1 जानेवारी शौर्य दिवस माहिती मराठी

Greetings for shaurya Din 2023 – शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस इतिहासातील महत्वपूर्ण दिवस आहे. 1 जानेवारी 1818 मध्ये या दिवशी फक्त 500 महार सैनिकांनी 28000 पेशवाई सैन्याचा पराभव करून भारताला जातमुक्त आणि लोकशाहीवादी बनवण्याच्या दिशेने पहिले ऐतिहासिक पाऊल टाकले.

या लेखातून आपण 1 जानेवारी 1818 या दिवसाचा शौर्य दिवसाविषयी माहिती (greetings for shaurya Din 2023) जाणून घेणार आहोत.

1 जानेवारी शौर्य दिवस माहिती मराठी (greetings for shaurya Din 2023)

greetings for shaurya Din 2022

होते पेशवे 28,000 भले पायदळ आणि घोडेस्वार, निकराने लढले 500 महार. बाजीराव पुरता झाला बेजार, रण सोडूनी घेतली माघार. इतिहास सोन्यान जणू गोंदल हे नाव, शूरवीरांच्या नावान गाजतय भीमा कोरेगाव!!!

हा लेख जरूर वाचामहापरिनिर्वाण दिन माहिती मराठी

भीमा कोरेगाव लढाई इतिहास माहिती (history of bhima koregaon in marathi)

कोरेगाव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती.

या लढाई मध्ये 834 ब्रिटिश सैनिक तर 28000 मराठा सैनिक होते. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते.

या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व मराठा साम्राज्याचा अस्त झाला.

ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया’ पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे.

सारांश

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भीमा कोरेगाव लढाई माहिती (Bhima koregaon information in marathi) जाणून घेतली. भीमा कोरेगावचा इतिहास (Bhima koregaon history in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भीमा कोरेगावची लढाई केव्हा झाली होती ?

भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी झाली होती.

भीमा कोरेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

भीमा कोरेगाव पुणे जिल्ह्यात आहे.

इंग्रजांनी भीमा कोरेगावयेथे कोणाचा पराभव केला ?

इंग्रजांनी भीमा कोरेगावयेथे पेशवाई व मराठा साम्राज्याचा पराभव केला.

Leave a Comment