Guru Purnima In Marathi – आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपले गुरू करीत असतात. त्यामुळे गुरूंना उच्च स्थानी मानले जाते. गुरू म्हणजे फक्त शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणारा मास्तर नाही, तर गुरु म्हणजे आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! यामध्ये एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला गुरु असणे, आवश्यक असते.
कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ।
– संत कबीर
वरील काव्यपंक्ती संत कबीर यांची आहे. यातून ते असे म्हणतात, ते लोक आंधळे आहेत हे गुरूला आपल्या जीवनात स्थान देत नाहीत. देव जरी आपल्यावर नाराज झाला, तरीदेखील गुरूंचा आधार असतो. पण गुरु नाराज झाले, तर कुणाचाही आधार राहत नाही.
वरील उदाहरणासारखे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. ज्यातून असे दिसून येईल, की प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात गुरूंना उच्च स्थानी मानले आहे. यातूनच त्यांची प्रगती साधू शकली आहे.
या लेखातून आपण गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी (Guru Purnima In Marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण गुरुपौर्णिमा दिवसाचे महत्त्व (Importance Of Gurupurnima Day Marathi) आणि गुरुपौर्णिमा उत्सव कसा साजरा करावा (How To Celebrate Guru Purnima) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी (Guru Purnima In Marathi)
- गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी (Guru Purnima Greetings In Marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी (Guru Purnima In Marathi)

विषय | गुरुपौर्णिमा |
प्रकार | जगातील गुरूंचा सण |
साजरा करणारे | सर्वजण |
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
रुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
आपल्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी गुरु कार्यरत असतात. आईला आपल्या जीवनातला पहिला गुरु (First Guru In The World) मानले जाते. दुसरे वडील आणि तिसरे शिक्षक. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. कारण प्रत्येक व्यक्ती कायम काहीतरी शिकत असते. गुरू म्हणजे फक्त शाळेतील शिक्षक नसून, गुरु हे म्हणजे आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! यामध्ये एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.
Guru Purnima Is Celebrated For – जगातील सर्व गुरूंचा सन्मान करण्यासाठी जगभरात गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो. हा सण आषाढ पौर्णिमेस साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा (Guru Purnima Called Vyasa Purnima) असेदेखील म्हंटले जाते.
गुरुपौर्णिमा प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे, याचे प्रमाण महाभारतातल्या कथेमध्ये दिसून येते. महाभारतातील द्रोणाचार्य हे अर्जुनाचे गुरू होते. अर्जुनाने गुरूचा आदर केला आणि ते पुढे भविष्यात महान, आदर्श व्यक्ति म्हणून ओळखला जाऊ लागला. हिंदु आणि बौद्ध धर्मात गुरुपौर्णिमेचे विशेष स्थान आहे.
हा लेख जरूर वाचा – भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती (india’s major religion information in marathi)
हिंदू धर्मातील गुरु पौर्णिमेचे महत्व (Hindu Dharma Guru Purnima In Marathi)

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार म्हणून ओळखले जातात. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, व्यासांनी त्याचे चार भाग केले. व्यासांनी महाभारत लिहिले (Mahabharat Written By Maharshi Vyas) महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे.
महाभारतातील एक अपराजित शूर म्हणून ओळखला जाणाऱ्या अर्जुनाला हिंदू संस्कृतीमध्ये शौर्याचे प्रतीक मानले जाते. अर्जुनाच्या नावाने भारतीय खेळ पुरस्कार (National Bravery Award) दिला जातो.
बौद्ध धर्मातील गुरु पौर्णिमेचे महत्व माहिती(Buddha Dharm Guru Purnima In Marathi)

बौध्द धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी बोधी प्राप्ती नंतर आपला प्रथम धर्मोपदेशक सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखले जाते.
हा धर्मोपदेश आषाढ़ पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांनी दिल्याने, या पौर्णिमेला गुरुपौर्णिमेच्या म्हणून ओळखले जाते. कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये बौद्ध धर्मीय गुरुपौर्णिमा साजरी करतात.
गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी (Guru Purnima Mahiti Marathi)
आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते. शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
गुरु आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम करणारे म्हणजे अशी व्यक्ती जो आपल्याला अज्ञान आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर करतो आणि आपल्याला ज्ञान आणि जागरूकता प्रदान करतो.
हा लेख जरूर वाचा – महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi)
गुरु पौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक हिंदू सण आहे. संत वेदव्यास यांच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी हा सण साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी (How To Celebrate Guru Purnima In Marathi)
आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते. शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
आई-वडील, आजी-आजोबा आणि आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. यांची या दिवशी पूजा केली जाते. त्यांचे अभिनंदन केले जाते.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी (Guru Purnima Greetings In Marathi)
नेहमी असू द्या तुमचे आशीर्वाद आम्हावर, गुरुपौर्णिमेनिमित्त हीच आपल्या चरणी प्रार्थना गुरूवर!
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
गुरु दाखवतात यशाचा मार्ग,या मार्गावर चालून मिळवा
यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!💐
अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञान
गुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करा
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
सारांश
गुरु हे प्रत्येकाच्या जीवनातील मार्गदर्शक आहेत. या लेखातून आपण गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी (Guru Purnima In Marathi) जाणून घेतली आहे. या लेखातून आपण आपल्या जीवनातील गुरूंचे महत्व याविषयी माहिती जाणून घेतली.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते ?
गुरु हे प्रत्येकाच्या जीवनातील मार्गदर्शक असतात. त्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु कोण होते ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरूंची नावे त्यांनी पुस्तकातून, विचारातून सांगितली आहेत. बाबासाहेबांचे ते गुरु म्हणजे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण होते ?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु पुढीलप्रमाणे आहेत.
1. माता जिजाऊ
2. शहाजी राजे
3. दादोजी कोंडदेव