गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

Guru Purnima Quotes In Marathi – आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपले गुरू करीत असतात. त्यामुळे गुरूंना उच्च स्थानी मानले जाते. गुरू म्हणजे फक्त शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणारा मास्तर नाही, तर गुरु म्हणजे आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! यामध्ये एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला गुरु असणे, आवश्यक असते.

आपल्या गुरूला मानवंदना देण्यासाठी या लेखात आम्ही खास गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी (guru purnima wishes in marathi) निवडले आहेत.

हे संदेश तुम्ही गुरुपौर्णिमा कोट्स मराठी (Guru Purnima Quotes In Marathi) पाठवून आपल्या गुरुंचे ऋण शब्दातून व्यक्त करू शकता.

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी (Guru Purnima Quotes In Marathi)

Guru Purnima Quotes In Marathi
विषय गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश
प्रकारसण व उत्सव
साजरा करणारेसर्वजण

गुरु जगाची माऊली, सुखाची सावली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण, लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुविण कोण दाखविल वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु हे मेणबत्तीसारखे असतात, जे इतरांना मार्ग दाखवून प्रकाशात आणतात, आणि स्वत: मात्र जळत राहतो. गुरुचा भेदभाव करु नका, गुरुपासून दूर राहू नका, गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो, त्यांच्या पायाशी सारे जग असते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

सर्वोत्कृष्ट गुरु तो, जो पुस्तकातून नव्हे तर मनातून शिकवतात. अगदी तुमच्यासारखे.

जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा रस्ता दाखविणारे फक्त आपले गुरूच असतात. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

जो बनवतो प्रत्येकाला मानव , जो करतो खरे खोट्याची ओळख अश्या आमच्या देवाला कोटी कोटी नमन !

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (guru purnima wishes in marathi)

guru purnima shubhechha in marathi

आई-वडिलांसारखे दैवत नाही, अशा माझ्या दैवताला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

तु्म्ही दाखवली वाट ज्ञानाची, तुम्ही दाखवली वाट भक्तीची, तुम्ही दाखवली वाट मुक्तीची, गुरुमाऊली तुम्ही आम्हा सर्वांची, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु तू मनाचा, गुरु तू जीवनाचा हिंमत जगायला दिली, म्हणून अर्थ लागला जीवनाला, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुंनी घडवले मला म्हणून मिळाली आयुष्याला दिशा, अश्या गुरुचरणी नमन माझा!

शिकवता शिकवत आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक.. माझ्या सगळ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो, कारण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु आहेत सगळ्यात महान, जे देतात सगळ्यांना ज्ञान, या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

होतो गुरु चरणाचे दर्शन, मिळे आनंदाचे अंदन, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या विश्वातील सर्व गुरुंना वंदना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

हा लेख जरूर वाचाशिक्षक दिनानिमित्त कविता मराठी

गुरुपौर्णिमा निमित्त खास शुभेच्छा संदेश मराठी (Guru Purnima Quotes In Marathi)

greetings guru purnima marathi

गुरूंचा महिमा अपरंपार गुरूविन काय आहे शिष्याचा आधार गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरूंचा महिना अपार आहे, गुरू उद्याचं अनुमान करतात आणि शिष्याचं भविष्य घडवतात गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दुसऱ्याचे यश पाहण्याची ताकद असणे..

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

वयाचे बंधन नाही, नात्याला तोड नाही, अशा माझ्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आयु्ष्याच्या प्रत्येक वळणावर दिलीत तुम्ही मला साथ, तुमचे उपकार कधीही फेडता येत नाही.. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…

चांगला मित्र हा नेहमी चांगल्या गुरुसारखा असतो माझ्या आयुष्यातील खास मित्राला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

शिक्षकांमुळे होते आयुष्य सुखकर, त्यांच्याशिवाय नाही जीवनाला अर्थ गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शिक्षकांनी आयुष्याला माझ्या दिली नवी दिशा अशा माझ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात पहिला मान माझ्या आई-वडिलांना गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा!

हा लेख जरूर वाचालहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Guru Purnima Quotes In Marathi For Teachers)

happy guru purnima in marathi

गुरुविण कोण दाखविल वाट, हा आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट..!

आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पापं..!

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ! “गुरुपौर्णिमेच्या” हार्दिक शुभेच्छा !

ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या विश्वातील सर्व गुरूंना वंदन !!! गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्व गुरुवर्याना हार्दिक शुभेच्छा..!

आजचा दिवस गुरूवर्याच्या आठवणीचा. गुरूप्रति असलेला आदर जपुया आणि त्यांनी दाखवलेला सुमार्ग पत्कारुया. #गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा..

गुरुविण कोण दाखविल वाट

आयुष्याचा पथ हा दुर्गम,

अवघड डोंगर-घाट

गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

ज्ञान, व्यवहार, विवेकाची शिदोरी देणारे ते गुरू गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा .

धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायणः । तत्त्वेभ्यः सर्वशास्त्रार्थादेशको गुरुरुच्यते ॥ गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा ज्ञानार्जनाचे बहुमूल्य दान देणाऱ्या सर्व गुरुवर्य व गुरुतुल्य व्यक्तिमत्वांना वंदन…

आयुष्यात भेटलेली ती प्रत्येक व्यक्ती जिच्याकडून काही ना काही शिकायला मिळाले ती गुरूच आहे. मग ती व्यक्ती आभासी जगातील असो वा वास्तविक जगातील, वंदनीयच आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

गुरुपौर्णिमा शुभेच्छा स्टेटस मराठी (guru purnima wishes in marathi)

guru purnima quotes in marathi

प्रथमसी आई वडील माझे गुरू त्यानंतरच माझे आयुष्य सुरू देहाची या तिजोरी नको त्यात पापाचा ठेवा मला ज्यांनी जन्म दिला त्यांना सुखी ठेव देवा….

गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,

लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.

गुरूच्या चरणी नतमस्तक…

तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला. आदरणीय बाबा, गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे. म्हणुन आयुष्यात गुरु हवा. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकाच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकाच सूर्य जवळ ठेवा.

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो. आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..

मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानविन होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सारांश

गुरु हे प्रत्येकाच्या जीवनातील मार्गदर्शक आहेत. या लेखातून निवडलेले गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी (Guru Purnima Quotes In Marathi) तुम्हाला आवडले असतील तर, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते ?

गुरु हे प्रत्येकाच्या जीवनातील मार्गदर्शक असतात. त्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

गुरु पौर्णिमा कशी साजरी करतात ?

गुरु पौर्णिमा सहसा आपल्या गुरूंसारख्या देवतांची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करून साजरी केली जाते.
मठ आणि आश्रमांमध्ये शिष्य त्यांच्या शिक्षकांच्या सन्मानार्थ प्रार्थना करतात.
आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन गुरु पौर्णिमा साजरी केली जातात.

Leave a Comment