Guru Govind Singh information in Marathi – गुरु गोविंदसिंग हे शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम गुरु होते. गुरु गोबिंदसिंह यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 या रोजी पौष शुक्ल सप्तमीमध्ये पटणा या ठिकाणी झाला. त्यांचा वाढदिवस ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार कधी डिसेंबर तर कधी जानेवारीमध्ये येतो. गुरूंचा वाढदिवस नानकशाही कॅलेंडरनुसार ठरवला जातो.
गुरू गोविंदसिंह यांची जयंती शिख समुदायासाठी वार्षिक उत्सव आहे. या दिवशी शीख धर्मीय समुदाय मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करतत. या दिवशी सर्व शीख धर्मीय समुदाय समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
या लेखात आपण गुरु गोविंदसिंह यांची माहिती – Guru Govind Singh information in Marathi जाणून घेणार आहोत.
Table of Contents
गुरु गोविंदसिंह यांची मराठी माहिती – Guru Govind Singh information in Marathi

नाव | गुरू गोविंदसिंह |
जन्म | 22 डिसेंबर 1666 |
कार्य | धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले |
उत्सव | गुरु गोविंदसिंग जयंती |
साजरा करणारे | शीख धर्मीय समुदाय |
1. गुरु तेग बहादूर ह्यांचा जन्म अमृतसर मध्ये झाला. हे गुरु गोविंदसिंग यांचे पिता होते. यांना समाजकार्याची खूप आवड होती. या काळात भारतावर मुघलांचे साम्राज्य होते. भारतातील सर्व नागरिकांनी इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी मुघल बादशहा औरंगझेब प्रयत्न करत होता.
2. या वेळी काश्मिरी हिंदुनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा अशी मुघल बादशहा औरंगझेब याची इच्छा होती. जर कुणी मुस्लिम होण्यास विरोध केला की मुघल स्थानिक नागरिकांचे हाल हाल करत होते, त्यामुळे बरेच हिंदू नागरिक इच्छा नसताना मुस्लिम धर्म स्वीकारला.
3. गुरु तेग बहादूर यांनी या धर्मांतराला कडाडून विरोध केला आणि सामान्य नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
4. गुरूंच्या या कार्याने मुघल बादशहा औरंगझेब संतापला आणि त्याने गुरु तेग बहादूर यांना इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून बळजबरी केली. याला गुरूंनी नकार देताच बादशहाने गुरूंना मारण्याचा आदेश दिला.
5. यानंतर 24 नोव्हेंबर 1675 या दिवशी गुरु तेग बहादूर यांचे शिर धडावेगळे करण्यात आले. त्यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून 24 नोव्हेंबरला शहीद दिवस म्हणून साजरा करतात.
6. यानंतर त्यांचे पुत्र म्हणजे गुरु गोविंदसिंग यांनी वय वर्ष नऊ असताना वडिलांचा वारसा चालवण्याचे काम केले.
गुरु गोविंदसिंग मराठी माहिती – guru govind singh jayanti information in marathi
7. गुरु गोविंदसिंग यांच्या वडिलांचे नाव गुरु तेग बहादुर आणि आईचे नाव गुजरी असे होते. गोविंदसिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरु म्हणून ओळखले जाते. तर शीख संप्रदायाचे नववे गुरु म्हणून गुरु तेग बहादूर यांना ओळखले जाते.
8. गुरु गोविंदसिंह हे लहानपणापासूनच निडर आणि साहसी होते. त्यांना लहानपणापासूनच युद्ध कला अवगत होती. त्याचबरोबर त्यांना हिंदी, संस्कृत, फारसी, बृज आणि इतर भाषा येत होती.
सवा लाख से एक लड़ाऊँ चिड़ियों सों मैं बाज तड़ऊँ तबे गोबिंद सिंह नाम कहाऊँ.
वरील ओळ गुरूंच्या बहादूरपणाविषयी म्हंटले गेले आहे.
9. गुरु गोविंदसिंह यांनी 30 मार्च 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. या पंथाचे स्वरूप लढाऊ होते.
10. त्यावेळी शीखबांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी त्यांनी पाच ककारांची निर्मिती त्यांनी केली. ककार मानणार्यास खालसा पंथाचे मानले जाते.
11. केस (कधीच कापायचे नाहीत) – केस हे पावित्र्याचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून मानले जाते. केस हे देवाने दिलेली देणगी आहे.
12. शीख व्यक्तीने फक्त गुरूपुढेच डोके टेकवायचे बाकी इतरांपुढे नाही. शीख महिलांनी अंगावरचे कोणतेच केस कापायचे नाही, अशी मान्यता आहे.
13. हातात कडा वापरणे – हा कडा दागिना म्हणून वापरत नाही, त्यामुळे ते सोने किंवा चांदीचे नसून स्टीलचे असावे असा नियम आहे.
14. या कड्यामुळे गुरूशी एकनिष्ठ राहता येते. धर्मविरोधी काम हातून होणार करणार नाही अशी मान्यता आहे.
15. कंगवा – वाढलेले केसांची नीट निगा राखता यावी म्हणून जवळ कंगवा पाहिजे. देवाने दिलेल्या शरीराची आपण व्यवस्थित काळजी घेत आहोत याचे प्रतीक म्हणून कंगवा कायम सोबत असावा.
16. विजार – ही विजार गुडग्यापेक्षा खाली नाही पाहिजे. युध्दाच्या काळात घोडदौडीच्या वेळी हिचा उपयोग होत असायचा.
17. कृपाण – अन्यायाचा प्रतिकार करणे आणि दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी कृपाणचा उपयोग करावा, असा नियम आहे.
18. गुरु गोविंदसिंग यांनी धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला होता. इसवी सन 1708 मध्ये गुरु गोविंदसिंग यांनी आपला प्राण त्याग केला. तेव्हापासून गुरु ग्रंथसाहिब हे शिखांचे कायमचे गुरू मानले जाते.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण गुरु गोविंदसिंह यांची माहिती – Guru Govind Singh information in Marathi जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल कोणते आहे ?
गुरु गोविंदसिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली.
शिखांचे दहावे गुरु कोण होते ?
शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग हे होते.
औरंगजेबाने कोणत्या शिख धर्मगुरूला देहांत शासन केले ?
औरंगजेबाने गुरु तेग बहादूर या शिख धर्मगुरूला देहांत शासन केले.
शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?
शीख धर्माचा पवित्र ग्रंथ श्रीगुरुग्रंथसाहिब हा आहे.
शिखांचे नववे गुरु कोण आहेत ?
शिखांचे नववे गुरु तेगबहादुर हे आहेत.
तुम्हाला हे लेख वाचायला नक्की आवडेल.