ग्राहकांचे हक्क आणि अधिकार माहिती

Categorized as Blog

आपल्यापैकी प्रत्येकजण खरेदीदार आहे. आपण जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतो. देशाचा पंतप्रधान ते सामान्य व्यक्ती हा खरेदीदार असतो. त्यामुळे याला अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त प्रभावी घटक म्हणून ओळखला जातो. कोणताही व्यवसाय हा गिर्‍हाईकवर अवलंबून असतो. व्यवसायाची वाढ होण्यासाठी गिर्‍हाईक गरजेचा आहे.

जागो ग्राहक जागो !!

हा राजा आहे.
ग्राहक (गिर्‍हाईक)हा लोकशाहीची प्राणशक्ती आहे.
हेच भांडवल आहे.

या लेखात आपण ग्राहकांचे हक्क आणि अधिकार माहिती जाणून घेणार आहोत. कारण खरेदीदार जरी राजा असला तरी तो बऱ्याच वेळा शोषणाला बळी पडत असतो. अश्या वेळी संघटित होऊन हे शोषण थांबवता येत असते.

ग्राहकांचे हक्क आणि अधिकार तसेच हिताचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी केंद्र शासनाने 24 डिसेंबर 1986 या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. यामध्ये आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत.

ग्राहकांचे हक्क आणि अधिकार माहिती

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी केंद्र शासनाने 24 डिसेंबर 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. या कायद्याअंतर्गत तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अंमलात आणला.

या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तयार करण्यात आली.

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग असतो. राज्य पातळीवर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग असतो आणि जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच असतो.

ग्राहक संरक्षण कायदा 1986 कायद्याअंतर्गत आपल्याला सहा अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करून गिऱ्हाईक वर होणारे शोषण थांबवता येते. साधारणपणे सहा महत्वपूर्ण ग्राहकांचे हक्क आणि अधिकार आहेत.

आपले जीवित आणि मालमत्ता यांच्या दृष्टीने हानिकारक असणाऱ्या वस्तूंच्या वितरणापासून संरक्षित राहण्याचा अधिकार

या अधिकारात खरेदीदार घातक आणि हानीकारक वस्तू विक्री करणाऱ्यावर कारवाई करू शकतो. बाजारात अनेक ठिकाणी दर्जेदार वस्तू ऐवजी हलक्या प्रतीच्या वस्तू विकल्या जातात. या वस्तू खरेदीदाराच्या हिशोबाने अपायकारक असतात.

त्यामुळे हा अधिकार करून आपण अश्या अपायकारक वस्तू विक्री करणारा व्यावसायिक आणि त्याच्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करू शकतो.

मालाचा दर्जा, परिमाण, उपयुक्तता, गुणकारककता, शुद्धता आणि किंमत याबद्दल माहिती जाणून घेणे

हा एक ग्राहकाचा महत्वाचा अधिकार आहे. वस्तू खरेदी आणि विक्री करत असताना आपण पैश्याचा विनियोग म्हणजे देवाणघेवाण करत असतो. वस्तू विकणारा हा व्यवसायिक असल्याने तो पैसे कमावण्यावर भर देतो आणि वस्तू खरेदी करणारा साहजिकच आपल्या पैश्याचा पुरेपूर मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.

यासाठी हा अधिकार ग्राहकांना घेतलेल्या वस्तूचा दर्जा जाणून घेण्याचा अधिकार देतो. यामध्ये प्रामुख्याने वस्तूची योग्य किंमत काय आहे ? आणि त्याची शुद्धता किती आहे ? याची माहिती मिळवून देणारा हा अधिकार आहे.

वस्तू खरेदी करताना ती कोणकोणते घटक वापरून बनवले आहे ? त्याचबरोबर वस्तूचे वजन आणि आकारमान याची माहिती या कायद्या अंतर्गत मिळवता येते.

रास्त किमतीला विविध वस्तू आणि सेवा मिळू शकतील याची हमी मिळवण्याचा अधिकार

वस्तू खरेदी करताना ती चांगली मिळावी याविषयी जसा अधिकार आहे, त्याचप्रकारे ती वस्तू किंवा सेवाबद्दल माहिती जाणून घेण्याचा देखील आपला अधिकार आहे. ग्राहक हे कधीच संघटित नसतात, याचा फायदा व्यापारी वेग घेतो आणि बाजारातील किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत असतात.

परिणामी बाजारात महागाई वाढत जाते आणि याचा परिणाम खरेदी म्हणजेच ग्राहक वर्गावर होतो. यावर उपाय म्हणून सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन, याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

आपले म्हणणे मांडण्याची अधिकार

ग्राहकांना स्वतःचे हित जपण्यासाठी आणि होणाऱ्या अन्याय विरुद्ध दाद मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ग्राहकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध व्यवस्था निर्माण केल्या आहेत. यामध्ये काही स्तर ठरवण्यात आले आहे, या स्तरावर लेखी तक्रार करून त्या समस्यांचे निवारण करता येते.

यामध्ये प्रामुख्याने वजन मापाचा घोटाळा आणि भेसळ प्रतिबंधक उपाय केले जातात. याव्यतिरिक्त कोणत्याही शोषणाविरुद्ध ग्राहकाला न्याय मागता येतो.

अनुचित व्यापारी प्रथा किंवा शोषण याविरुद्ध दाद मागणे

ग्राहक कायम असंघटित असतो व्यापारी वर्ग काही अनुचित प्रथा चालू करतात. जसे की दहा रुपयाची वस्तू अकरा रुपयेला विकणे. या अधिकाराअंतर्गत आपण झालेल्या शोषणाविरुद्ध न्याय मागू शकतो. यासाठी हा अधिकार देण्यात आला आहे.

यामध्ये प्रामुख्याने खालील व्यापारी व्यवहार यांचा समावेश होतो.

  • एखादी वस्तू चांगल्या दर्जाचे आहे असे दाखवणे.
  • जुनी वस्तू दुरुस्त करून नवी आहे म्हणून विकणे.
  • वस्तूबद्दल गॅरंटी दिलेली आहे आणि त्यात काही दोष असला तर ती वस्तू बदलून दिली जाणार नाही असा गैरसमज सार्वजनिकरित्या निर्माण करणे.
  • विक्री वाढवण्यासाठी लॉटरी चे आयोजन करणे.
  • वस्तूंच्या किमती वाढविण्याच्या उद्देशाने वस्तूचा साठा करणे.

या पद्धतीने व्यापारी वर्ग बाजारात वस्तूच्या किंमत वाढवतो आणि बाजारावर नियंत्रणात आणतो.

ग्राहक शिक्षणाचा हक्क

व्यापारी वर्गाकडून ग्राहकाची फसवणूक जास्त प्रमाणात होताना दिसून येते. यामागचे मुख्य कारण ग्राहकाचे अज्ञान असू शकते. यासाठी की वस्तू किंवा सेवा याविषयी ग्राहकाला सविस्तर माहिती नसते. म्हणून ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत एक शासकीय यंत्रणा तयार केली आहे. ही यंत्रणा ग्राहकांना वस्तू आणि सेवा याविषयी माहिती पुरवत असते.

कायद्यातील इतर हक्क

  • पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे, यासाठी पर्यावरणाचे संरक्षण होईल अशा प्रकारे उत्पादन घ्यायला हवे.
  • विविध उत्पादित केलेल्या वस्तूचा प्रत्येक नगाच्या उत्पादनासाठी येणारा खर्च, जाणून घेण्याचा हक्क आहे.

ग्राहकांचे हक्क आणि अधिकार फक्त कायद्यात असून चालणार नाहीत, त्यासाठी ग्राहकांनी देखील जागरूक होणे गरजेचे आहे. अधिकार हे शस्त्र असतात, ते वापरले नाही तर बोथट होतात.

Related – कलम 328 माहिती मराठी

FAQs

ग्राहक दिन केव्हा असतो ?

ग्राहक दिवस 15 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

उपभोक्ता (ग्राहक) म्हणजे काय व्याख्या.

ग्राहक एक अशी व्यक्ती आहे जी वस्तू आणि सेवा वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंसाठी काही प्रमाणात पैसे देते.

ग्राहक संरक्षण कायदा तक्रार कशी करायची ?

ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येते. ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी जवळील ग्राहक संरक्षण केंद्रात जावे लागते, आणि लेखी अर्ज सादर करावा लागतो. ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यासाठी www.edaakhil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष कोण असतात ?

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री हे असतात.

ग्राहकांच्या समस्या वाढल्या तर ग्राहक चळवळीचे अस्तित्वाचे काय होते ?

ग्राहक समस्या वाढल्या तर, त्यावर योग्य ती न्यायनिवाडा होतो. ग्राहकाकडून जर चुकीची तक्रार झाली असेल, तर त्यावर 10 हजार दंड भरावा लागतो.

राष्ट्रीय आयोगात तक्रार अर्ज किती प्रतीमध्ये सादर करावा ?

राष्ट्रीय आयोगात तक्रार अर्ज सहा प्रतीमध्ये सादर करावा.

ग्राहक संरक्षण राष्ट्रीय परिषद कोणत्या पातळीवर असते ?

ग्राहक संरक्षण राष्ट्रीय परिषद केंद्रीय पातळीवर असते.

सारांश

या लेखातून आपण ग्राहकांचे हक्क आणि अधिकार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.