गोवर्धन पूजा कथा मराठी

Govardhan Puja katha In Marathi – दिवाळी आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण मानला जातो. हा सण साधारणपणे पाच ते सहा दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आहे.

गोवर्धन पूजा हा दिवाळीतील तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. ही पूजा विशेषतः उत्तर भारतात साजरी केली जाते. या दिवशी विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून कृष्णाच्या मूर्तीपुढे नैवैद्य दाखवतात.

या लेखातून आपण गोवर्धन पूजा कथा (Govardhan Puja katha In Marathi) मराठीत जाणून घेणार आहोत.

Table of Contents

गोवर्धन पूजा कथा मराठी (Govardhan Puja katha In Marathi)

Govardhan Puja katha In Marathi

भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून भगवान इंद्राचा पराभव केला होता. त्याच्या उत्सवाप्रीत्यर्थ ही पूजा केली जाते.

इंद्रदेवाची कृपा गोकुळावर राहावी म्हणून शहरातील सर्व लोक इंद्रदेवाची पूजा करायचे. एके दिवशी श्रीकृष्णाने गोकुळच्या लोकांना समजावून सांगितले की इंद्रदेवाच्या उपासनेत तुमचा वेळ वाया जात आहे. तुम्ही गाई-म्हशींची पूजा करा, कारण त्या तुम्हाला दूध देतात. यामुळे यांचा सन्मान करणे योग्य आहे.

श्रीकृष्णाच्या बोलण्याने सर्व गोकुळात इंद्रदेवाला सोडून लोक गाई-म्हशींची पूजा करू लागले. यामुळे इंद्रदेव संतापून लोकांना धडा शिकवण्यासाठी ढगांना आज्ञा केली गोकुळ नगरी बुडत नाही तोपर्यंत पाऊस पाडत राहा.

इंद्राने केलेल्या आज्ञेमुळे गोकुळात प्रचंड पाऊस सुरू झाला. गोकुळात असा पाऊस कधीच पडला नव्हता. सगळीकडे पाणीच पाणी दिसू लागले. संपूर्ण गोकुळ जलमय झाले होते. हे सर्व दृश्य पाहून लोक घाबरले आणि श्रीकृष्णाजवळ गेले.

मग श्रीकृष्णाने सर्व गोकुळवासीयांना आपल्या मागे येण्याचे सांगितले. गोकुळ रहिवासी आपल्या गायी आणि म्हशी सोबत घेऊन श्रीकृष्णाच्या मागे गेले.

श्रीकृष्ण गोवर्धन नावाच्या डोंगरावर पोहचले आणि तो डोंगर करंगळीवर उचलला. गोकुळचे सर्व रहिवासी येऊन त्या पर्वताखाली उभे राहिले.

श्रीकृष्णाचा चमत्कार पाहून इंद्र भयभीत होऊन पाऊस बंद केला. पाऊस थांबल्याने गोकुळाचे लोक आनंदी होऊन आपापल्या घरी गेले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांचे प्राण वाचवले.

गोवर्धन पूजा माहिती मराठी (govardhan puja in marathi)

मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ज्यांना शक्य नसेल ते लोक गोवर्धन पर्वताची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात.

प्राचीन काळी अन्नकूट हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.

विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

यमुना नदी व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा करून लोक या पर्वताचे आभार मानतात.

गोवर्धन पूजा विधी मराठी (Govardhan Puja vidhi in marathi)

गोवर्धन पूजनाच्या दिवशी बळी पूजा, मार्गपाळी हे सण देखील साजरे केले जातात. या दिवशी गाय, बैल आणि इतर जनावरांना अंघोळ घालून धूप, चंदन व फुलांचा हार घालतात.

गाईला मिठाई भरवून पूजा केली करतात, यांनतर भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

ही पूजा करण्यासाठी शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बनवली जाते. श्रीकृष्णासमोर एक गाय, तांदूळ, फुले, पाणी, दही आणि तेलाचे दीप प्रज्वलित ठेवून श्रीकृष्णाची पूजा करतात. यांनतर कृष्णाला प्रदक्षिणा घालतात.

श्रीकृष्ण नेहमी गाईंच्या सहवासात राहायचे. म्हणून गायीला हिंदू धर्मात पुजली जाते.

आपल्याला दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळावे म्हणून अन्नकूट साजरा करतात. यामुळे दारिद्र्याचा नाश होऊन, माणूस आयुष्यभर सुखी आणि समृद्ध राहतो अशी मान्यता आहे.

या उत्सवाच्या दिवशी जो दुःखी राहील, तो आयुष्यभर दुःखी राहतो असे म्हंटले जाते. यामुळे अन्नकूट उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

सारांश

या लेखातून आपण गोवर्धन पूजा कथा (Govardhan Puja katha In Marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

गोवर्धन पर्वत कुठे आहे (where is govardhan parvat)

गोवर्धन पर्वत मथुरा जिल्ह्यात आहे. मथुरा हा जिल्हा भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यात आहे. मथुरा शहरापासून गोवर्धन पर्वत 21 किलोमीटर अंतरावर आहे.

गोवर्धन पर्वताची उंची किती आहे ?

गोवर्धन पर्वताची उंची 80 फूट इतकी आहे.

पुढील वाचन

  1. जाणुन घ्या आपण दिवाळी का साजरी करतो?
  2. श्री महालक्ष्मी पुजा विधी मराठीत
  3. गणपतीची पूजा कशी मांडावी?
  4. वसुबारस माहिती मराठी

Leave a Comment