धनेश पक्षी माहिती मराठी

Great Indian Hornbill Bird Information In Marathi – भारतातील केरळ राज्याचा राज्यपक्षी ग्रेट इंडियन हॉर्नबिल याला ग्रेट पाईड हॉर्नबिल म्हणूनही ओळखला जातो. या पक्षाची प्रजात भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये आढळून येते. हे पक्षी प्रामुख्याने फळभक्षक आहे, याबरोबरच लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांची शिकार करून आपली उपजीविका करतात.

मोठ्या आकारामुळे आणि रंगामुळे बऱ्याच आदिवासी संस्कृतींमध्ये आणि विधींमध्ये ग्रेट इंडियन हॉर्नबिलला विशेष महत्त्व दिले जाते. या लेखात आपण धनेश पक्षी माहिती मराठी (Great Indian Hornbill Bird Information In Marathi) जाणून घेणार आहोत.

धनेश पक्षी माहिती मराठी (great indian hornbill bird information in marathi)

great indian hornbill bird information in marathi
नाव धनेश पक्षी
वैज्ञानिक नावबुसेरोस बायकोर्निस
प्रजातीबी. बायकोर्निस
आढळ भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये
वर्णनभारतातील धनेश पक्षी करड्या रंगाचा असतो. डोके, पाठ, छाती आणि पंख काळे असतात, पंखांवर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. मान आणि पोट पांढऱ्या रंगाचे असते. शेपटी लांब आणि पांढरी असते. शेपटीच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे आणि मादीचे पांढरे असतात. चोच मोठी, मजबूत, बाकदार पिवळी असते.

धनेश पक्षी (Great hornbill) हा केरळचा राज्यपक्षी (Great Indian hornbill state bird) आहे. याचे वैज्ञानिक नाव (great hornbill scientific name) बुसेरोस बायकोर्निस असे आहे. हा पक्षी पावसाळी जंगलांच्या मोठ्या भागावर अवलंबून असतो.

धनेश पक्षी अन्न आणि आहारासाठी (great indian hornbill food) प्रामुख्याने फळांवर अवलंबून असतात. अंजीर हे फळ यांच्या आहारात प्रामुख्याने समाविष्ट असते. तसेच धनेश पक्षी शिकारदेखील (great indian hornbill hunting food) करतो. यामध्ये लहान कीटक, पक्षी आणि लहान सरडे यांची शिकार करून उपजीविका करतात.

धनेश पक्षी विषयी मनोरंजक तथ्य (interesting facts about the great hornbill in marathi)

great indian hornbill bird in marathi

1. धनेश हा पक्षी शाकाहारी आणि शिकारी पक्षी आहे. तो चरबीयुक्त आणि साखर समृध्द फळे, लहान सस्तन प्राणी, पक्षी, अंडी, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि कीटक देखील खातात.

2. मोठ्या आकारामुळे आणि रंगामुळे आदिवासी संस्कृतींमध्ये आणि विधींमध्ये याला विशेष महत्त्व देण्यात येते.

3. धनेश हा पक्षाचे घरटे बनविण्याची पद्धत आणि कुटुंबाभिमुखता ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. मोठी, उंच आणि जुनी झाडे यावर धनेश घरटे बांधतो. तसेच मानव ज्या पद्धतीने कुटुंबात राहतो, तसेच धनेश पक्षी कुटुंबात राहण्यास प्राधान्य देतो.

4. धनेश पक्ष्याला प्रजनन (hornbill reproduction) करण्यासाठी जानेवारी ते एप्रिल हा कालखंड अनुकूल असतो.

5. धनेश पक्ष्याला नेपाळमध्ये होमराई आणि मसुरीमध्ये बनराव म्हणतात, याचा अर्थ जंगलाचा राजा असा होतो.

6. भारतातील केरळ आणि अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार मधील चिन राज्याचा राज्यपक्षी आहे. तसेच भारतात पक्ष्यांवर संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था बी. एन. एच. एस या संस्थेचे मानचिन्ह आहे.

7. भारतात धनेशाच्या पाच-सहा जाती आहेत. मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा आहे. या प्रजातीतील पक्षी पश्चिम घाटात मुंबईपासून कन्याकुमारीच्या भूशिरापर्यंत आणि हिमालयाच्या खालच्या रांगांमध्ये 1525 मी. उंचीपर्यंत आढळते.

8. करडा धनेश या प्रजातीतील धनेश फक्त भारतातच आढळतो. याचे निवासस्थान हिमालयाच्या पायथ्यालगत आहे. करडा धनेश घारीइतका असतो, त्याची लांबी साधारणपणे 60 सेमी इतके असते.

9. धनेश या पक्ष्याचे असामान्य रुपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किलोमीटर अंतरावर ऐकू जातो.

10. अशा प्रकारे धनेश हा पक्षी अतिशय चपळ, देखणा आणि वैशिष्टपूर्ण पक्षी आहे.

सारांश

yellow hornbill in marathi

आजच्या या पोस्टमध्ये आपण धनेश पक्षी माहिती मराठी (great indian hornbill bird information in marathi) जाणून घेतली आहे. यामध्ये आपण धनेश पक्षी विषयी मनोरंजक तथ्य (interesting facts about the great hornbill) याची माहिती जाणून घेतली.

धनेश पक्षी माहिती मराठी (great indian hornbill bird in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Related – नीलकंठ पक्षी माहिती मराठी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

धनेश कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?

धनेश हा अरुणाचल प्रदेश आणि केरळ राज्याचा राज्यपक्षी आहे.

धनेश पक्षी कशावर उपजीविका करतो ?

धनेश पक्षी फळे, लहान सस्तन प्राणी, कीटक यावर आपली उपजीविका करतो.

धनेश पक्ष्याचे वजन किती असते ?

धनेश पक्ष्याचे वजन कमीतकमी 2 किलो आणि जास्तीत जास्त 4 किलो इतके असते.

धनेश पक्षी वर्णन – भारतातील धनेश पक्षी कोणत्या रंगाचा असतो ?

भारतातील धनेश पक्षी करड्या रंगाचा असतो. डोके, पाठ, छाती आणि पंख काळे असतात, पंखांवर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. मान आणि पोट पांढऱ्या रंगाचे असते. शेपटी लांब आणि पांढरी असते. शेपटीच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे आणि मादीचे पांढरे असतात. चोच मोठी, मजबूत, बाकदार पिवळी असते.

Leave a Comment