हाजी अली दरगाह मराठी माहिती (Haji ali dargah information in marathi)

Haji ali dargah information in marathi – हाजी अली हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण समुद्राच्या बेटावर आहे. येथून मुंबईचा समुद्र जवळून पाहता येतो. हे जरी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असेल तरीदेखील कोणत्याही धर्माची लोक या ठिकाणी जातात. या लेखातून आपण हाजी अली दरगाह येथील पाहण्यासारखी ठिकाणे, इतिहास व इतर माहिती मराठी जाणून घेणार आहोत.

हाजी अली दरगाह इतिहास मराठी (haji ali dargah history in marathi)

Haji ali dargah information in marathi
नावहाजी अली
प्रकारदरगाह
ठिकाणमुंबई
प्रसिध्दमुस्लिम धार्मिक स्थळ
स्थानिक भाषामराठी, हिंदी आणि इंग्रजी

भारतात अनेक संत होऊन गेले, ज्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केला. अरब देश व पर्शिया देशातून अनेक मुस्लिम संत भारतात येऊन इस्लामचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. अल्लाहची अध्यात्मिक शक्ती व विचार लोकांपुढे मांडण्याचे काम या मुस्लिम संतांनी केले.

जुन्या कथाद्वरे असे मानले जाते की, पीर हाजी अली शाह बुखारी मूळ गावी प्रार्थना करण्यात व्यस्त होते.

त्यावेळेस एक महिला तेथून रडत गेली, तेव्हा त्यांनी कारण विचारले असता तिने सांगितले की, मी एक तेल विक्रेता असून माझ्या तेलाचे भांडे जमिनीवर पडले. त्यामुळे ते तेल खाली सांडले आहे. मला मदतीची गरज आहे.

मग हाजी अली यांनी ते भांडे घेऊन आपला अंगठा जमिनीला लावला. त्या वेळी जमिनीतून कारांजासारखे तेल आले. यातून भांडे भरल्यावर ती महिला खुश झाली आणि तिथून आनंदात निघून गेली.

यानंतर आपण पृथ्वीला मारून घायाळ केले या विचाराने त्यांना दुःखदायक स्वप्न पडू लागली. या विचारांनी ते त्रस्त होऊन आजारी पडले. मग आपल्या आईची परवानगी घेऊन आपल्या भावासमवेत पीर हाजी अली शाह मुंबई या ठिकाणी आले.

यानंतर त्यांचा भाऊ आपल्या मूळ गावी परतला. पण हाजी अली यांनी मुंबईतच राहून आपल्या धर्माचा प्रचार करेल अशा स्वरूपाचे पत्र आपल्या आईस पाठवले.

धर्माचा प्रसार करत असताना त्यांनी आपल्या अनुयायांना मृत्यूनंतर मला लगेच दफन करू नका तर माझी शवपेटी समुद्रात सोडून द्या, ती पेटी नंतर जेथे सापडेल तिथे दफन करा असे सांगितले.

त्यांच्या अनुयायांनी देखील हाजी अलीने सांगितल्याप्रमाणे केले, त्यांना ती पेटी वरळीच्या टेकडीवर सापडली. याच ठिकाणी त्यांना दफन करून त्यांच्या नावाने कबर व दर्गा शरीफ काळात बांधण्यात आले.

हाजी अली दरगाह मराठी माहिती (Haji ali dargah information in marathi)

हाजी आली दर्गा हा इस्लामिक वास्तु कलेचा आदर्श सुंदर नमूना आहे. हा दर्गा वरळी येथील समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर आत एका लहनशा बेटावरील खडकावर बांधलेला आहे.

हाजी अली दर्गा 600 वर्षे पुरातन असून वादळी वारे, खाऱ्या पान्याची भरती ओहोटी मध्ये टिकून आहे. या ठिकाणी आठवडा भरात साधारण 80,000 पर्यटक येत असतात.

इसवी सन 1960-64 मध्ये याचे नूतनीकरणाचे काम करण्यात आले. बरेच वास्तुकाम सन 2008 मध्ये पूर्ण झाले. या कामासाठी राजस्थान राज्यातील मक्राना येथून पांढरा मार्बल आणून त्याचा वापर केलेला आहे.

त्यामुळे दर्गा पांढऱ्या रंगाचा आहे. ताजमहाल हॉटेलसाठी मक्राना मधूनच मार्बल मागविलेला आहे.

पीर हाजी अली यांच्या कबरेला व दर्गाला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. या ठिकाणी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता येतो. धार्मिक व शांततेचा परिसराने वातावरण अगदी आनंदमय होऊन जातो.

हाजी अली दरगाह जाण्याची व राहण्याची सोय (haji ali dargah mumbai in marathi)

हाजी अली दर्गा संपूर्ण वर्षभर दररोज सकाळी 5:30 ते रात्री 10:00 उघडा असतो. पण सर्व बाजूने समुद्राने वेढल्यामुळे भरती ओहोटी चा अंदाज घेऊनच या ठिकाणाला भेट द्यावी. या सुंदर मशिदीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च सर्वोत्तम वेळ आहे.

गुरुवार आणि शुक्रवारी 40,000 हून अधिक पर्यटक येथे भेट देतात. रमजान आणि ईद या सणांच्या विधींचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या दर्ग्यालाही भेट देऊ शकता.

याशिवाय सय्यद पीरची वार्षिक पुण्यतिथी हा येथील सर्वात मोठा सोहळा आहे.

तुम्ही वरळीच्या खाडीत बस आणि टॅक्सीने दर्ग्यापर्यंत पोहोचू शकतात. तेथून मशिदीपर्यंत चालत जावे लागते. राहण्यासाठी येथे अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे जाण्यासाठी आणि राहण्यासाठी कसलीही अडचण येत नाही.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण हाजी अली दरगाह मराठी माहिती (Haji ali dargah information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

हाजी अली दर्गा हा कोणी बांधला (Who built Haji Ali Dargah)

हाजी अली दर्गा हा पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या अनुयायांनी बांधला.

पीर हाजी अली शाह बुखारी कोण होते ?

पीर हाजी अली शाह बुखारी हे एक उज्बेकिस्तान मधील व्यापारी घराण्यातील असून एक सूफी संत होते.

पुढील वाचन :

  1. मक्का मदीना हज यात्रा मराठी माहिती
  2. सौदी अरेबिया माहिती मराठी
  3. भारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती

Leave a Comment