग खूप सुंदर आहे फक्त तुमचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.

जर तुम्हाला परमात्म्याला जाणून घ्यायचे असेल, तर तुमच्या चेहऱ्यावर वारा आणि तुमच्या हातावर उबदार सूर्य अनुभवा….

साधेपणा निसर्गाचे पहिले पाऊल आहे, आणि कलेचे शेवटचे

कुटुंब हे निसर्गाच्या उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक आहे.

निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर

प्रत्येक डोंगरावर एक मार्ग दडलेला आहे, जरी तो दरीखोऱ्यातून दिसत नसला तरी…

निसर्गाच्या गतीचा अवलंब करा कारण त्यात धैर्याचे रहस्य आहे.

निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ राहा, तो आपल्याला कधीच अपयशी करणार नाही

मी देवावर विश्वास ठेवतो, मी फक्त त्याला निसर्ग असं म्हणतो.

रंग म्हणजे निसर्गाचं हास्य…

शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो,

त्याचप्रमाणे आपण डोक्यात सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत,

ते आधी परिक्षा घेतात मग धडा शिकवतात.

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये (good morning quotes marathi)

Good Morning marathi message

यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!

पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..

!शुभ सकाळ !

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही पाने उलटले की जुने काही आठवत नाही.

आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण,

आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.

शुभ सकाळ!

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर,

दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला,

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

शुभ सकाळ!

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

माणसाच्या परिचयाची सुरुवातजरी चेहऱ्याने होत असली तरी,

त्याची संपूर्ण ओळख,वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

शुभ सकाळ!

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..

पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..

शुभ सकाळ!

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी एक रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..

एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !

शुभ सकाळ..!

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच..

शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.

शुभ सकाळ स्टेटस आपला दिवस आनंदात जावो (Good Morning Messages in Marathi)

Good Morning Messages in Marathi

जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो…

जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो…

जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो…

शुभ सकाळ !

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही.

खेळाडूला फक्त जिंकायचे असते..

शुभ सकाळ !

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका…

कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते, कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.

शुभ सकाळ!

तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.

एका झाडापासून लाखो, माचिसच्या काड्या बनवता येतात.

पण एक माचिसची काडी, लाखो झाडे जाळून खाक करू शकते.

शुभ सकाळ!

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते..

काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..

मग कोणाच्याही उपयोगात न येता,

गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…

!शुभ प्रभात!

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते

कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.

शुभ सकाळ!

खेळ’ असो वा ‘आयुष्य’आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.

शुभ सकाळ

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

सारांश

या लेखातून आपण निवडक मराठी शुभ सकाळ संदेश (Good Morning marathi message) पाहिले. जर तुम्हाला हे शुभ सकाळ स्टेटस, कोट्स आवडले असतील, तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

सकाळ म्हणजे नक्की काय असतं ?

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो..🌞
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळविलेला विजय असतो.
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आपल्या आयुष्यातील नवी दिशा नव्या आशा ध्येयाची सुरूवात असते.

सकाळी पहाटे किती वाजता उठायचं असत ?

प्रत्येक व्यक्तीचं ध्येय, उद्दिष्ट आणि जीवनशैली वेगळी असते, त्यानुसार दिनक्रम ही बदलतो.

आपले ध्येय व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते आपले आरोग्य आणि आपली मानसिकता.
या दोन्हीवर विजय मिळवण्यासाठी सकाळच्या प्रसन्न हवेत उठणे, व्यायाम करणे, सराव करणे महत्त्वाचे असते.

यासाठी सकाळी लवकर उठले पाहिजे. साधारण सकाळी पहाट चार वाजता उठायचं असत.

पुढील वाचन :

  1. गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी
  2. लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
  3. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *