पपनस मराठी माहिती

Grapefruit information in marathi – पपनस लिंबू वर्गीय वनस्पती असून ही वनस्पती औषधी गुणधर्माची आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोकण किनारपट्टीवर साधारणपणे ही वनस्पती जास्त प्रमाणत आढळते.

गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे. पपनस या वनस्पतीचे फळ आरोग्यासाठी चांगले असते.

आजच्या या लेखामध्ये आपण पपनस मराठी माहिती (grapefruit information in marathi) जाणून घेणार आहोत.

पपनस मराठी माहिती (grapefruit information in marathi)

grapefruit information in marathi
नावपपनस (पोमेलो)
शास्त्रीय नावसिट्रस मॅक्झिमा
वर्गलिंबू
प्रकारऔषधी
वर्णनपांढऱ्या रंगाची – फुले
हिरव्या रंगाची – फळ
आढळकोकण, महाराष्ट्र राज्य
उपयोगआरोग्यासाठी

1. पपनसाचे झाड साधारणपणें 5 ते 10 मीटर इतके उंच असते. याच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो.

2. या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले असतात. पपनसच्या फळाचा आकार हा मोठ्या चेंडूइतका असतो आणि साल हिरव्या रंगाची असते.

3. सुरवातीला हिरव्या रंगाची असणारी साल फळे पिकू लागल्यावर पिवळ्या रंगाची होते.

4. पपनसच्या फळांना सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत पाहायला मिळतात.

5. मोसंबी सारख्या फोडींची रचना यामध्ये पाहायला मिळते. यामध्ये पांढरा गर आणि गुलाबी रंगाचा गर असलेल्या दोन जाती आहे.

6. पपनसाचे फळ कच्चे असल्यास गराची चव कडू लागते. फळ पिकल्यावर थोडासा कडवटपणा कमी होत जातो.

7. इतर फळांप्रमाने या फळाच्या बियांपासून रोपे तयार करता येतात.

8. भारतातील महाराष्ट्र राज्यात याची झाडे जास्त प्रमाणात आढळून येतात.

9. पपनसाला ‘चकुत्र’ ‘बंपर’ आणि ‘चकोत्रा’ अशा स्थानिक नावानी ओळखले जाते.

10. पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. फुलांपासून अत्तर तयार करतात.

12. या झाडाचे लाकूड कठीण असते. त्यामुळे त्याचा वापर करून अवजारांच्या मुठी बनविल्या जातात.

13. गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे.

14. याचे फळ रसाळ आणि गोड आहे, पपनसाचे फळ कच्चे असल्यास गराची चव कडू लागते. फळ पिकल्यावर थोडासा कडवटपणा कमी होत जातो. हे फळ आरोग्यदायी म्हणून ओळखले जाते.

पपनस खाण्याचे फायदे मराठी माहिती (grapefruit information in marathi)

15. पोषकतत्त्वांचे प्रमाण जास्त – पपनसमध्ये भरपूर पोषक घटक आहेत. यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणत असून अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, यामुळे आपले वजन प्रमाणत ठेवण्यास मदत होते.

16. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – पपनसमध्ये व्हिटामिन सी जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.

17. हृदयासाठी चांगले – द्राक्षाचे नियमित सेवन केल्याने आपले हृदय निरोगी राहते. संशोधनानुसार, असे सिद्ध झाले आहे की याचे नियमित सेवनाने हृदयरोगाचा धोका खूप कमी होतो.

18. त्वचेची काळजी – यामधे असणारे व्हिटामिन सी आपल्या त्वचेसाठी खूप उपयोगी असतात. यामुळे त्वचेला रीजुव्हेनेट होण्यास मदत होते.

19. अँटीऑक्सिडं – पपनसच्या फळात अँटी ऑक्सिडंट्स् जास्त प्रमाणत असते. यामुळे आपले जुने रोग उद्भवत नाहीत.

20. त्यामुळे अश्या या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळाचे आपण रोज सेवन करायला हवे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पपनसमध्ये कोणते जीवनसत्व असते ?

पपनसमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि सी जीवनसत्व असते.

पपनस म्हणजे काय ?

पपनस लिंबू वर्गीय वनस्पती असून ही वनस्पती औषधी गुणधर्माची आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण पपनस मराठी माहिती (grapefruit information in marathi) जाणून घेतली.

त्याचबरोबर या लेखात आपण पपनस फळाचे माहिती आणि पपनस चे फायदे पाहिले आहेत. पपनस मराठी माहिती (grapefruit in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला पपनस ची माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

हे देखील वाचा :

Leave a Comment