ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा ?

gram panchayat rti form in marathi – छोट्या खेड्यांमध्ये कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीचे कामकाज सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्याद्वारे चालवले जाते.

गावातील नवीन योजना, सुविधा आणि इतर उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत जबाबदार असते. त्यामुळे तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीला अर्ज करून मिळवू शकता.

यासाठी या लेखातून आपण ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा (how to write gram panchayat rti form in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ग्रामपंचायत माहितीच्या अधिकारातील मिळालेले अधिकार (gram panchayat rti marathi)

gram panchayat rti form in marathi

आपल्या गावातील चालू असलेल्या विकास कामाची माहिती आणि दर्जा, त्या कामाचा एकूण खर्च जाणून घेण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा उपयोगात येतो.

या कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतीचे कामकाज कसे चालते ? त्यांच्या कार्यपद्धती किंवा जनतेस कश्याप्रकारे सेवा देतात याची माहिती जाणून घेता येते.

तसेच सरकारी योजनेतील लाभार्थीची यादी आणि निवड, गावातील सुविधेवर होणारी आर्थिक उलाढाल माहिती करता येते.

रेशनदुकानांची स्थिती आणि दुकानात मिळणाऱ्या मालाचा दर्जा जाणून घेता येतो. गावातील दारिद्ररेषेखालील कुटुंबाची व मिळलेल्या मदतीची माहिती जाणून घेता येते.

गावातील सरकारी दवाखाना, शाळा, घरकुल, पाणी पुरवठा आणि अन्य सुविधा मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी मिळवता येते.

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा (gram panchayat rti form in marathi)

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन पद्धतीने करता येतो. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोर्टातून दहा रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागतो.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पुढील फॉर्म download करून अचूक माहिती भरुन संबंधित अधिकाऱ्याला टपालाने किंवा वैयक्तिकरित्या पाठवू शकता.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://rtionline.maharashtra.gov.in/request/request.php या महाराष्ट्र शासनाच्या माहिती अधिकार कायद्याच्या वेबसाइट वर जाऊन अचूक फॉर्म भरावा.

माहिती भरत असताना ती अचूक आणि स्पष्ट असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडून अर्जात चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिली तर तुमचा अर्ज नाकारण्यात येऊ शकतो.

माहितीचा अधिकार अर्ज लिहताना घ्यावयाची काळजी

माहितीचा अधिकार अर्ज ऑफलाईन पद्धतीने करताना अर्ज सुवाच्य आणि स्पष्ट अक्षरात लिहावं. विषयाला अनुसरून मुद्दे असावेत, जास्तीत जास्त 150 शब्दात माहितीचा तपशील लिहायचं आहे.

अर्जातील लेखन प्रश्नार्थक लिहू नये, तक्रार करू नये किंवा संबंधित अधिकाऱ्यावर आरोप करू नयेत, नाहीतर तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

शक्यतो एका अर्जात एकाच विषयावर माहितीची मागणी करावी. अर्ज करणारा हा एकच व्यक्ती असावा, एखादी संस्था किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावाने अर्ज करू नये.

तुम्ही मागवली माहिती मोठी असेल तर ती मिळवण्यासाठी इमेल द्वारा सूचित करा, जेणेकरून तुमचा टपालाचा खर्च वाचेल.

सारांश

या लेखातून आपण ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा (how to write gram panchayat rti form in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. लेख महत्वपूर्ण वाटला, तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

माहितीचा अधिकार अर्ज किती दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे ?

माहितीचा अधिकार अर्ज 30 दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे.

माहिती अधिकार अर्ज शुल्क किती आहे ?

माहितीच्या प्रत्येक पानासाठी 2 रु. शुल्क आकारले जाते. टपाल खर्च अर्जदाराने करावयाचा असतो, हा खर्च कमी करण्यासाठी ईमेल द्वारे माहिती मागवावी.

पुढील वाचन :

  1. माहितीचा अधिकार कसा वापरावा ?
  2. आयकर कायदा माहिती मराठी
  3. कॉपीराइट म्हणजे काय ?