Gram panchayat sarpanch mahiti marathi – ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असे म्हणतात. सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. तो ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक व ग्रामसेवक असतो. सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे त्यांचा कार्यभार सांभाळतात. अशा प्रकारची ग्रामव्यवस्था भारतामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात आहे.
ग्रामपंचायत, ग्रामसभा आणि पंचायत समितीमध्ये महत्वाचा दुवा म्हणून सरपंचास ओळखले जाते. गावाच्या विकासाठी सरपंच या पदाची तरतूद केली आहे. या लेखातून आपण सरपंच माहिती मराठी (gram panchayat sarpanch information in marathi) जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- सरपंच याविषयी माहिती (gram panchayat sarpanch mahiti marathi)
- सरपंच पदासाठी पात्रता (gram panchayat election eligibility in maharashtra)
- सरपंच पदाची निवडणूक माहिती (sarpanch election process)
- सरपंच मानधन किती असते (sarpanch payment in maharashtra)
- सरपंच कार्य आणि अधिकार (sarpanch rights and duties in marathi)
- सरपंचाचा राजीनामा माहिती मराठी (sarpanch rajinama mahiti marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
सरपंच याविषयी माहिती (gram panchayat sarpanch mahiti marathi)

विषय | सरपंच पद |
प्रकार | ग्रामपंचायत वास्तव कार्यकारी प्रमुख |
पात्रता | वय – 21 वर्ष पूर्ण शिक्षण – कमीत कमी सातवी पास (1 जानेवारी 1995 नंतर जन्म झालेले) गावाच्या मतदार यादीत नोंद आवश्यक |
कार्यकाल | 5 वर्ष |
मानधन | 3000 ते 5000 रुपये |
महाराष्ट्र ग्रामपंचायत वेबसाईट | https://rdd.maharashtra.gov.in/ |
सरपंच किंवा उपसरपंच पदी असणाऱ्या व्यक्तीस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद व तिच्या उपसमित्या यापैकी कोणत्याही संस्थेच्या प्रमुखपदी निवड झाल्यास, त्याचे पद आपोआप रिक्त होते. नवीन सरपंचाची निवड होऊन तो पदावर येईपर्यंत आधीचा सरपंच काळजीवाहू म्हणून कार्यरत असतो.
सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून होत असते. ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका व्यक्तीची उपसरपंच म्हणून निवड करतात.
गावाचा अर्थसंकल्प बनवून ग्रामसभामध्ये सरपंच सादर करतो आणि हा संकल्प मंजूर करण्याचा अधिकार ग्रामसभेस आहे. गावविकास समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव ग्रामसेवक असतात.
सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तरीदेखील हे दोघेही कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर आपला राजीनामा देऊ शकतात. ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे देतात. सरपंचाला आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करावा लागतो.
हा लेख जरूर वाचा – संविधानाची उद्देशिका म्हणजे काय (constitution of india in marathi)
सरपंच पदासाठी पात्रता (gram panchayat election eligibility in maharashtra)
वय | 21 वर्ष पूर्ण पाहिजे |
शैक्षणिक पात्रता | कमीत कमी सातवी उत्तीर्ण |
इतर | संबंधित गावाच्या मतदार यादीत नोंदणी |
सरपंच पदासाठी शैक्षणिक पात्रता 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवाराला लागू होतो. यापूर्वी राजस्थान आणि हरियाणा या राज्यांनी सरपंच पदासाठी शैक्षणिक पात्रता अट घातली होती.
सरपंच पदाची निवडणूक माहिती (sarpanch election process)
दर पाच वर्षांनी सरपंचाची निवडणूक होत असते. सरपंच पदासाठी वय, शैक्षणिक आणि इतर पात्रता विचारात घेतली जाते. सरपंच पदासाठी रोटेशन पद्धतीने राखीव ठेवण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमाती, मागास प्रवर्ग यातील स्री प्रतिनिधीसह जिल्ह्यातील एकूण सरपंच संख्येला 50 % पदे राखीव ठेवली जातात.
महाराष्ट्र सरकारने 25 फेब्रुवारी 2020 रोजी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात थेट सरपंच निवड रद्द करण्याविषयीचे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले. तेव्हापासून निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचा सदस्यांकडून सरपंचाची निवड करण्यात येते.
हा लेख जरूर वाचा – भारताचे राष्ट्रपती माहिती मराठी (president of india information in marathi)
सरपंच मानधन किती असते (sarpanch payment in maharashtra)
सरपंचाचा पगार ग्रामपंचायत लोकसंख्येवर ठरलेला असतो तो पुढीलप्रमाणे,
ग्रामपंचायत लोकसंख्या | सरपंच मानधन | उपसरपंच मानधन |
---|---|---|
0 ते 2000 | 3000 रुपये | 1000 रुपये |
2001 ते 8000 | 4000 रुपये | 1500 रुपये |
8001 हून अधिक | 5000 रुपये | 2000 रुपये |
सरपंच कार्य आणि अधिकार (sarpanch rights and duties in marathi)
सरपंच कार्य मराठी |
1. सरपंच हा ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून सरपंच कार्य करतो.
2. ग्रामपंचायतीच्या सभा आणि ग्रामसभा भरवून त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारणे. ग्रामपंचायतीने घेतलेले ठराव आणि निर्णय यांची अंमलबजावणी करणे.
3. ग्रामसभेचे अधिकारी आणि नोकरवर्ग यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सरपंचाचे असते. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्य शासन यांना माहिती पुरविण्याचे काम सरपंच करतो.
सरपंच अधिकार मराठी |
ग्रामपंचायतीच्या निर्यायक प्रसंगी एक मत देता येते. उपसरपंच निवडणुकीत समान मते पडल्यास सरपंच निर्णयात्मक मत देता येते.
गावाचा विकास करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात. यासाठी लागणारा निधी आणि मदत सरपंच शासनाकडून प्राप्त करतो.
हा लेख जरूर वाचा – ग्रामपंचायत विषयी माहिती (Gram panchayat information in marathi)
सरपंचाचा राजीनामा माहिती मराठी (sarpanch rajinama mahiti marathi)
सरपंच मुदतीपूर्वी आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा द्यावा लागतो. सरपंचास पदच्युत केले जाऊ शकते किंवा अविश्वास ठराव संमत केला जाऊ शकतो.
गैरवर्तणूक, असभ्य वर्तन, कामातील दिरंगाई केल्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना राजीनामा मागितला जातो. हा राजीनामा मागण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस असतो.
हा लेख जरूर वाचा – भारतीय राज्यघटनानुसार कोण कोणाकडे राजीनामा देतो ?
सरपंच अविश्वास ठराव माहिती |
सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरवाची पूर्वसूचना तहसीलदारास द्यावी लागते. सूचना प्राप्त होताच तहसीलदार एक आठवड्याच्या आत ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करतात. या सभेत अविश्वासाचा ठराव मांडला जातो.
3 जुलै 2017 पासून सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करताना दोन तृतीयांश सदस्यांनी तो मांडावा लागतो. हा ठराव संमत होण्यासाठी उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 75% सदस्यांचे बहुमत आवश्यक असते. या ग्रामसभेत गुप्त मतदानाद्वारे ग्रामस्थांच्या बहुमताने अविश्वास ठराव संमत झाला तरच सरपंचांना पदावरून दूर केले जाते.
सरपंच पदाचा स्वीकार केल्यानंतर पहिल्या दोन वर्षांच्या आत अविश्वास ठराव दाखल करता येत नाही. एकदा ठरावाला नकार दिल्यावर पुढील दोन वर्ष अविश्वास ठराव दाखल करता येत नाही.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण सरपंच विषयी माहिती मराठी (gram panchayat sarpanch mahiti marathi) जाणून घेतली आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
ग्रामपंचायत निवडणूक नियम व अटी
छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो.
1. सरपंच आणि उपसरपंच – वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे. उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण हवा. संबंधित गावाच्या मतदार यादीत नाव नोंदणी केलेले असावे.
2. ग्रामसेवक – ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. तो ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
सरपंचाची कामे काय असतात ?
1. गाव तंटामुक्ती करणे.
2. गावात शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता विकास करणे.
3. ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजन करून गावाचा विकास आराखडा, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
4. ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक असतो.
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?
ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो..
सरपंचाचा कार्यकाल किती असतो ?
सरपंचाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.
सरपंच पदासाठी शिक्षण किती पाहिजे ?
सरपंच पदासाठी शिक्षण कमीत कमी सातवी उत्तीर्ण पाहिजे.